राजकारणशैक्षणिक

रामदास आठवले साहेबांनी कडवसत्य खरी परिस्थिती मांडल्यामुळे ओबीसी समाज त्यांचे स्वागत करीत आहे

रामदास आठवले साहेबांनी कडवसत्य खरी परिस्थिती मांडल्यामुळे ओबीसी समाज त्यांचे स्वागत करीत आहे आठवले म्हणाले मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापत आहे. मराठा नेते मंडळींना गावबंदी करण्यात आलेली आहे.

मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापत आहे. मराठा नेते मंडळींना गावबंदी करण्यात आलेली आहे. असे असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या वादात उडी घेतली आहे. ‘2011 च्या जणगनणेनुसार अनुसुचित जातीची लोकसंख्या 16.6 टक्के आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या 8. 4 टक्के अशी दोन्हीची मिळुन 25 टक्के लोकसंख्या आहे. तसेच ओबीसीची लोकसंख्या कालेलकर आयोगांनुसार 52 टक्के आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी यांची लोकसंख्या 77 टक्के होते, मात्र त्यांना आरक्षण 49.50 टक्के मिळते. तसेच उर्वरित जनरल कॅटेगरीची लोकसंख्या 23 टक्के होत असून त्यांना 50. 50 टक्के जागा खुल्या वर्गासाठी मिळतात.’ हे आरक्षणाचे गौडबंगाल त्यांनी मांडले आहे.

शिवाय, ‘ज्या जाती एससी, एसटी, ओबीसीमध्ये येत नाहीत त्या जातींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 7 वर्षापुर्वीच 10 टक्के ई.डब्लु.एस.चे आरक्षण दिले आहे.’ असेही रिपब्लिकन रामदास आठवले यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात या मुद्द्यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात 10 लाख सरकारी नोकरी देण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून आज देशभरात 41 हजार जणांना सरकारी नोकरी देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचा एक भाग म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात प्रधानमंत्री रोजगार मेळावा अंतर्गत 200 हुन अधिक जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी, डी.आर.एम. रजनीश गोयल आदी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचावे

आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरला काय होणार?
महाघोटाळ्यातील रस्त्यांची कामे कधी सुरू होणार? आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

एकनाथ शिंदेंची साथ सोडून शरद पवारांचा जुना सहकारी स्वगृही!

रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी जास्त असते. रेल्वे ही लोकांची जीवनवाहीनी झालेली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या  लोकांची संख्या अधिक आहे. रेल्वे तिकीटांत वेटींग लिस्ट (प्रतिक्षा यादी) अधिक असते. तिकीट काढणाऱ्या  प्रत्येक प्रवाशाला वेटींगवर न ठेवता त्याला आसण व्यवस्था रेल्वेने दिली पाहिजे. त्यासाठी रेल्वेने डबे वाढविले पाहिजेत आणि सीट सुध्दा वाढविल्या पाहिजेत. रेल्वेच्या इंजिनात जेवढी क्षमता त्यानुसार रेल्वेने डबे वाढवून तिकीट काढणाऱ्या  प्रवाशांची आसन व्यवस्था करुन दिली पाहिजे अशी सूचना यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

राज्यात एकीकडे मनोज जरांगे-पाटील मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आग्रही आहेत. दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत आहे. तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून, मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. असे असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वेगळाच मुद्दा चर्चेत आणला आहे.

यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत आठवले साहेबांचा आरक्षणावर प्रति दीर्घ अभ्यास आणि चळवळ केली ओबीसी 52% मागासवर्गीय आदिवासी पंचवीस टक्के 77% अधिक मराठा 33% हे झाले एकशे दहा टक्के ब्राह्मण बनिया मुस्लिम समाजातील ओपन 125 टक्के कडे संख्या जाऊ लागली ओबीसी ची लोकसंख्या तर 63 ते 67% महाराष्ट्रात आहे कसं गणित सुटायचं जात न्याय जनगणना झाल्याशिवाय हे गणित सुटणार नाही त्यामुळे सरकारने वेळीच जात न्याय जनगणना करावी अन्यथा विनाकारण जाती जातीमध्ये तेढ वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button