सोशल

मंडलनामा क्रमशः 36.गोवंश हत्याबंदीचे संकट

मंडलनामा क्रमशः

36.गोवंश हत्याबंदीचे संकट

मुस्लिम ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याशी संबंध नसलेला एक प्रश्न निर्माण झाला होता. तो प्रश्न आता राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. परंतु, त्याकाळी आम्ही त्यातून एकजुटीने मार्ग काढला. काँग्रेस सरकार जाऊन राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार आले होते. केंद्रात जनता दलाचे एच. डी. दैवेगौडा व त्यांच्यानंतर आय. के. गुजराल हे पंतप्रधान असलेला हा काळ. शिवसेना-भाजप युती सरकारने महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात गोवंश हत्याबंदी कायदा केला. त्यामुळे मुस्लिमांतील कुरेशी, हिंदुंतील ढोर व चर्मकार समाजाच्या जगण्याच्या हक्कावर गदा आली. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांच्या धाडी सुरू झाल्या. कुरेशी समाजाला जनावरे कापता येईनात. जनावरे कापणे बंद झाल्याने गावोगावी चामडी तयार करणारे ढोर व त्यापासून वस्तू, पादत्राणे तयार करणाऱ्या चर्मकार समाजाला चामडे मिळेना. सर्वाधिक अडचण झाली ती कुरेशी समाजाची. कुरेशी समाजाचा समावेश मुस्लिम ओबीसींमध्ये होतो. ते लोक माझ्याकडे आले व त्यांनी काहीतरी मार्ग काढण्याचा आग्रह धरला. हा प्रश्न एकट्या कुरेशी समाजाचा नसून ओबीसींचा आहे, असे मी त्यांना म्हणालो. सुरुवातीला थोडी खळखळ करून ते तयार झाले.
मी नेहमी मदत करणारे कपिल पाटील यांना संपर्क केला. ते म्हणाले, आपण राष्ट्रपतींपर्यंत जाऊन या कायद्याला स्थगिती आणू. ते बोलतात तसे करतात. त्यामुळे मी व विलास सोनवणे यांनी राज्यातील कुरेशी बिरादरींत सपर्क करण्यास सुरुवात केली. या कामी नागपूर येथील ए. के. कुरेशी यांची मोठी मदत झाली. त्यावेळी केंद्रात मंत्री असलेले जनता दलाचे महाराष्ट्रातील
नेते प्रा. मधु दंडवते यांची कपिल पाटीलांसह भेट घेतली. इंद्रजीत गुप्ता, सोमनाथ चटर्जी यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर आम्ही महनीय राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या कार्यालयाकडे भेटीसाठी वेळ मागितला. राष्ट्रपतींची वेळ मिळेल की नाही याबद्दल शंका होती. शिवाय ते धार्मिक वृत्तीचे असल्याने आमच्या मागणीला कसा प्रतिसाद देतील, याबद्दल धाकधूक वाटत होती. राष्ट्रपतींनी आम्हाला भेटीची वेळ दिली. प्रा. मधु दंडवते, मी, कपिल पाटील, अब्दुल रहमान, ए. के. कुरेशी व चर्मकार समाजाचे कार्यकर्ते एकनाथ कांबळे, असे सहा जणांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला गेलो. त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. कुरेशी समाज फक्त जनावरे कापतो, पण हाडाचे व चामडे तयार करणारे कारखाने सवर्णांचे आहेत, हे त्यांच्या लक्षात आणून दिले. या कारखान्यांमधून काम करणाऱ्या लाखो लोकांचा रोजगार जाईल. शिवाय शेतकऱ्यांनी भाकड जनावरांचे काय करायचे?, असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित केला. राष्ट्रपतींना आमचे म्हणणे पटले. त्यानंतर वातावरण बदलले व महाराष्ट्रात कुरेशी समाजावर आलेले संकट टळले.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button