भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती,महाराष्ट्र राज्य

भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती,महाराष्ट्र राज्य
आमच्या स्वातंत्र्याचं झालं काय?
भटके विमुक्त, आदिवासींच्या हाती आलं काय?
७२ व्या विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त, आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने भटके विमुक्त, आदिवासींच्या हक्कांसाठी राज्यव्यापी संवादयात्रा दि. २८ ऑगस्ट (पुणे) पासून ते २३ सप्टेंबर २०२४ (मुंबई) अखेर पर्यंत निघत आहे. या संवाद यात्रेची घोषणा तथा उद्घाटन बुधवारी दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे येथील महात्मा फुले वाड्यात झाले आहे. तर शनिवारी दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी या संवादयात्रेचा प्रत्यक्ष प्रारंभ सोलापूर येथील सेटलमेंट कॅम्पमधून होईल. हि संवाद यात्रा महाराष्ट्र राज्याच्या ५ विभागातील १८ जिल्हाच्या ३० तालुक्यातून जाऊन शेवटी राजधानी मुंबई येथे मंत्रालयात आपल्या मागण्या घेऊन धडकणार आहे.
गेल्या ७२ वर्षात या वंचीत समुहाचे मुलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. त्यांच्या मानवी हक्कांची सतत पायमल्ली होत आहे. हा समुह विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो मैल दूर आहे. त्यामुळे भटके विमुक्त, आदिवासी जमातीची ताकत एकत्रित करून त्यांचे प्रश्न, समस्या शासनाकडे मांडणे तसेच आणि विमुक्त दिन साजरा करणे या उद्देशाने ही संवाद यात्रा महाराष्ट्रभरातून
निघणार आहे.
संयोजक
भटके विमुक्त-आदिवासी संयोजन महाराष्ट्र राज्य
भटके विमुक्त, आदिवासी समुदायाच्या प्रमुख मागण्या
१) भटके विमुक्तांची जातिनिहा आदिवासी य जनगणना करावी.
२) महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भटके विमुक्तासाठी स्वतंत्र मंत्रालय व त्यासाठी भटके विमुक्त जमातीतीलच मंत्र्याची नेमणूक करावी.
भटके विमुक्त, आदिवासी यांचे गायरान, गावठाण, वनजमीन व इतर निवासी व उपजिवीका अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्यात यावे.
४) न्या. अशोक अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शासन निर्णयानुसार १४ विमुक्त व २८ भटक्या जमातींचा सर्वकष अभ्यास करून केंद्रशासनाकडे केलेल्या अनुसूचित जाती जमाती मध्ये समाविष्ट करण्याबाबत केंद्र सरकारला सादर केलेल्या शिफारसीनुसार तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. व केंद्रीय पातळीवर सर्व भटके विमुक्त समुहाचे एकत्रीकरण करावे.
५) भटके विमुक्त कल्याणासाठी पर्याप्त बजेट असावे. व आदिवासींसाठी बजेटचा कायदा करण्यात यावा. ६) बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर भटक्या विमुक्ताच्या कल्याणासाठी विचाराधीन असणाऱ्या वनार्ती (वसंतराव नाईक
संशोधन व प्रशिक्षण संस्था) तात्काळ कार्यान्वित करावे. ) अनुसूचित जाती, जमाती यांच्यावरील होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी प्रतिबंध घालण्यासाठी असणाऱ्या कायद्यामध्ये
७ (ATROCITY act) मुळ भटके, विमुक्त जातीचा समावेश करून त्यांना संरक्षणकवच मिळावे. ८) भटके, विमुक्त जमातीचे पारंपारिक व्यवसाय जसे कि, कटलरी विकणे, भंगार गोळा करणे आदी कामासाठी त्यांना परवाने व
ओळखपत्र शासकीय स्तरावरून मिळावे. ९) भटक्या, विमुक्त जमातीतील मुलांना बालवाडी ते पदवीत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे. या समुहातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृहे असावीत. भटके विमुक्त, आदिवासी मुलांच्या मातृभाषेचा वापर करून शिक्षण देणे,
१०) भटके विमुक्त आदिवासी समुदायातील युवक-युवतींना छात्रवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, ११) राज्याच्या सर्व विद्यापीठांमध्ये ‘विमुक्त जाती व भटक्या जमातीं अध्यासन व संशोधन केंद्र’ स्थापन करणे
१२) नागरिकत्व पुरावे मिळविण्यासाठी एक खिडकी पद्धत असावी.
१३) महाराष्ट्र शासनांनी भटके विमुक्त आदिवासी समाजाचे नागरिकत्व पुराव्यांचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनास नागरिकत्व पुरावे काढून देण्याच्या अनुषंगाने दर दोन महिन्यांनी शिबीर / मेळावा आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावावा.
१४) भटके विमुक्त, आदिवासी समाजाच्या योगदानाला मान्यता देणे आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी 31-ऑगस्ट हे ‘विमुक्त दिन’ म्हणून घोषित करण्यात यावे.
१५) विमुक्त दिनाच्या निमित्ताने १६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या पंधरवड्यात राज्यभर ‘भटके विमुक्त पंधरवडा’ म्हणून साजरा करण्यात यावे. समाजाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या पंधरवड्यात “शासन भटके विमुक्त्यांच्या दारी” ही संकल्पना राबविणे, यामुळे समाजाच्या समस्यांवर चर्चा होईल आणि त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्यास शासनाला मदत होईल.
१६) या घटकांप्रती प्रशासनास संवेदनशील करणे, महाराष्ट्र शासनने जिल्हा प्रसाशनसह सर्व ग्रामपंचायतींना आदेश द्यावे कि त्यांनी प्रत्येक जिल्हा आणि ग्रामपंचायतीच्या स्तरावर ‘भटके विमुक्त आदिवासी विकास आराखडा तयार करावा. या आराखड्यात भटके विमुक्त आणि आदिवासी समाजातील नागरिकांना जागा, घर, शिक्षण, आरोग्य, मनरेगा योजनेद्वारे रोजगार आणि वस्तीत पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याबाबतचे स्पष्ट नियोजन करावे.
१७) भटके विमुक्त जमातीतील धनगर, रामोशी व वडार या स्वतंत्र जमातीसाठी असणाऱ्या महामंडळाचा लाभ सर्व भटके विमुक्त जमातीला देण्यात याव.
ई-मेल: ntdntst.sanyonjansamiti22@gmail.com
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




