सोशल

प्रस्थापित घराणेशाहीच्या विळख्यात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक !..

प्रस्थापित घराणेशाहीच्या विळख्यात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक !..

[gspeech-button]

राहुल गांधी महाराष्ट्रातील प्रस्थापित नेत्यावर नाराज दुर्लक्षित ओबीसी समाजाला उमेदवारी का नाही!…

विधानसभा निवडणुकीचे चित्र जसजसे स्पष्ट होत आहे , तसे राजकारणातील घराणेशाहीने सर्वच पक्षाला विळखा घातल्याचे दिसत आहे घराणे शाहीबाबत बोटे मोडणाऱ्यांचे हातही मोजताना अपुरे पडतील, अशी सग्यासोयऱ्यांची जंत्री यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधील घराणेशाहीला नेहमीच लक्ष्य करून तोंड भरून टीका करणाऱ्या भाजपसह शिवसेना (ठाकरे), मनसे, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनी आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक जणांना उमेदवारी विली आहे. विशेष म्हणजे, एकाच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला एका पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास पक्षांतर करून उमेदवारी पदरात पाडून घेण्यात येत असल्याचे प्रकारही या निवडणुकीत घडत आहेत. ‘एक कुटुंब, एक उमेदवार’ असे तत्व पाळणाऱ्या भाजपनेही यंदा आपल्या यादीत नात्यागोत्यांना महत्व दिले आहे. ची जागा दुसऱ्या मित्र पक्षाला सोडली आहे त्या पक्षात ही पक्षांतर करून उमेदवार घुसवले आहेत खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे कणकवलीतून लढत असताना दुसरे पुत्र नीलेश यांना कुडाळमधून उमेदवारी देता यावी, म्हणून त्यांना शिवसेना (शिंदे) मित्र पक्षात प्रवेश दिला आहे. दुसरीकडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे वांद्रे पश्चिममधून तर त्यांचे बंधू विनोद हे मालाड पश्चिममधून् ? निवडणूक लढणार आहेत. अशी अनेक उदाहरणे भाजपच्या यादीत दिसत आहेत. गेल्या पाच वर्षांत झालेल्या पक्षफुटींमुळे लोकसभेतील अपयशामुळे प्रमुख दावेदार पक्षांची संख्या वाढली आहे. महायुती-महाआघाडीच्या समीकरणांमुळे अनेक ठिकाणी इच्छुकांना मुरड घालावी लागत आहे. त्यातच सर्वपक्षीय नेत्यांनी मुले, पत्नी, मुली, सुना, भाऊ अशा घरातल्या घरातच उमेदवारी ठेवण्याची खबरदारी घेतली आहे. ‘निवडून येण्याची क्षमता’ हा ‘निकष’ लावल्याचे सांगत घराणेशाहीला मात्र वारेमाप प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे भविष्य काय, असा सवाल आता विचारला जाणे साहजिकच आहे. भाजपमधून हा असंतोष आता उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे. हे विशेष. भाजपने यापूर्वी काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीची टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ४५ उमेदवारांच्या यादीत उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा, आमदार लता सोनवणे यांचे पती चंद्रकांत, आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल यांची नावे आहेत. मनसेच्या यादीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना (ठाकरे) पक्षातून उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हेही पुन्हा निवडणूक लढवत आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली तर बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. भाजपचे गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढवत असताना त्यांचे पुत्र संदीप शेजारच्या बेलापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या तिकिटावर लढणार आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात छगन भुजबळ हे निवडणूक लढवत असून त्यांचे पुत्र पंकज यांना गेल्याच आठवड्यात विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यात आले. आता भुजबळांचे पुतणे समीर हेही नांदगावमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. नवाब मलिक आणि सना मलिक हे पितापुत्रही निवडणूक लढवू इच्छितात. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील चित्र पाहिले तर राजकीय निष्ठा, विचारसरणी, तत्त्व याला दुय्यम स्थान आल्याचे दिसते. उमेदवारीसाठी सोयीची पक्षांतरे, एकाच घरात दोन पक्ष हे आता नवीन नाही. आमदार होण्याच्या इर्षेपायी विचार दुय्यम ठरलेत. राजकीय पक्षांची उमेदवारी यादी पाहिली तर घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे. त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही. उमेदवारी दिल्यानंतर त्याचे समर्थन करण्यासाठी संबंधित तो किंवा ती पक्षात काम करत असल्याचे सांगितले जाते. या साऱ्यात पक्षासाठी कष्ट उपसणारा सामान्य कार्यकर्ता दुर्लक्षित राहतो. यात मतदारांनाही गृहित धरले जाते. अर्थात या काही प्रमाणात मतदारांनाही दोष दिला पाहिजे. कारण अशा घराणेशाहीच्या प्रतिनिधींना ते संधी देतात. यावेळी राज्यात उमेदवारी याद्यांवर नजर टाकल्यावर हेच चित्र दिसते. इतरांपेक्षा वेगळा पक्ष अशी भाजप आपली नेहमी ओळख सांगतो. मात्र सत्ता मिळवण्यासाठी आता या पक्षातही घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्या आमदार किंवा खासदाराचा मुलगा त्या पक्षात वर्षानुवर्षे काम करत असेल तर, त्याला उमेदवारी देणे हा भाग वेगळा. अशा वेळी ही उमेदवारी समर्थनीय ठरते. मात्र अचानक केवळ जिंकण्याच्या क्षमतेच्या (इलेक्टीव्ह मेरीट) नावाखाली संबंधित लोकप्रतिनिधीच्या नात्यातील व्यक्तीला संधी देणे अयोग्य आहे. यातून पक्षात असंतोष वाढतो. भाजपने महाराष्ट्रात उमेदवारी देताना बहुतेक जुन्या आमदारांनाच संधी दिली. फार क्वचित विद्यमान आमदार वगळले. मात्र जेथे वगळले तेथे अनेक ठिकाणी संबंधितांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली. जवळपास २० जण हे घराणेशाहीशी संबंधित आहेत. थोडक्यात प्रत्येक पाच उमेदवारांमागे एक जण हा यातून आला आहे. त्यामुळे घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजपला आता लक्ष्य केले जात आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या यादीतही हाच प्रकार दिसतो. जवळपास ४५ जणांच्या पहिल्या यादीत अनेक नावे घराणेशाहीशी संबंधित आहेत. बदलाला मोठी संधी नाही. तरीही जेथे शक्य आहे तेथे तगडा उमेदवार देण्याच्या प्रयत्नात घराणेशाहीचे प्राबल्य उमेदवारी यादीवरून दिसते. ठाकरे गटानेही आदित्य ठाकरे यांचे मावसबंधू वरुण सरदेसाई यांना रिंगणात उतरवले आहे. याखेरीज रत्नागिरीत

भाजपचे माजी आमदार सुरेंद्रनाथ तथा बाळ माने यांना ज्या दिवशी

पक्षात प्रवेश केला त्याच दिवशी उमेदवारी मिळाली. याखेरीज

डोंबिवली, सिल्लोड या ठिकाणी बाहेरील उमेदवारांना संधी देण्यात

आली आहे. शरद पवार गटात बारामतीमधून युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले

येथे पवार कुटुंबातच लढत होईल असे चित्र

आहे. याच कुटुंबात तीन खासदार आहेत. आता आमदारही किमान दोन होतील असे विह रचना केलेली आहे . पुढे जाऊन अर्धे मंत्रिमंडळ पवार घराण्याचे होईल असे दिसते लाचार बिचारी जनता काय करते त्यांना पवार कुटुंबियाने करीत धरले आहे अजून त्यांची सगळी शहराची यादी आली तर फार मोठी किमान डझनभर आमदार होतील

काँग्रेसची उमेदवारी यादी अद्याप झालेली नाही, मात्र घोषित उमेदवार

पाहता सामान्य कार्यकानि केवल झाड लोड करायची सतरंज्या उचलायचा जय जय कार करायचा झेंडे लावायचे पोस्टर लावायचे बॅनर उभा करायचे सभेला माणसं घेऊन यायचे टाळ्या वाजवायच्या दादा बाबा अण्णा की जय म्हणत त्यांचा उदो उदो करण्यात आयुष्य घालवायचे निवडून आल्यावर एखादा फोटो बरोबर काढला की खुश कसली लोकशाही इन काय रामेशाही चालू झाली राजेशाही गेली प्रस्थापितांची घराणेशाही झाली कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा! .. मतदारांनी क्रांती करण्याची गरज आहे या प्रस्थापितांना घराणेशाही ना त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे सर्वसामान्यांना मतदान करण्याची गरज आहे तरच लोकशाही टिकू शकेल सत्यमेव जयते!

दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button