आरक्षणाची गरज कोणाला!…. जमीनदार सत्ताधारी राजकर्ती जमात मराठ्यांना की भटक्याना?

आरक्षणाची गरज कोणाला!…. जमीनदार सत्ताधारी राजकर्ती जमात मराठ्यांना की भटक्याना?
पिंगळा जोशी गोसावी गोंधळी डवरी कैकाडी पारधी मसनजोगी मरीआई गाडीवाले काशी कापडी वैदू नंदीवाले रामोशी पारधी माकडवाले उंट वाले घिसाडी अस्वल वाले डोंबारी रामोशी पारधी मदारी इत्यादी 42 जातीच्या भटक्याना?.. की मराठ्यांना!…

.. शासनाने गांभीर्याने विचार करण्याची
गरज ग्राउंड रिपोर्ट सत्यशोधक शंकराव लिंगे
वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे राहत असलेला अनेक भटक्या जातींचा समूह काही पाल ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदानामध्ये तात्पुरती राहतात आणि चार-सहा महिन्या नंतर ते दुसऱ्या गावाला जातात
हजार एक लोकांचा समूह सरकारी जागेमध्ये तळ्यातल्या गाळ पेर जमिनीमध्ये राहतो म्हणजे ज्यादा पाऊस झाला तर यांच्या घरामध्ये पाणी शिरते येथील लोकांसाठी सरकारी जमीन त्यांच्या नावावर झालेली नाही घरचा उतारा मिळत नाही भोगवटादार उतारा मिळत नाही घरकुल मिळत नाही रेशन कार्ड आधार कार्ड मिळविण्यासाठी चार चार हजार रुपयाची लाच मागितली जाते मुलांना शिक्षण मिळत नाही दाखले नसल्यामुळे आश्रम शाळेमध्ये टाकता येत नाही
शिक्षण झाले तरी दाखल नसल्यामुळे नोकरी लागत नाही त्यामुळे मुलं मुली शिकत नाहीत रस्त्याची सोय नाही विज पाणी दिवाबत्तीची कमतरता आहे मतदान यादी मात्र आहे मतदान यादी प्रमाणे त्यांचे मतदान करून घेतले जाते परंतु आजपर्यंत त्यांना आमदार खासदार भेटले नाहीत कसली सोय अजून पर्यंत केली नाही हा समूह अनेक वर्षापासून इथं राहत आहे वेळापूर येथील राष्ट्रवादीचे मोठे नेते उत्तमरावजी जानकर साहेब यांनी त्यांना तळ्यातील जागा दाखवली त्या जागेमध्ये ते राहतात हा सर्व समुदाय उत्तमराव जानकर यांचे आश्रयामुळे या ठिकाणी राहतो त्यांना त्यांचे सहकार्य मिळते काही जनांचे पत्र्याचे शेड झालेले आहेत काही लोकांना कसलीच सोय नाही
संडास नाही बाथरूम नाही गटार नाही आरोग्याची कसली सोय मिळत नाही गरोदर महिलांना खावटी खुराक नाही अनुदान नाही रहिवासी दाखला नसल्यामुळे लाडली बहीण योजनेचा लाभ नाही शिक्षण नसल्यामुळे लाडका भाऊ नाही मोफत धान्याचा लाभ कोणाला मिळतो कोणाला मिळत नाही जातीचा दाखला मिळत नाही अनेक समस्यांनी ग्रस्त असलेला हा भटका समाज या ठिकाणी डवरी गोसावी गोंधळी मन्यार आतार पिंगळा जोशी कुडमुडा जोशी वासुदेव डोंबारी इत्यादी भटक्या जाती जमाती या ठिकाणी पंधरा-वीस वर्षापासून राहतात त्यांचे पारंपरिक व्यवसाय बंद पडत चाललेले आहे पोपटाकडून भविष्य सांगण्यासाठी आता बंदी आलेले आहे त्यामुळे त्यांची उपासमार चालू आहे काही लोक भंगारचा व्यवसाय करू लागले आहेत
काही लोक भांड्याच्या व्यवसाय करू लागले काही लोकं मोल मजुरी करू लागले शेतीचे काम करू लागलेत काय सेंट्रींग चे काम करतात मिळेल ते काम करण्याची तयारी या समाजाची आता झाली आहे यांच एकच म्हणणं आहे आमचा पारंपारिक पिंगळा जोशी उडमुडा जोशी वासुदेव या धंद्यास प्रोटेक्शन मिळाव पारंपारिक धंदा करण्यासाठी परवानगी मिळावी नवीन भांड्याचा भंगार चा धंदा करण्यासाठी किमान स्टार्ट अप एक लाख रुपये कर्ज नाममात्र व्याजदरात मिळावं काही प्रोत्साहन अनुदान मिळावं विधवा निराधार अपंग योजना लाडकी बहीण योजना मुलांना मोफत व्यवसाय शिक्षण आश्रम शाळेत प्रवेश जातीचे रहिवासी चे सर्व दाखले मिळावेत अंतोदय रेशन कार्ड ओळखपत्र कर्ज द्यावे ते आम्ही हप्त्याने परतफेड करू घरकुल द्यावं नळ योजना द्याव्या रस्ता नीट करावा गटार संडास बाथरूमची योजना करावी सध्या ही सर्व लोक उघड्यावर जातात
महिलांना शरमेने मान खाली घालावी लागते रात्री अंधारी तळ्याच्या शेजारील साप विंचू खेकडे इत्यादी चावण्या ची अत्यंत भीती असते सरकारने या बाबीचा गांभीरणी विचार केला पाहिजे यांचा सर्वे करण्यासाठी एक समिती नेमून गावाच्या बाहेरील पालावर राहणाऱ्यांची महाराष्ट्रातील सर्वांची जनगणना करून त्यांच्या त्यांना सरकारी सर्व सुख सुविधा उद्योगधंद्याची सोय करावी यांना शिक्षण नाही कुणाचे मार्गदर्शन नाही त्यामुळे इथे राहणाऱ्या लहान मुलं महिला वृद्धांची अत्यंत हाल होत आहे डिलेवरी झालेल्या भगिनीची अवस्था पाहिली झोपडी पावसात गळत होती बाहेरून पाणी येत होते जन्मलेले दहा पंधरा दिवसाचे बाळ अक्षरशः थंडीने कुड कुढत होते बाळांतीनला कोणतेही सोय नव्हती त्यात
झोपडीमध्ये स्वयंपाक करणे त्यामुळे धूर सगळा त्यांच्या डोळ्यात मुलांच्या डोळ्यात जात होता या भटक्या समाजाची अत्यंत करुण कहानी आहे खरं म्हणजे यांची अवस्था एस सी पेक्षाही खराब आहे त्यामुळे यांचा समावेश एसटी किंवा एस सी मध्ये करावा यांना सध्या एनटी ब म्हणजेच ओबीसी मध्ये घातले आहे धनगर समाजाची एसटी आरक्षणाचीमागणी आहे त्यांच्याबरोबर सर्वच भटक्यांना एस सी किंवा एसटीमध्ये घालाव जात निहाय जनगणना करावी
या जातीमध्ये प्रगत सत्ताधारी मराठा समाज येऊ पहात आहे या भटक्यापेक्षा मराठा समाज गरीब आहे का जे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागत आहे त्यांनी यांच्या पालावर जाव कसे जगतात काय काम करतात काय खातात त्यांच्या मुलाबाळा लेकरांची काय अवस्था आहे म्हणजे समजेल तुम्ही कुठे आहात आणि ते कुठे आहेत आणि मग गरजवंत कोण आहेत सांगा त्या जस्टीस शिंदे जस्टीस भोसले यांना त्यांच्याही नोंदी शोधा रातोरात दाखले द्या रातोरात यांच्यासाठी पण जीआर काढा सरकारने जातीसाठी माती खाण्यापेक्षा या गरीब भूमिहीन निराधार बेघर असाह्य भटक्यांना अगोदर सर्व दाखले सोयी सुविधा द्या याचे पुण्य खरोखर तुम्हाला मिळेल अन्यथा त्यांचा शाप तुम्हालाच लागेल पाप ही तुम्हालाच फेडावे लागेल परिणाम ही तुम्हालाच भोगावे लागतील जरा विचार करा माणुसकी दाखवा अशी मागणी इथल्या गरीब असाह्य भटक्या जनतेची आहे सरकार दखल घेईल असे वाटते!
स्पेशल रिपोर्ट दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आपल्या बातमी व्हिडिओ पाठवा निर्भीडपणे प्रसिद्ध करू ,,,



