सोशल

कुणबी सर्टिफिकेट च्या माध्यमातून ओबीसी मध्ये होत असलेल्या घुसखोरी विरोधात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे ओबीसी संघटनेंची तक्रार दाखल

कुणबी सर्टिफिकेट च्या माध्यमातून ओबीसी मध्ये होत असलेल्या घुसखोरी विरोधात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे ओबीसी संघटनेंची तक्रार दाखल

आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मागासवर्गीय आयोग, दिल्ली येथे ओबीसी वेलफेयर फौंडेशन चे ऍड मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट घेतली. सध्या महाराष्ट्र मध्ये सूरू असलेल्या आक्रमक, हिंसक आंदोलना च्या दबावाला बळी पडून राज्य सरकार ने शिंदे कमिटी बनवली आणि.. आणि वेगवेगळे शासन आदेश काढून, प्रचलित प्रक्रियेत शिथिलता आणून 57 लाख नोंदी च्या आधारे कुणबी सर्टिफिकेट देण्याची बेकायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे ओबीसी चे आरक्षण संपुष्टात येणार आहे.

[gspeech-button]

एवढं कमी म्हणून ” जात प्रमाण पत्र देण्याच्या कायद्यात सुधारणा म्हणून ” सगे सोयरे ” ” गणगोत ” असे शब्द टाकण्यासाठी 26 जानेवारी रोजी अधिसूचना काढली आहे.याबाबत अध्यक्ष हंसराज अहिर यांना माहिती दिली व याबाबत आयोगाने लक्ष घालून राज्य सरकार ला असल्या प्रकाराबाबत समज द्यावी अशी विनंती केली.

तसेच 103 व्या घटना दुरुस्ती नुसार Article 338B अन्वये ओबीसी चे हक्क, अधिकार, आरक्षण चे संरक्षण करण्याची नैतिक, कायदेशीर जबाबदारी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची आहे, त्यामुळे आपण राज्यतील ओबीसी समाजाच्या समस्या सोडवाव्या व ओबीसी मधील अतिक्रमण रोखून आपली जबाबदारी पार पाडवी असे पत्र दिले.

आपले ओबीसी बांधव
ऍड मंगेश ससाणे,
मृणाल ढोले पाटील. दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button