जय बाळूमामा ।। जय हलसिध्द नाथ ।।।।।

प्रेस नोट
जय बाळूमामा ।। जय हलसिध्द नाथ ।।।।।
बेलाटीच्या बाळूमामा मंदिरात जन्मोत्सवाचे आयोजन
सद्गुरू संत बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रम
प्रतिआदमापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयपूर-पुणे या राज्य मार्गावरील उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील सद्गुरू संत बाळूमामा मंदिरात जन्मोत्सवानिमित्त १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील-बेलाटीकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) च्या मुर्तावर कार्यक्रमास प्रारंभ होणार असून यादिवशी भजन, कीर्तन व भारूडाचा कार्यक्रम होणार आहे.
रविवार, १३ ऑक्टोबर रोजी रविवारी बाळूमामांचा वार असल्याने यादिवशी दिवसभर गर्दी असते. सकाळी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व धनगरी ओव्या आणि भजनाचा कार्यक्रम होणार आहेत.
सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी एकादशी यादिवशी दिवसभर भजन व भारूडाचा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी जन्मोत्सव असल्याने दिवसभर भारूड, भजन व धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच याचदिवशी ४.२३ च्या मुहूर्तावर जन्मोत्सवानिमित्त यावेळी पाळण्याचा कार्यक्रमासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार आहे.
बुधवार, १६ ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमेनिमित्त बाळूमामांची पालखी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोजगरी पौर्णिमा देवींच्या कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. दररोज दिवसभर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये भाविक भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या पत्रकार परिषदेस अध्यक्ष श्रीराम पाटील, सिद्राम वाघमोडे, मंद्रूपचे निवृत्त शिक्षक शेंडगे, अमर कांचन आदी उपस्थि होते
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01


