सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 52

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 52
कोरडे (माळी)
कृष्णाजी सोनाजी (जन्म १८८५-मृत्यू १९३०)
सत्यशोधक कृष्णाजी सोनाजी कोरडे (माळी) राऊत हे मौजे बेलोरा, तालुका मोशीं, जिल्हा अमरावती येथील सत्यशोधक असून नव्याने स्थापन झालेल्या यशवंतराव खुशालराव देशमुख अध्यक्ष असलेल्या बेलोरा सत्यशोधक शाखेचे ते क्रियाशील सदस्य होते. इ. स. १९०२ साली जनार्दन नारायण भट यांनी उभ्या केलेल्या बेलोरा अभियोगात ते एक प्रतिवादी होते. १ जानेवारी १९०५ साली बेलोरा शाखेतर्फे शाहीर भीमराव महामुनींच्या जलसा कार्यक्रमाचे आयोजन बेलोरा येथे करण्यात आले होते. या प्रबोधनपर कार्यक्रमासाठी कृष्णाजी यांनी परिश्रम घेतले होते. बेलोरा सत्यशोधक शाखेने जलसा खेळ संपन्न झाल्यावर शाहीर महामुनींना एक प्रशस्तिपत्र दिले होते. या पत्रावर यशवंतराव देशमुख, भगवानजी डवरे यांच्यासह कृष्णाजी सोनाजी राऊत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संदर्भ- १. विद्याप्रकाश- भीमराव महामुनी
कोरे
बसवराज
(जन्म-२०-२-१९५७)
आ. बसवराज कोरे हे हरंगुळ, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून, सध्या जालना येथील मत्स्योदरी महाविद्यालयात मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. बसवराज कोरे हे विद्यार्थिदशेपासून पुरोगामी चळवळीत सक्रिय होते. पुढे जालना येथील सत्यशोधक चळवळीत ते सहभागी झाले. जालना सत्यशोधक समाज शाखेचे ते सदस्य आहेत. सत्यशोधक समाजाच्या वतीने होणाऱ्या साहित्य संमेलनात त्यांनी कथाकथन केले आहे. त्यांच्या नावावर ‘मन्मथस्वामी गाथा’ आणि ‘शब्दशिल्प’ या वैचारिक ग्रंथाचे संपादन असून त्यांनी अनेक नवोदित ग्रंथकारांच्या ग्रंथांना प्रस्तावना दिल्या आहेत.
कोल्हे
बळवंतराव सखारामजी
(मृत्यू-जुलै १९३१)
महात्मा जोतीराव फुले यांनी स्थापन केलेल्या पुणे सत्यशोधक शाखेचे विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातील सचिव पुढे अध्यक्ष झालेले पंडित बळवंतराव सखारामजी कोल्हे (गुत्तेदार) हे पुणेकर (भवानी पेठ-सापिका) सत्यशोधक होत. महात्मा फुले यांच्या निकटवर्तीयांपैकी कोल्हे असल्याने क्रांतीमाँ सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून आरंभी शाळेत ने-आण करण्याचे काम त्यांनी आनंदाने केले.
पुढे फुले दाम्पत्याच्या निधनानंतर सत्यशोधक समाज संघटन एक दशकभर निष्प्रभ झाले. मंदावत चाललेल्या सत्यशोधक समाज संघटनेला इ. स. १९१० च्या सुमारास फुलेतर पिढीतील सत्यशोधकांनी संघटनेतील मरगळ झटकण्याहेतू सत्यशोधक चळवळीचा पुनश्च एकदा आरंभ करण्याचे सुतोवाच केले. या अनुषंगाने सत्यशोधक पत्र ‘दीनबंधु’, ‘दीनमित्र’, ‘प्रगति’ आदी पत्रांमधून वैचारिक खल खळखळत राहिला. दरम्यान, या वैचारिक खलाची दखल घेऊन पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) ची सत्यशोधक शाखा पुढे आली. दरम्यान, ‘खेड’ शाखेचे पदाधिकारी सत्यशोधक विवाहाच्या अनुषंगाने कोर्टकज्जात अडकल्याने पाच-सहा महिन्यांत या शाखेने अधिवेशन आयोजनासंदर्भात असमर्थता दर्शविली. त्यामुळे पुणे सत्यशोधक शाखेने सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन घेतले. पुणे सत्यशोधक शाखेचे अध्यक्ष भीमाजी बिरमल, उपाध्यक्ष गणपतराव बिरमल, बळवंतराव कोल्हे आणि त्यांच्या सत्यशोधक सहकाऱ्यांनी १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथील भवानी पेठेतील बालीवाला थिएटरात हे अधिवेशन संपन्न केले.
या अधिवेशनाने सत्यशोधक समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा सुस्थिर केली. या अधिवेशनाने दोन दशकानंतर सत्यशोधक समाजाला नूतन केंद्रीय कार्यकारिणी दिली. नूतन अध्यक्ष दिले. नूतन पदाधिकारी दिले. नूतन घटना दिली, प्रस्तुत क्रांतिकारी घटनेचे श्रेय पुणे सत्यशोधक शाखेचे आणि तत्कालीन
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




