♦उत्सव बळीराजाच्या पुनरागमनाचा

♦उत्सव बळीराजाच्या पुनरागमनाचा
पुण्यवंत पाताळ लोकीं नेला ।
दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरटयाचा बहुमान वाढविला ।
कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
– संत जनाबाई
आम्ही वाट पाहत आहोत ,बळीराजाच्या पुनरागमनाची. हजारो वर्षापासून आम्ही त्याला स्मरणात ठेवले आहे. तो हिरण्यकशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या, बाणासुराचा पिता आणि उषेचा आज्जोबा. आणि मातृसत्ताक स्त्रीसत्ताक परंपरेच्या निऋतीच्या राज्याचा शेवटचा वारसदार. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व.सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षा पूर्वी होऊन गेलेला एक महानायक, महासम्राट,एक महान तत्ववेत्ता.
हजारो वर्षापासून आमच्या माय-माऊल्या दसरा दिवाळीला तुझ्या आगमनाचा उत्सव साजरा करतात. त्या मोठ्या आनंदाने तुझा राज्य येऊ दे म्हणतात. आज भलेही वामनाचे राज्य असो,आम्ही मात्र तुझ्याच पुनरागमनाची वर्षानुवर्षे आस लावून बसलेलो आहोत. आता आम्हाला हवा आहे, वामनाला पाताळात घालणारा बळीराजा. पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे , सर्वहारांचे अभेद राज्य उभं करणारा महासम्राट बळीराजा.शेतातील नांगराचा सोन्याचा फाळ आणि अंगणातील सोन्याचे रांजण एवढा वैभवसंपन्न शेतकऱ्यांचा राजा आम्हाला पुन्हा हवा आहे.
दैन्य दुख दारिद्र्य दुर करणारा समतेचे राज्य उभे करनारा बळीराजा आम्हाला हवा आहे. म्हणूनच आम्ही त्याची पुन्हा पुन्हा वाट पाहतो आहोत, नक्कीच तो एक दिवस येईल एक नवा क्रांतिकारक बनवून…. नवा नायक बनून…
सुखासमाधाणाने नांदनाऱ्या बळीराज्यात एकदा वामन नावाची पिडा आली आणि कपटाने यज्ञाच्या खांबाला बांधुन आमचा बळीराजा संपवला गेला.
राजामारल्यावर त्याचे मुंडके लाथेने उडवले गेले.यज्ञदेवतेला रक्ताचा नैव्यद्य दाखवण्यात आला.नरमेध यज्ञ म्हणुन ते रक्त वैदिक पित होते.काय ही दशा केली गेली आमच्या पुर्वजांची.
आम्ही आसुर कुळाचे वारसदार बळीचे वंशज वामनाची वैदिक संस्कृती कधीच माननार नाहीत. आमच्या धमण्यान्मधे बळीराच्या आसुर कुळाचे रक्त वाहात आसेल तर ते आम्ही कसे नाकारायचे.
होय आम्ही आसुर आहोत.आसुर सम्राट हिरण्यकश्यपचा पनतु ,प्रल्हादाचा नातु ,विरोचणचा पुत्र ,कपिल यांचा पुतण्या,बाणासुराचे पिता. महासम्राट बळीराजा आमचा सख्खा पुर्वज होता.
आम्ही आमच्याच पुर्वजांचा गौरव करणार .
आम्ही बळीराजाचाच गौरव करणार…
रास्ट्रपिता जोतिराव फुले साहेब बळीराजाची बाजु घेताना म्हनतात .
आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ||
होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा ||
खंडोबा,जोतिबा || महासुभा ||१||
सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी ||
दशहरा,दिवाळी ||आठविती ||२||
क्षत्रिय भार्या “इडा पीडा जाओ ||
बळी राज्य येवो “||अशा का बा ?||३||
आर्य भट आले,सुवर्ण लुटिले ||
क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||
वामन का घाली बळी रसातळी ||
प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||
– जोतीराव फुले.
जगतगुरु तुकोबाराय सुद्धा बळीराजाची बाजु घेताना म्हणतात..
हरि तु निष्ठुर ,निर्गुण !
नाही माया बहु कठिण !!
नव्हे ते करिशी आण !
कवणे नाही केले ते !!
बळी सर्वस्वे उदार !
जेणे उभारिला कर !!
करोनी कहर !!
तु पाताळी घातिला !!
जय बळिराजा …
आपल्याही गावी , शहरात , वाड्यावर, वस्तीवर, तांड्यावर ग्रामपंचायत कार्यालयात , ओट्यावर , चौकात ऑफिसात किंवा घरात चौरंगावर बळीराजाची प्रतिमा ठेवून पुजन करावे.विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे . वारकऱ्यांना घेवुन टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळा काढावा किंवा बैलगाडीने मिरवून काढावी.
बळीराजाला कधीही विसरू नये त्याच्या नावाने दिवाळी साजरी करावी.
बळीराजा गौरव दिनाच्या सगळ्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा…




