मंडलनामा क्रमशः 43.महानायकाला पटले मुद्दे

मंडलनामा क्रमशः
43.महानायकाला पटले मुद्दे
दिलीपकुमार यांनी दुसऱ्या दिवशी घरी बोलावले याचा हसन कमाल, बाबुभाई कुरेशी व युसूफ लकडावाला यांना प्रचंड आनंद झाला. मला एकट्यालाच बोलावल्याचे त्यांना अजिबात वाईट वाटले नाही. कोणाला बोलावले यापेक्षा कोणालातरी बोलावले व ते आपल्या चळवळीची माहिती घेणार आहेत, याचेच मोठे अप्रूप. त्यांनी मला तयारी करून जायला सांगितले. माझ्यावर खूप दडपण आले. ज्या मुलाला कधीकाळी जालन्यातील मुसलमान, ओबीसीबद्दल विचारताच क्षणभरही उभे करत नव्हते, तो मुलगा महानायक दिलीपकुमार यांना मुस्लिम ओबीसीची माहिती देणार होता. ती रात्र माझ्यासाठी खूप कठीण ठरली. संधी मिळाली आहेच तर त्यांना चळवळीच्या बाजूने वळवायचे, असे वाटत होते. हे शक्य होईल का, अशी शंकाही येत होती. डोळ्याला डोळा लागत नव्हता. कधीतरी रात्री उशिरा झोप लागली.
दिलीपकुमार यांच्याकडे जायचे म्हणजे सकाळी लवकर उठायची घाई नव्हती. कारण दिलीपकुमार झोपेतून उशिरा उठत असत. चित्रपटांची कामे कमी झाल्याने त्यांना शुटिंगला जाण्याची घाई नसायची. ते निवांत आवरायचे व दुपारी दोननंतर भेटीगाठी घ्यायचे. त्यामुळे घाई नव्हती. मी माझे आवरले. माझ्याकडील सर्वात छान कपडे घातले. छान तयार होऊन दिलीपकुमार यांच्या घरी गेलो. सुरक्षारक्षकाकडून निरोप पाठवणे वगैरे औपचारिकता पूर्ण करून मी काही वेळात दिलीपकुमार यांच्यासमोर बसलो होतो. ते माझ्याकडे एकटक पाहत होते. गोरेपान, वयाची साठी पार करून चार-पाच वर्षे झाली असली तरी भक्कम बांधा व तीक्ष्ण नजर. राजबिंडे व्यक्तिमत्त्व कशाला म्हणतात ते त्या दिवशी समजले.
पाहुणचार झाल्यानंतर ते म्हणाले, ‘बोलो.’
पुन्हा एकच शब्द !
नाही तर ‘क्लास’ असेच म्हटले आहे. मुस्लिम समाजातील विविध व्यवसाय करणारे जसे बागवान, विणकर, तांडेल, पिंजारी, तांबोळी इत्यादी हिंदुंतील ओबीसीप्रमाणेच आहेत. त्यांना ओबीसींचे लाभ मिळू शकतात. मी पंधरा वर्षे प्रयत्न करत आहे. तुम्ही यात सहभाग घेतला तर भारतातील मुसलमान तुमचे
मी बोलण्यास सुरुवात केली. ‘भारतात मोठ्या संख्येने मुसलमान राहतात. त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. स्वातंत्र्यानंतर तर त्यांच्या विकासाकडे पुरेसे लक्षच दिले गेले नाही. समाजावर प्रचंड धार्मिक पगडा असून खूप कमी कुटुंबात आधुनिकता आहे. ज्यांची प्रगती झाली, ते स्वतःच्या कुटुंबापुरताच विचार करतात, त्यांना इतरांची काहीही चिंता नसते. म्हणजे मदतीचा हात मिळत नसल्याने मुस्लिमांचा विकास थांबला आहे.’ मी बोलत होतो. दिलीपकुमार शांतपणे ऐकत होते. माझ्या मांडणीत काहीतरी दम आहे, असे त्यांना काल वाटले असावे, त्यामुळेच तर त्यांनी मला घरी बोलावले. मी क्षणभर थांबलो. त्यांनी नजरेनेच इशारा केला; ‘कन्टिन्यूव’ ‘नुकताच मंडल आयोग लागू झाला आहे.
मंडल आयोग म्हणजे ओबीसींच्या विकासाचे महाद्वार आहे. डॉ. राममनोहर लोहिया, कर्पूरी ठाकूर, चौधरी ब्रह्मप्रकाश यांनी ओबीसींची चळवळ पुढे नेली. काका कालेलकर अहवाल केंद्र सरकारने नाकारला. केंद्र सरकारने राज्यांना त्यांच्या पातळीवर ओबीसींचे लाभ देण्याचे सांगितले. त्यानंतर दक्षिण भारतातील राज्यांनी ओबीसींसाठी मोठी तरतूद केली. उत्तर भारतातील राज्ये मात्र मागे आहेत. जनता पक्षाच्या काळात देशभरातील ओबीसींच्या मागासलेपणाचा अभ्यास करून शिफारसी करण्यासाठी खासदार बी. पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन झाला. हा अहवाल काँग्रेस सरकारने आठ-नऊ वर्षे दाबून ठेवला. त्यावर कार्यवाहीच केली नाही. जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंह सरकार आल्यानंतर तो स्वीकारण्यात आला. पण त्यांचे सरकार पडले व काँग्रेसच्या पी. व्ही. नरसिंह राव सरकारकडून अपेक्षित पद्धतीने मंडल आयोगाची अंमलबजावणी होत नाही.’ मी बोलत होतो.
‘मुस्लिम समाजाच्या विकासाचा मार्गही मंडल आयोगाच्या शिफारसीतूनच जातो. इस्लाममध्ये जाती नाहीत. हिंदुमध्ये जाती आहेत. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातील कलम ३४० मध्ये जातीचा नव्हे तर वर्गाचा उल्लेख आहे. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी विशेष सवलती द्याव्यात, असे त्यात म्हटले आहे. मंडल आयोगाच्या अहवालातही ‘कास्ट’ ऐकतील.’ दिलीपकुमार यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. त्यांना माझे मुद्दे पटत होते, असे वाटायला लागले. त्यांनी विचारले, ‘मुस्लिमांची स्थिती कशी काय बदलू शकते ?’
मी म्हणालो, ‘बीड जिल्ह्यातील गरीब मुसलमानांची सहा मुले डॉक्टर होऊ शकतात. मला या सहा मुलांची संपूर्ण माहिती आहे. खासगी महाविद्यालयात शिकल्यास त्यांना एमबीबीएस पूर्ण करण्यासाठी तीस ते पस्तीस लाख रुपये लागतील. पण ओबीसींचे प्रमाणपत्र व सवलत घेतल्यास शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. हात मोकळा सोडून वार्षिक खर्च केला तरी तीन, चार लाख रुपयांत ही होतकरू मुले एमबीबीएस होऊ शकतात.’ दिलीपकुमार यांनी विचारले, ‘मग ते असे का करत नाहीत ?’ मी म्हणालो, ‘त्यांच्या पालकांच्या धार्मिक व व्यावहारिक अज्ञानामुळे ते ओबीसी प्रमाणपत्र काढण्यास तयार नाहीत. शिवाय जातीचे पुरावे नसल्याने जात प्रमाणपत्र काढणे प्रचंड कटकटीचे आहे. हे सोपे होण्यासाठी विविध जीआर काढण्याकरिता शासनाकडे प्रयत्न करावे लागणार आहेत.’
‘और’, दिलीपकुमार यांनी विचारले. ‘इतनाही नहीं, ओबीसी प्रमाणपत्र घेतल्यास व्यवसायासाठी कमी व्याजाने कर्ज मिळेल. त्यावर अनुदानही मिळते’, मी म्हणालो. दिलीपकुमार यांच्यासाठी ही माहिती नवीन होती. मागास समाजासाठी शिक्षण व नोकऱ्यात आरक्षण आहे, हे त्यांना माहीत होते. कर्ज मिळते ही
माहिती त्यांना नव्हती. त्यांनी विचारले ‘कैसे ?’ दिलीपकुमार एक, दोन शब्दच बोलत. एव्हाना मला याची कल्पना आली होती. मी सांगितले, ‘महाराष्ट्रातील मागासवर्गीयांच्या व्यवसायाला अर्थसाह्य करण्यासाठी महात्मा फुले महामंडळाची स्थापना झाली आहे. या महामंडळामार्फत कर्ज दिले जाते.’
दिलीपकुमार यांचा कदाचित माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नसेल. ते म्हणाले, ‘मी तेथे जाऊन माहिती घेईन. तुम्ही ते शिक्षण, नोकऱ्या व मुसलमानांना कसे पटवायचे ते सांगा.’ मी म्हणालो, ‘मुस्लिम ओबीसी संघटनेतर्फे मी एक कार्यक्रम ठेवतो. तुम्ही तेथे या. तुम्ही आल्यास परिस्थिती एकदम बदलेल व लोकांचा विश्वासही बसेल.’
त्यावेळी मी हज हाऊसमध्ये एक मेळावा घेण्याचा प्रयत्न करत होतो. या कार्यक्रमाला दिलीपकुमार यांनी यावे, असे मला वाटत होते.
‘वो बादमे देखेंगे. मी उद्या महामंडळाच्या कार्यालयात जातो,’ दिलीपकुमार म्हणाले. माझ्यासाठी हा दुसरा धक्का होता. भारताचा हा महानायक महात्मा फुले महामंडळाच्या कार्यालयात स्वतः जाणार आहे यावर माझा विश्वासच
बसेना. माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून ते पुन्हा म्हणाले, ‘हो मी जाईन. माहिती घेईन.’
‘तुमचे म्हणणे मला पटत आहे. तुमच्या बोलण्यात सच्चाई दिसते. समाजाबद्दल तळमळ दिसते,’ आम्ही तासभर बोलत होतो. दिलीपकुमार यांनी आता निरोपाचे बोलणे सुरू केले. मी त्यांचा निरोप घेतला.
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

