सर्वोच्च न्यायालयाचे तीन महत्त्वाचे निर्णय

सर्वोच्च न्यायालयाचे तीन महत्त्वाचे निर्णय
१. मालमत्तेच्या नोंदणीचा अर्थ मालकी नसतो
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की एखाद्या मालमत्तेची नोंदणी झाली, म्हणून ती कायदेशीर मालकी असल्याचं समजलं जाऊ शकत नाही. हे निर्णय जमीन खरेदी-विक्री व्यवहारात महत्त्वाचे ठरतील.
२. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ४ महिन्यांत घ्या
मुंबई, औरंगाबाद आणि नवी मुंबईसारख्या शहरांत अनेक वर्षे प्रशासक कार्यरत आहेत. यावर कोर्टाने राज्य सरकारला फटकारले आणि ४ महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले.
३. उत्तर प्रदेशमध्ये जामीन मिळाल्यानंतरही बंदी न सुटल्याने फटकार
एका आरोपीला जामीन मिळाल्यानंतरही दोन महिने तुरुंगात ठेवण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारवर नाराजी व्यक्त केली आणि त्या आरोपीला पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.
हे सर्व निर्णय सामान्य जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
दिनबंधुनीवर संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01


