माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात एससी एसटी एनटी ओबीसी वी जयंती अल्पसंख्यांक मागासवर्गीयांच्या विविध मागण्याचे दिले निवेदन

माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात एससी एसटी एनटी ओबीसी वी जयंती अल्पसंख्यांक मागासवर्गीयांच्या विविध मागण्याचे दिले निवेदन
संत सावतामाळी महाराज तीर्थ क्षेत्र अरण पंढरपूरची वारी सावित्रीबाई फुले स्मारक नायगाव महात्मा फुले स्मारक पुणे सावित्रीबाई फुले भिडेवाडा स्मारक पुणे ओबीसीवर होणारा अन्याय या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली
माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब सप्रेम जय ज्योती
शंकरराव लिंगे, आपणास विनंती करण्यात येत आहे की, येत्या “पावसाळी अधिवेशनामध्ये” विषय मांडण्यात यावेत त्यापैकी
1. नाममात्र शुल्कात जमीन मोजणी करून द्यावी. जमीन मोजणीनंतर कमी जास्त क्षेत्र ज्याचे त्याला परत द्यावे. तशी नोंद दप्तरी, तलाठी, सर्कल, संबंधित अधिकारी यांच्याकडून करावी.
2. जात निहाय जनगणना झालीच पाहिजे
3. जस्टीस सुक्रे कमिटी, जस्टिस भोसले, जस्टीस शिंदे यांनी केलेल्या शिफारशी किंवा त्यांनी दिलेली कुणबी मराठा, मराठा कुणबी, तसेच 2004 पासून दिलेली सर्व सर्टिफिकेट रद्द करावेत. कारण तसा निकाल औरंगाबाद हायकोर्ट मध्ये लागलेला आहे. 2007 साली थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि 5 मे 2021 ला सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल लागलेला आहे…. कुणबी मराठा …मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाहीत. त्यामुळे त्यांना सोशिअली आणि बॅकवर्ड सर्टिफिकेट देऊ नये. 2004 नंतरची सर्व सर्टिफिकेट रद्द करण्यात यावीत.
4. मराठा कुणबी … कुणबी मराठा एकत्र जी लोकसंख्या 1931 आली होती, त्या प्रमाणात त्यांना निधी द्यावा. म्हणजे सारथी बार्टी आणि महाज्योती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा. लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त अण्णासाहेब पाटील, महामंडळाला सर्वात जास्त निधी मिळतो. त्याच नियमाने ओबीसींच्या व भटक्या विमक्तांच्या व्हिजेएनटी, एसबीसीच्या सर्व महामंडळाला मिळून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळावा.
5. हिंदी भाषेची सक्ती नसावी. तामिळनाडूमध्ये तसा कायदा आहे. त्यामुळेच तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय पक्ष शिरकाव करू शकत नाहीत किंवा दक्षिणेत आंध्र, तेलंगणा, केरळ, ओरिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षांचा सहभाग मोठ्या प्रमाणात नाही.
6. शेतकऱ्यांना वीज, पाणी, खते, बी बियाणे मोफत द्यावे.
7. शेतकऱ्यांना नाममात्र दोन टक्के व्याजाने कर्ज पुरवठा करावा. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे.
8. एससी, एसटी, एनटी, ओबीसी, अल्पसंख्यांक मधीलच जास्त करून सैन्य भरती होत असते. म्हणून… अग्निवीर सैन्य भरती…. बंद करून नेहमीप्रमाणे सैन्य भरती जुन्या पद्धतीने करावी.
9. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित केला आहे त्याची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्ट किंवा 28 नोव्हेंबर 2025 पूर्वी करावी.
10. पुणे विद्यापीठातील लोगो शनिवारवाडा बदलून त्या ठिकाणी फुले वाडा करावा
11. पुणे रेल्वे स्टेशनचे नाव “महात्मा ज्योतिराव फुले” असे करावे.
12. साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या बोगद्याना सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले यांचे नाव द्यावे
13. खडकवासला धरणास महात्मा ज्योतिराव फुले जलाशय असे नाव द्यावे इत्यादी मागण्याचे ठराव येत्या अधिवेशनामध्ये मांडावेत ही नम्र विनंती
14. महाराष्ट्रात भडगाव पाचोरा चाळीसगाव या तालुक्यात व अनेक ठिकाणी शेतात बिबट्या वाघाने मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार करीत आहेत. म्हणून वन मंत्री महोदयांनी आपल्या सरकारी यंत्रणेमार्फत तात्काळ बिबट्या व इतर वाघांचा बंदोबस्त करावा.
15. भडगाव व पाचोरा तालुक्यात वाळू माफिया गुंड, रात्री गस्ती वर असलेल्या, तलाठी व इतर कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. पोलीस संरक्षण मागण्यासाठी भडगाव पाचोरा पोलीस स्टेशन ला तलाठी गेले असता पोलीस सांगतात की, … आम्हाला सरकारी वाहन हवे… आमच्या गाड्या बाहेर गेल्या आहेत किंवा गाडी आहे पण ड्रायव्हर नाही किंवा आम्ही खाजगी वाहनाने येत नाही इत्यादी कारणे सांगतात. त्यामुळे वाळू माफियांवर गिरणा नदीच्या परिसरात गस्ती वर असलेल्या तलाठ्यांवर वारंवार जीवघेणे हल्ले होत आहेत. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनमध्ये केसेस ची नोंद केली आहे. पोलीस व पीएसआय इ. पैसे / लाच घेऊन वाळू माफियांना मॅनेज झाले असावेत म्हणून ते तलाठ्यांसोबत रात्री संरक्षणासाठी जात नाहीत. असे वाटते. म्हणून त्यांची सीबीआय चौकशी करून कारवाई करण्यात यावी व यापुढे वाळू माफियांवर गस्त घालणाऱ्या तलाठी व इतर कर्मचाऱ्यांसोबत बंदूकधारी पोलीस पाठवावेत. हल्ले केल्यास वाळू माफि7यांचा एन्काउंटर करावा. अशी मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब व कॅबिनेट मंत्री ना छगन भुजबळ साहेब यांना कळकळीची नम्र विनंती.
आपला विनीत
सत्यशोधक शंकरराव लिंगे
उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जय ज्योती जय क्रांती जय भीम वरील प्रमाणे सर्व ठराव येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडावेत ही नम्र विनंती आपला विनीत सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तीन बंधू न्यूज सेवक क्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01


