सोशल

दिवाळी म्हणजे काय

‼️ *ने म क* ‼️
————————————–
*दिवाळी म्हणजे काय ?*

*फुले विकणाऱ्या मुलीला पैसे देऊन तीच फुले तिलाच भेट दिल्यावर तिच्या चेहऱ्यावर उठलेली आनंदाची नेमकी चमक म्हणजे दिवाळी!.*

*केरसुणीचा फडा घेताना किंमतीची घासाघीस न करता दोन केरसुण्या घ्यायची आणि वर दहा वीस रुपये जास्त दयायचे त्यावेळी त्या गरिबांच्या चेहेऱ्यावर झिरपणारे ते नेमके मंद हसू म्हणजे दिवाळी!.*

*एखादया मोठ्या दुकानात गेल्यावर जे आवडते ते घेण्यासाठी आपल्याजवळ पुरेसे पैसे आहेत याची ज्या दिवशी पहिल्यांदा जाणीव होते ना तो नेमका क्षण म्हणजे दिवाळी!.*

*फराळ करायच्या प्रत्येक दिवशी दमलेल्या आईला, ताईला, वहिनींना योग्य ती मदत केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर कामाच दडपण कमी झाल्याचा नेमका भाव म्हणजे दिवाळी!.*

*सकाळपासून रात्री उशिरापर्यंत घामाघूम होऊन आवराआवरी केल्यावर अनारसे, लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा, शंकरपाळ्या डब्यातून भरताना गृहिणीच्या मनात जे समाधान भरून येत ना तो नेमका क्षण म्हणजे दिवाळी!.*

*आता आपण मोठे समजूतदार झालो आहोत याच भान होतो तो प्रत्येक वेळचा नेमका क्षण म्हणजे दिवाळी!.*

*आपल्या आई- बाबा आणि घरच्यांना त्यांच्या उपयोगाच्या वस्तू घेऊन दिल्यावर त्यांच्या देहबोलीतून जो नख शिखान्त उत्साह दिसतो तो नेमका क्षण म्हणजे दिवाळी!.*

*गरीब, गरजू यांना शिक्षणासाठी आणि त्यांच्या घरगुती उपयोगी वस्तू भेट दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ती नेमकी वेळ म्हणजे दिवाळी!.*

*परस्परांतील हेवे-दावे, झाले गेले विसरून मतभेदांची झळमट दूर करुन ते सगळ विसरुन एकत्र येण्याचा तो अत्युच्च नेमका सुवर्ण क्षण म्हणजे दिवाळी!.*

*अशी दिवाळी जी सर्व विश्वात सुख नादावे आहे ही उच्चतम भावना विश्ववंद्य हिंदू धर्म संस्कृतीचे तत्व जे अनादी अनंत पुरातन आहे अशी दिव्य दिव्यांची समृद्धीची दिवाळी आपणा सर्वांच्याच आयुष्यात आनंदाचे, सुखा – समाधानाचे, मांगल्याचे दिप प्रज्वलीत करत प्रत्येक वेळी येवो नांदत राहो हिच सदिच्छा!.*

*‼️शुभ दिपावली.‼️* दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

👏👏‼️✒️‼️👏👏

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button