सोशल

संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज सावता अंकुश वसेकर यांनी देहू आळंदी येथे प्रशिक्षण घेऊन त्यांच्या सहकार्याने अरण येथे भव्य शंभर खोल्यांचे भक्तनिवास,asवारकरी प्रशिक्षण केंद्र,भक्तांच्या राहण्याची, खाण्याच्या,पिण्याची सोय असणारे सुसज्ज सोयींनी युक्त तीन एकर जागेत अरणला भक्त निवास बांधण्याचा संकल्प!

🔴मागोवा:2🔴*

संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज सावता अंकुश वसेकर यांनी देहू आळंदी येथे प्रशिक्षण घेऊन त्यांच्या सहकार्याने अरण येथे भव्य शंभर खोल्यांचे भक्तनिवास,asवारकरी प्रशिक्षण केंद्र,भक्तांच्या राहण्याची, खाण्याच्या,पिण्याची सोय असणारे सुसज्ज सोयींनी युक्त तीन एकर जागेत अरणला भक्त निवास बांधण्याचा संकल्प!🟣🟣🟣🟣🟣

.अरण, तुळशी,देहू,आळंदी येथील लोकांना हाताशी धरून ट्रस्ट स्थापन केले. पुणे, पिंपरी-चिंचवड,मुंबई महाराष्ट्रातील संपन्न माळी समाज, मंत्री,आमदार,खासदार यांना भेटून करोडो रुपयांचा निधी गोळा केला. आणि 4 ऑगस्ट 2024 रोजी सावता महाराज यांच्या 729 व्या समाधी सोहळा सप्ताहामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन करून त्यांच्या मुखातून अरण तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग दर्जा देऊन तीर्थक्षेत्र विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला असल्याचे वधवून घेतले.*
*हे या मेळाव्याचे फलित होते.

मेळाव्यासाठी मंत्री छगन रावजी भुजबळ साहेब, अतुलजी सावे साहेब आमदार योगेश टिळेकर,जयकुमार गोरे साहेब,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह हजारो माळी समाजाचे नेते,कार्यकर्ते,सावता महाराज भक्त उपस्थित होते.*
अरण तीर्थक्षेत्राचे काम खऱ्या अर्थाने 200 वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून सावता महाराज संजीवनी समाधी मंदिर कळसाचे काम करण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने ‘दि सासवड माळी शुगर फॅक्टरी’ माळीनगर यांच्या वतीने हे बांधकाम झाले होते. सावता महाराज चरित्र मोठ्या प्रमाणात छापून महाराष्ट्रभर नाममात्र किमतीत वितरित केले होते
सावता महाराजांची मोठी शेती होती. शेतातच हे मंदिर बांधले होते. शेतातील बांधावरचा म्हसोबा ही पूर्वीपासून या मंदिरातच होता. त्यांची शेती कुळाने खंडाने गावातील लोकांना दिली होती त्याचं काय झालं
त्याचे काय झाले,शेती कुठे गेली कळत नाही.आता फक्त 14 गुंठे आणि मंदिराशेजारी 2 गुंठे राहते घर शिल्लक आहे.
देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील सर्व मंदिराचे धर्मदाय विश्वस्त संस्था बनण्याचे ट्रस्ट बनवून नोंदणी करण्याचा नियम कायदा करण्यात आला.त्यावेळी जनता फार अडाणी होती.याचा फायदा घेऊन गावातील शिकलेली प्रस्थापित मंडळी व ब्राह्मणांच्या सहकार्याने ट्रस्ट बनवण्यात आली आहे.त्याचप्रमाणे सावता महाराज मंदिराचे ट्रस्ट बनवले गेले होते.या ट्रस्ट मंडळींनी फार मोठ्या आस्थेने विकास केला असे दिसत नाही.फक्त मालकी आणि अधिकार त्यांच्याकडे आहे 1985 ला भुजबळ साहेब आणि पांडुरंग गायकवाड नाशिकच्या मंडळींनी मंदिरामध्ये मोठा हॉल बांधला .1995 ला सावता महाराजांच्या 701 व्या समाधी सोहळ्यानिमित्त सावता महाराजांच्या तीर्थक्षेत्राकडे येणाऱ्या सर्व रस्त्याला सुमारे शंभर किलोमीटर पासून महत्त्वाच्या ठिकाणी भले मध्ये दिशादर्शक फलक लावून मंदिरात 701 दिवे सावता नावाच्या माणसांमार्फत लावून राज्यभर जनजागृती करण्याचे काम सत्यशोधक शंकरराव लिंगे, साताऱ्याचे जाधव,फलटणचे डॉ. बी.के यादव यांनी मोठ्या प्रमाणात केले. अरण तीर्थक्षेत्र नावा रूपाला येऊ लागले.अरण तीर्थक्षेत्राची वारंवार ‘अ’ वर्ग दर्जा देऊन विकास करण्याची मागणी होऊ लागली. त्यासाठी मंत्री मुख्यमंत्री यांना निवेदने राणे ते उपोषण पत्रकार परिषदा सभा मिळावे लाखो मागण्याचे पत्रक पोस्ट का महाराष्ट्रभर वाटून हरण तीर्थक्षेत्राचे माहिती जनतेपर्यंत पोहोचवली सत्यशोधक लिंगे यांनी 712 जोडप्यांचे मोफत सामुदायिक विवाह याच अरण येथे केले.
अखिल भारतीय माळी महासंघाचा स्थापन मेळावा,दरवर्षी वर्धापन मेळावा,वधू-वर मेळावा,विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम,माळी सत्ता संपादन मेळावा,सावता महाराज,महात्मा फुले विचार मेळावा,माळी समाजाचे अधिवेशन असे शेकडो कार्यक्रम देशभरातील मान्यवर माळी समाज भक्तांना हरण येथे बोलावून देशभरात प्रचार प्रसाद कार्यक्रम लिंगे यांनी घेतले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात न्यूयॉर्क शिकागो येथे सावता महाराज यांच्या विचारांची पुस्तके ग्रंथ वाटून भाषणे करून प्रचार केला डेट राईट वॉशिंग्टन येथेही सावता महाराजांचा विचाराचा झेंडा फडकविला त्यानंतर राजकीय लोकांचे लक्ष अरणकडे गेले.त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी 12 फेब्रुवारी 1998 ला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला.त्यानंतर उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,समाज कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे,धनंजय मुंडे इत्यादी अनेक मंत्री,खासदार,आमदार पुढारी यांनी अरण येथे येऊन अनेक विकास कामांची घोषणा केली.अरणला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले.परंतु आजपर्यंत ‘अ’ वर्ग दर्जा मिळाला नाही. खासदार रामदास आठवले साहेब,विधान परिषद सभापती मा.स.परांदे सर, माजी मंत्री सुधाकर रावजी धनधने साहेब यांनी अरण विकासासाठी लाखो रुपयाचा निधी दिला.तो बऱ्याच वेळात पडत गेला.लिंगे यांच्या चिकाटीने तो परत आणला. त्यांच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून पंकजाताई यांच्या माध्यमातून दोन सभागृह,एक भव्य मंगल कार्यालय विश्रांती ग्रह ,मंदिराचा काही प्रमाणात जिर्णोद्धार करण्यात आला. परंतु या मंदिरामध्ये,इमारतीमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे.ज्या कारणासाठी सभागृह केले त्यासाठी त्याचा वापर होत नाही.मंदिराला लागणारी लाईट सुद्धा डायरेक्ट खांबावरून घेतली जाते.दररोज भक्तगण मोठी देणगी वर्गणी देतात. परंतु मंदिरामध्ये,सभागृहामध्ये,मंगल कार्यालयात वीज,पाणी,स्वच्छता देखभाल योग्य प्रकारे केली जात नाही.ती कोण वापरत आहे, कोणाच्या ताब्यात आहे हे कळत नाही.त्यामुळे अरण मध्ये येणाऱ्या भक्तगणांची प्रतिक्रिया उदासीनता दर्शविते.त्यामुळे पूर्वीचा अनुभव लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली घोषणा, त्याचा राजपत्रित जीआर काढणे, आर्थिक तरतूद करणे,त्याचा पाठपुरावा करून वेळोवेळी विकास निधी अरणला मंजूर करून देणे इत्यादी कामाची जबाबदारी मंत्री मा.छगनरावजी भुजबळ साहेब यांनी घ्यावी.इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये अशी विनंती सावता महाराज भक्त करीत आहेत.

सावता महाराजांचे वंशज सावता अंकुश वसेकर यांनी केलेले धाडस कौतुकास्पद आहे.परंतु आता सावता महाराजांचे मुख्य वंशज चार आहेत.
1)अंकुश वसेकर
2)भीमराव वसेकर
3)दत्तोबा वसेकर व त्यांचे भाऊ 4) शंकर गोरख विठ्ठल वसेकर व त्यांचे भाऊ.
त्यामध्ये आता दादा महाराज, सावता महाराज,रविकांत महाराज, रमेश महाराज, संतोष महाराज, विठ्ठल महाराज, गोरख महाराज नितीन महाराज इत्यादी महाराज तयार झाले आहेत.याशिवाय इतर गावातील ही वसेकर मंडळी आम्ही सावता महाराजांचे वंशज असल्याचे बाहेरगावी गेल्यानंतर सांगत आहेत. आणि वर्गणी देणगी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.ही चिंतेची बाब आहे.

रमेश महाराज यांना चक्क आमदार रोहिदास पवार यांनी चार चाकी नवीन कोरी गाडी महाराष्ट्रभर फिरण्यासाठी दिली आहे.
परवा जे भक्त निवासाचे उद्घाटन झाले अशाच प्रकारचे उद्घाटन 200‐250 फुटांचा वारकरी प्रंथाचा झेंडा लावून,एक- दीड कोटी रुपये खर्च करून रमेश महाराज वसेकर यांनीही आपल्या स्वतःच्या जागेमध्ये पुणे-सोलापूर हायवे रोडवर भक्त निवासाचे बांधकाम चालू केले आहे आणि ते महाराष्ट्रभर आणि विशेष करून कर्जत,जामखेड मतदार संघात सावता महाराज भक्तांना राष्ट्रवादी शरद पवार गट यांना मत घालण्याची गळ करीत आहेत.
कालचा जो कार्यक्रम झाला तो सावता अंकुश वसेकर पुजारी यांनी सर्व भारतीय जनता पक्षाच्या अधिपत्याखाली केला होता. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या माळी समाजातील नेत्यांना आवर्जून आमंत्रित केले नव्हते किंवा स्टेजवर स्थान दिले नव्हते.
भुजबळ साहेब जरी त्यामध्ये सहभागी असले आर्थिक मदत केली असली तरी भुजबळ साहेब यांच्या समता परिषदेच्या पदाधिकारी यांना विश्वासात घेतले नव्हते.शंकराव लिंगे यांच्या अखिल भारतीय माळी महासंघटनेने महाराष्ट्रभर प्रचार केला.
तीस वर्षांपासून अरणचे महत्व वाढवले,अरणच्या विकासासाठी स्वखर्चाने अहोरात्र परिश्रम घेतले कारण तीर्थक्षेत्राचे नाव महाराष्ट्रात देशात जगात पोचविले असले तरी तरी सुद्धा त्यांचा साधा नामोल्लेख किंवा स्टेजवर बसण्यासाठी जागा दिली नाही. पायाचे ऑपरेशन झाले असल्यामुळे एका पायावर दोन तास उभे होते तरीसुद्धा अनोळखी संयोजक चहा कोणी समाजात ओळखत नाही आनंद मध्ये ओळखत नाही अशा लोकांनी स्टेज गाडीत केले होते लिंगे यांना खूप त्रास झाला अरे तो त्यांनी सावता महाराजांच्या साठी समाजासाठी सहन केला

दादा महाराज वसेकर हेही आता नवीन ट्रस्ट स्थापन करून भक्तनिवास बांधण्यासाठी महाराष्ट्रभर फिरून देणगी वर्गणी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.ते कोणत्या पक्षाच्या अधिपत्याखाली काम करतील सांगता येत नाही.
रमेश महाराज वसेकर यांनी तर उघड उघड कालच्या कार्यक्रमाच्या वेळी उद्घाटनाच्या हाकेच्या अंतरावर आमदार रोहित दादा पवार यांचे मोठ मोठे असंख्य कट आउट लावले होते.
*याच्या पाठीमागे काय दडले कळत नाही रमेश पुजारी यांचे लग्न सामूहिक विवाह मध्ये लिंगे यांनी करून दिले होते त्यांना महाराष्ट्रभर लिंगे यांनी फिरवून ओळखी पालखी करून दिल्या होत्या तरीसुद्धा लिंगे यांनी फोन केला तर ते नेहमी कामात असतात पुन्हा फोन करतो आजारी आहे सबब सांगून फोन कट करतात त्यांची भूमिका खोबरं तिकडे चांगभलं अशी आहे

.याशिवाय आणखी सात-आठ नवोदित महाराज आहेत ते कोणती भूमिका घेतील सांगता येत नाही.*
एकंदरच कालच्या कार्यक्रमाला सावता महाराजांचे सर्व वंशज एकत्र नव्हते.अनेकांचा वेगळा वेगळा सूर येत होता.कोणाचा उघड होता तर कोणाचा छुपा विरोधाभास होता. सावता महाराज देवस्थान ट्रस्ट यांना किंवा गावातील कोणालाही विश्वासात न घेतल्यामुळे गावकरी ट्रस्टी नाराज होते
सावता भक्तांचे एकच मागणे आहे की,अरण तीर्थक्षेत्राला सावता महाराजांच्या वंशजांनी एकजूट दाखवली तर माळी समाज सावता भक्त आणि कोणतेही सरकार निधी कमी पडू देणार नाही. फक्त सावता महाराजांच्या वंशजांनी एकत्र राहावे.
जे सत्तेत आहेत त्या सरकारकडे नेहमी मागणी करत राहावी. त्यास समाज नेहमीच पाठिंबा देईल.परंतु सावता महाराज संजीवन समाधी मंदिरामध्ये कोणीही कसलेही राजकारण आणू नये.
हीच भक्तगणांची सावता महाराजांना प्रार्थना…!!!

शंकरराव लिंगे यांनीही सावता महाराज यांच्या वंशज यापैकी एकाची तीस गुंठे जमीन घेतली आहे सावता महाराजांच्या ऐतिहासिक विहिरीमध्ये ही त्यांचा हिस्सा आहे आणि लिंगे यांनी सुद्धा त्या ठिकाणी संत सावतामाळी प्रतिष्ठान ट्रस्ट स्थापन केले आहे त्या मार्फत लवकरच फक्त निवास सभागृह बांधण्यात येईल अशी माहिती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली आहे

संत शिरोमणी सावता महाराज की जय जय सावता!
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button