सोशल

✨शुभकार्याच्या बातम्या✨

✨शुभकार्याच्या बातम्या✨

1) शिवस्मारकतर्फे देशभक्तीगीत समूहगान स्पर्धेचे आयोजन

शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे (शिवस्मारक) सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी देशभक्तीगीत समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृहात सकाळी १० वाजता स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क आहे. शालेय स्तरावरील ही स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि जगद्‌गुरु संत श्री तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिरिष महाराज मोरे लिखित छ्त्रपती शिवाजी महाराज समजून घेताना हे पुस्तक देण्यात येणार आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पारितोषिक दिले जाणार आहे.

या स्पर्धेसाठी नाव नोंदणी शनिवार दिनांक १० ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नवी पेठ येथील शिवस्मारक कार्यालयात करता येईल. नोंदणीसाठी शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लिनाथ होटकर यांच्याशी ९८२२४९८३७३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अधिकाधिक शाळांनी या देशभक्तीगीत समूहगान स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवस्मारकतर्फे करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गवसने, कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, संचालिका आणि स्पर्धा प्रमुख माधवी कुलकर्णी, संचालक प्रा. देवानंद चिलवंत, प्रसाद जीरांकलगीकर, व्यवस्थापक मल्लिनाथ होटकर उपस्थित होते.

चौकट

शिवस्मारकतर्फे वर्षभर चालतात विविध उपक्रम

शिवस्मारकतर्फे वर्षभर व्याख्यानमाला, किल्ले बांधणी स्पर्धा, आरोग्य शिबीर, वक्तृत्व स्पर्धा, भजन स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा व्यायाम शाळा, शिवशिल्पप्रदर्शन आदी उपक्रम आयोजित करण्यात येतात. या उपक्रमांमध्ये शेकडो जण सहभागी होतात. यंदाच्या वर्षभरातही असे उपक्रम होणार असल्याचे शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी सांगितले.

श्री छत्रपति शिवाजी महाराज स्मारक मंडळ (शिवस्मारक) सोलापूर.

|| स्पर्धेचा तपशील ||

स्पर्धा : सोमवार दि १२/०८/२०२४

स्पर्धा वेळ : सकाळी १०.०० वाजता

स्पर्धा ठिकाण : शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक, सोलापूर.

प्रवेश निशुल्क*

: स्पर्धेचे नियम :

१) तीन गटात होईल. अ) १ ली ते ४ थी ब) ५ वी ते ७ क) ८ वी ते १० वी

२) प्रत्येक गटात स्वतंत्र पारितोषिके दिले जातील.

३) प्रत्येक संघात कमीत कमी ६ व जास्तीत जास्त १० सदस्य आवश्यक. (वा‌काशिवाय)

४) वाद्याची व साथीदाराची व्यवस्था ज्या त्या संघांनी करावी.

५) वेळेची मर्यादा ८ मिनिटे राहील. स्पर्धा मराठी, हिंदी किवा संस्कृत भाषेत होईल.

६) नाव नोंदणी शनिवार दि १० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत करावी.

७) संघाची नाव नोंदणी शाळेच्या अधिकृत पत्रावर संबंधित शिक्षकाच्या सहीने करणे आवश्यक.

८) स्पर्धकांनी वेळेपूर्वी १५ मिनिटे अगोदर स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे.

९) सर्व सहभागी संघाना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

१०) पारितोषिक वितरण स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धेनंतर लगेच होईल.

११) परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

१२) सहभाग गटाकरिता अल्पोपहार व्यवस्था केलेली आहे.

राजकीय स्वरूप : प्रथम ५०००/- द्वितीय ३०००/- तृतीय २०००/- स्मृति चिन्ह, प्रमाणपत्र.

संपर्क : शिवस्मारक कार्यालय ०२१७-२७२९८१०, मल्लिनाथ व्हटकर ९८२२४९८३७३.

टीप : वरील स्पर्धा https://youtube.com/@SHIVSMARAK SOLAPUR या चॅनेलवर थेठ प्रक्षेपण होईल.

फेसबुक श्री छत्रपति शिवाजी महाराज स्मारक मंडळ, सोलापूर.

 

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button