सातारा जिल्ह्यातील तडवळे खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील उद्योगपती सदाशिव बोराडे यांची यशोगाथा तरुणांनी वाचलीच पाहिजे क्रमशः

सातारा जिल्ह्यातील तडवळे खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील उद्योगपती सदाशिव बोराडे यांची यशोगाथा तरुणांनी वाचलीच पाहिजे क्रमशः
: तो गायला लागला की आम्ही त्याच्याकडे पहातच रहायचो. दुसरे गृहस्थ आनंदराव कांबळे हे सकाळ संध्याकाळी नदीच्या काठांवर बसून दोन दोन तास मुरली वाजवायचे. त्यांच्या मुरलीचा आवाज ऐकण्यासाठी मी तासनतास त्यांच्याजवळ बसून रहायचो. आम्हाला त्यातलं काहीही कळायचं नाही, पण त्या मुरलीचा आवाज आम्हाला भुरळ घालायचा.
मारुती हे आमच्या गावचं ग्रामदैवत. शक्तीसाठी, भक्तीसाठी त्याची उपासना केली जाते. मारूतीच त्याच्या मर्जीप्रमाणे एखाद्याचं चांगलं अगर वाईट करतो अशी लोकांची भावना, आपण काही न करता मारूतीनं आपणास सगळीकडे यश दयावं अशी लोकांची इच्छा असायची. जूनमध्ये नुकत्याच शाळा सुरू झालेल्या होत्या. आमचा पाठ घ्यायला साळुंखे गुरूजींनी सुरूवात केलेली होती. इतक्यात फाड फाड आवाज आले. तर एक तरूण मारूतीच्या तोंडात चपलेने मारत होता. शिक्षकांनी त्याला बाजूला केलं. तो सातवीला नापास झाला होता. आमच्याच गावचा घोरपडे होता तो. मारूतीनं त्याला नापास केलं असं त्याचं म्हणणं होतं. मारूतीदेव ज्याला पाहिजे त्याला पास अगर नापास करतो असं त्या वेळी तो प्रसंग पाहिल्यानंतर वाटलं. आज कित्येक वर्षांनी त्या प्रकाराची आठवण येऊन हसू येतं.
कोरेगाव हे आमचं तालुक्याच गाव. आमच्या तडवळे गावापासून साधारपणे पाच किलोमीटर अंतरावरचं गाव. मला आठवतं की वयाची १० वर्ष झाली तरी मी तालुक्याला गेलो
सत्यशोधक दिन बंधू संपादक राव लिंगे 73 87 37 78 01
१७




