महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशः 8

(चोवीस)
उदाहरणार्थ, रानडे-टिळक-गोखले यांच्या पगड्या-उपरणी, जीना-आंबेडकर यांचे इंग्रजी टाय-कोट, अलीबंधूची शेरवानी, महात्मा गांधींचा पंचा-काठी वगैरे. शैली ही व्यक्तीच्या सर्व व्यवहारांना छेद देणारे तत्त्व मानले पाहिजे. फुल्यांच्या एकूण पोषाखाचा देशीपणा मातीशी भिडणारा आहे. फुल्यांनी मराठी गद्यात पहिल्यांदाच श्रमिकांची व शुद्रांची भाषा उमटवली. हे त्यांचे भाषिक कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. खेड्यांपाड्यांतील लोकांचे साधे वाक्प्रचार, संस्कृत-फारशी गुजराती- मराठी म्हणी, नव्या रूढ होऊ घातलेली इंग्रजी वाक्यरचनेतही गावठी मराठीचे लयखंड आणणारी पदरचना, मुतिवले-हटिवले-राजहौसी-चवरंग असे उच्चारानुसारी लेखन, वेगवेगळ्या जातवाल्यांच्या विशिष्ट बोली, ब्रह्मदेवाला “बेटीचोद” आडनाव ठेवणे, बळीसमोर प्रकटलेला आदिनारायणाला “बंब्या” म्हणत रहाणे. साहित्य संमेलनात जमणाऱ्या ब्राह्मण लेखकांना “उंटावरून शेळ्या वळणारे” म्हणणे, स्त्रीच्या पोटी जन्मून तिलाच छळणाऱ्या आर्यब्राह्मणी पुरुषजातीला “कुन्हाडीचा दांडा” म्हणणे-ह्या काही प्रयोगांवरून फुले हे पिंडाने भाषेच्या विलासात रमणारे व्यक्तिमत्व वाटते.
फुल्यांच्या वाङ्मयात येणाऱ्या उल्लेखांवरून व रचनाप्रकारांवरून त्या काळातील उपलब्ध व प्रचलित अशा पारंपरिक, पुरोगामी आणि इंग्रजी वाङ्मयप्रवाहांशी त्यांचा परिचय होता असे दिसते. मिशनऱ्यांच्या संगतीत त्यांना इंग्लंड व अमेरिकेतील प्रगत सांस्कृतिक परिस्थितीची प्रत्यक्ष हकीकत मिळत होती. मिशनऱ्यांकडून त्यांनी वाचलेले टॉमस पेनसारखे ग्रंथकार तत्कालीन युर्निव्हर्सिट्यांतील घोकून लवकर मरणाऱ्या पदवीधारकांना वाचायला मिळत नव्हते. इंग्रजीतले इतिहास, मॅक्समुल्लर, ख्रिस्ती व ईंडॉलॉजिस्ट ग्रंथकारांची निवडक पुस्तके त्यांना विशेष आवडतात. होमर, शेक्सपिअर, बनियन, ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम, कुराण, बायबल, रामायण, महाभारत इ. त्यांनी वाचलेले दिसते. लोकहितवादी, पदमनजी, विष्णुशास्त्री चिपळूणकर इ. एकोणिसाव्या शतकातील ग्रंथकार, हिंदु-संस्कृत वाङ्मयीन परंपरेतील जुने ग्रंथ, हिंदी व मराठी संतकाव्य, पंडितकाव्य इ. चा त्यांचा अभ्यास आहे. बुद्ध, जैन, ख्रिस्ती व महंमदी क्रांतिकारक तत्त्वज्ञानाची त्यांना विशेष ओढ आहे. “जगातील एकंदर सर्व देशांचे इतिहास एकमेकांशी ताडून पाहता” अशा अर्थान वाक्ये त्यांच्या लेखनात अनेकदा येतात. ह्यावरून त्यांची जागतिक दृष्टी कळून येते. शिवाय हिंदुस्थानातील समृद्ध मौखिक वाड्मय परंपरा त्यांच्या कालखंडात खेडोपाडी टिकून होती. एकंदरीत फुल्यांच्या व्यासंगाचा व ज्ञानाचा पल्ला आधुनिक गद्य लेखकाला शोधणारा होता. पंडिता रमाबाई, बाबा पदमनजी वगैरे त्या काळातील क्रमशः 8
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा


