सोशल

ओबीसीनो,आपली राजकीय शक्ती निर्माण करा.

ओबीसीनो,आपली राजकीय शक्ती निर्माण करा.
-बलदेव आड़े,नागपूर

ओबीसी आणि इतर बहुजनांचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्र राज्यात एक राजकीय पक्ष हवा आहे.ओबीसी नागरिकांनी इतर प्रस्थापित राजकीय पक्षांच्या ओबीसी आघाड्यांमध्ये गुलामगिरी करण्यापेक्षा आपल्या हक्काच्या ओबीसी पक्षामध्ये सहभागी होवून किवा आपला स्वताचा राजकीय पक्ष निर्माण करून आपली स्वताची राजकीय शक्ती निर्माण करून सत्ता आपल्या हाती घ्या.इतर ही राजकीय पक्ष आहेत परन्तु त्यांचे नेतृत्व ओबीसी भटके विमुक्त बहुजन करत नाहीत.तिथे ओबीसी केवळ कार्यकर्ता आहे,तिथे ओबीसी केवळ घोषणावीर आहे,तिथे ओबीसी केवळ दऱ्या उचलणारा नोकर आहे,तिथे ओबीसी केवळ सांगकाम्या आहे.तिथे ओबीसीना वापरून घेतले जाते.प्रस्थापित राजकीय पक्षांत ओबीसी कुठेही निर्णय प्रक्रियेत नाहीत,तिथे ओबीसीना केवळ गृहीत धरले जाते.तिथे ओबीसी केवळ बिन पगारी पोलिस आहे.इतर राजकीय पक्षांमध्ये ओबीसी गुलाम आहेत.प्रस्थापित राजकीय पक्षांत ओबीसीना कवडीची किम्मत नसते.
मित्रांनो,भारतातील राजकीय पक्षांच्या चार ते पांच मुख्य विचारधारा आहेत.त्यांमध्ये गांधीवादी,हिंदुत्ववादी, समाजवादी,साम्यवादी, आम्बेडकरवादी,बहुजनवादी, द्रविड़ आणि अल्पसंख्यकवादी विचारधारा आहे.ब्राम्हण,मराठा,मुस्लिम,सिख,ख्रिश्चन,बुद्धिस्ट ह्यांचे ही राजकीय पक्ष आहेत.

बहुजनांमध्ये सर्वात मोठा समुदाय हा ओबीसी आहे.आज जनगणना झाली तर देशात ओबीसी 60 टक्के असल्याचे निश्चित होईल.म्हणजे 100 पैकी 60 माणसे केवळ आणि केवळ ओबीसी आहेत.किती प्रचंड ताकद आहे ओबीसिंची!परन्तु आपल्या ताकदीचा अंदाज नाही,महत्व नाही ओबीसीना.अल्प संख्येत असलेले लोक ओबीसीना नियंत्रित करतात आणि ही फार मोठी शोकांतिका आहे.ओबीसी सर्वात मोठा समुदाय असून ही त्याला इतर राजकीय पक्षांमध्ये नेतृत्व करण्याची संधीनाही.ओबीसी हा समुदाय गांधीवादी,समाजवादी, साम्यवादी आणि हिंदुत्ववादी राजकीय पक्षांमध्ये विखुरलेला आहे.
देशातील समाजवादी विचारधारेचे पक्ष सोडले तर ओबीसी कुठेही निर्णय प्रक्रियेत सहभागी नाही.समाजवादी विचारधारेच्या पक्षांचे नेतृत्व ओबीसी करतात म्हणून तिथे ओबीसी लोकांच्या हिताचे निर्णय होतात.मंडल आयोग त्याचे एक उत्तम उदाहरण आहे.आम्बेडकरवादी बहुजनां चे पक्ष हे ओबीसी हिताचे बोलतात,लिहितात, आन्दोलने करतात.कारण ते समतेचे पुरस्कर्ते आहेत.
कोंग्रेस,राष्ट्रवादी कोंग्रेस,भाजप,शिवसेना, वंचित बहुजन आघाडी,बीएसपी,साम्यवादी पक्ष,रिपब्लिकन पक्ष,शेतकरी कामगार पक्ष,मनसे ह्या पक्षांचे नेतृत्व ओबीसी करत नाहीत.इथे ही ओबीसी निर्णय प्रक्रियेत नाहीत.तुम्ही निर्णय प्रक्रियेत नसाल तर तुमच्या हिताचे निर्णय होत नाहीत.मग तिथे तुमच्या असण्याला,झटण्याला, झुंजण्याला,झगड़ण्याला काहीच महत्व नसते.तुम्ही केवळ इतरांच्या आदेश पालन करण्या पुरते मर्यादित असता.आणि हे शंभर टक्के सत्य आहे.
महाराष्ट्र राज्यात 25 टक्के मराठ्यांनी,4 टक्के ब्राम्हण,4 ते 5 टक्के बौद्धांनी,10 टक्के मुस्लिमांनी,देशात 2 टक्के सिखांनी आपल्या जिद्द आणि मेहनतीने आपलें स्वताचे राजकीय नेतृत्व निर्माण केले आहे.स्वता अल्पसंख्यक असून ही त्यांनी आपली राजकीय शक्ती निर्माण केली आहे.ओबीसीनी आपली राजकीय शक्ती आणि नेतृत्व निर्माण न केल्याने त्यांची सर्वत्र पिछेहाट होताना दिसते.जे सत्तेत असतात त्यांचीच काम होतात.इतरांना ऊना तानात आन्दोलने करावी लागतात.
वरील प्रस्थापित राजकीय पक्ष ओबीसीवर नियंत्रण ठेवतात,त्यांचा सर्वत्र वापर करतात,त्यांचे मतदान घेतात,नेतृत्व मात्र देत नाहीत.वरील सर्व राजकीय पक्ष आपल्या विचारधारेवर ठाम असतात.त्यांनी पुढील शेकडो वर्षाचा विचार करून सत्ता,संपती,प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा निर्धार केलेला आहे.ते कुशल राजकारणी आहेत.त्यांना त्यांच्या शक्तिचा यथायोग्य वापर करता येतो.स्वता निर्णय घेता येते.
पद,प्रतिष्ठा,सत्ता,संपती हे केवळ ठाम राहून,त्याग करून,निर्धार करूनच प्राप्त करता येवू शकते हे त्यांनी जाणले आहे.ते जिद्दी आहेत,त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे म्हणून ते अल्पसंख्यक असुन ही ठामपणे उभे आहेत.
देशात ओबीसी 52 टक्के असल्याचे सांगितले जाते परन्तु ओबीसी लोकसंख्या 60 टक्के आहे.सरकारकड़े ओबीसी डेटा आहे परन्तु ते देवू इच्छित नाही.डेटा दिल्यास सत्ता गमावण्याची भिती आहे.ते ओबीसीना आपल्या डोळ्या देखत फ़सवत आहेत,झुलवत आहेत,नागवतआहेत,लुबाड़त आहेत कारण त्यांना माहित आहे की,ओबीसी हा असंघटित समुदाय आहे,विखुरलेला समुदाय आहे,विस्कळीत समुदाय आहे,अज्ञानी समुदाय आहे,ठाम भूमिका घेणारा समुदाय नाही,सहज आपल्या जाळयात फ़सणारा समुदाय आहे आणि साधाभोळा समुदाय आहे.
आपण इतरांच्या राजकीय पक्षात जावून अन्याय करवून घेण्यापेक्षा आपल्याच जीवाभावाच्या राजकीय पक्षात आपलें स्वताचे नेतृत्व उभे का करू नये,आपली सत्ता हस्तगत का करू नये?
आपल्या साठी मैदान खुले आहे.आपण आपल्या बुद्धिचा,आपल्या धनाचा,आपल्या वेळेचा कुशलतापूर्वक उपयोग करून ओबीसिना पिवळया झेंड्या खाली संघटीत करण्यास कुणी रोखले आहे.आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण ओबीसीना संघटीत करू शकतो आणि केलेच पाहिजे.इतरांवर विश्वास ठेवाल तर फसवणूकच होईल.आता पर्यन्त राजकीय पक्षांनी भल्या मोठ्या ओबीसी समाजाला केवळ फ़सविले आहे.आपण मूर्ख आहोत म्हणून फ़सतो. आपण विचार करत नाही म्हणून फ़सतो.आपण स्वतःच्या डोक्याने निर्णय घेत नाही म्हणून फ़सतो.इतरांना दोष देण्यात काही अर्थ नाही.
लोकसंख्या आपली,मतदाते आपलें,शक्ती आपली,धन आपलें,मेहनत आपली,वेळ आपला,झुंजणे आपलें आणि नेतृत्व इतरांचे का म्हणून स्विकारावे?इतरांच्या हवेलित आपण किती वर्षे राहायचे,इतरांना किती दिवस मोठे करायचे?आपण खाली मांडवात आणि प्रस्थापीत स्टेजवर किती दिवस बसवायचे?ही व्यवस्था आणि अवस्था बदलायची असेल तर ओबीसिनी मन,मस्तिष्क आणि विचाराने बदलण्याची नितांत गरज आहे.
ओबीसी बुद्धिजीवीं नागरिकांनी आपल्या विखुरलेल्या,गोंधळलेल्या, विस्कळीत ओबीसी बांधवांना संघटीत करण्याची नितांत गरज आहे.
ओबीसीनी आपली गुलामगिरीची मानसिकता त्यागण्याची नितांत नितांत गरज आहे.
मराठा समाज,बौद्ध समाज,ब्राम्हण समाज,सिख समाज आणि मुस्लिम समाज ह्यांनी आपली राजकीय शक्ती निर्माण केल्याने लोक त्यांच्याकड़े झुखतात.हा अत्यंत महत्वाचा आणि विचारकरण्या सारखा विषय आहे.ओबीसी समाजाच्या तुलनेत वरील सर्व समाज अल्पसंख्यक आहेत.
आम्ही ओबीसीनी आपली राजकीय शक्ती कधी निर्माण केली का?नाही.आपण इतरांच्या मागे जातो आणि घात करून घेतो.
ओबीसीना आत्मभान नसल्याने,आपल्या शक्तिचा अंदाज नसल्याने,संघटीत शक्ती नसल्याने,ओबीसी अन्धश्रध्द असल्याने,मला काय त्याचे वृत्तिमुळे लोकांनी ओबीसीना अक्षरशः मुर्खात काढले आहे.ही अवस्था आणि व्यवस्था बदलली पाहिजे.ही अवस्था बदलू शकते.
ओबीसीमध्ये जे काही वाईट आहे,दुर्गुण आहेत,जे वाईट संस्कार आहेत ते सर्व येथील शोषकांची देण आहे.बळीराजा काळ असेल,बुद्ध काळ असेल,सम्राट अशोक काळ असेल त्यावेळी ओबीसी समाज आदर्शवत होता.जातिभेद नव्हता,धार्मिक भेदाभेद नव्हते परन्तु वैदिक काळात ओबीसी समाजावर अत्यंत वाईट संस्कार झाले आणि ह्या निर्मळ समाजाची वाट लागली.
माझे मत असे आहे ओबीसी समुदाय जगातील सर्वात उत्तम,सर्वात निर्मळ,सर्वात दिलदार,सर्वात प्रामाणिक, सर्वात संयमी,सर्वात शांतताप्रिय,सर्वांचा पोषिन्दा असा समुदाय आहे.परन्तु त्याची दिशाभूल करण्यात आली आहे.
जगातील सर्वाधिक मौलिक विचार केवळ ओबीसी संत,महात्मा आणि महापुरुषांनी ह्या जगाला दिले आहेत.विश्वास नसेल तर आपल्या महापुरुषांचे योगदान बघा.
सर्वात दिलदार राजा-बळीराजा ओबीसी होते.सर्वात मोठा महामानव-तथागत बुद्ध ओबीसी होते.सर्वात मोठा सम्राट-सम्राट अशोक ओबीसी होते.सर्वात मोठा सत्यशोधक-महात्मा कबीर ओबीसी होते.जगातील सर्वात मोठा न्यायी राजा-छत्रपतीं शिवराय ओबीसी होते.जगातील सर्वात लढ़वय्या राजकुमार-संभु राजे ओबीसी होते.सर्वात दिलदार राजा-छत्रपतीं शाहूजी महाराज ओबीसी होते.
जगातील सर्वात मोठा विवेकवादी सत्यशोधक विचारवंत रामास्वामी पेरियार ओबीसी होते.थोर समाजक्रान्तिकारक महात्मा फुले ओबीसी होते.
उत्तम संस्कार करणारी माता जिजाऊ ओबीसी होत्या.
नेतृत्व आणि कर्तुत्वात सर्वोत्तम अहिल्या माता ओबीसी होत्या.सर्वात जिद्दी शिक्षिका सावित्री आई फुले ओबीसी होत्या.संत तुकोबा ओबीसी होते.संत संताजी जगनाडे महाराज ओबीसी होते.संत नरहरी महाराज ओबीसी होते.संत सावता महाराज ओबीसी होते.
संत गोरोबा महाराज ओबीसी होते.संत गाडगेबाबा ओबीसी होते.संत तुकडोजी महाराज ओबीसी होते.
संत सेवालाल महाराज ओबीसी होते.संत भगवान बाबा महाराज ओबीसी होते.
संत बसवेश्वर महाराज ओबीसी होते.संत नामदेव महाराज ओबीसी होते.
संत सेना महाराज ओबीसी होते.इतकेच काय अहींसेचे तत्वज्ञान देणारे भगवान महावीर,गुरुनानकजी ओबीसी होते.
हे सर्व संत,महात्मा आणि महापुरुष ओबीसीच होते.आपणास सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय,मानवतावादी तत्वज्ञानासाठी इतरांकड़े बघण्याची अजिबात गरज नाही.इतके प्रचंड विचारधन आपल्या महापुरुषांनी दिलेले आहे.
ओबीसी मित्रांनो,लक्षात घ्या,तुझं आहे तुझ पासी पर तु जागा चुकलासी अशी अवस्था झाली आहे आपली.
आपल्याकडे इतके प्रचंड विचारधन आहे,आपल्या कड़े प्रचंड बुद्धिमत्ता आहे,प्रचंड धन आहे,प्रचंड वेळ आहे,प्रचंड जनशक्ती आहे परन्तु आपल्याकडे निश्चयाचा अभाव आहे,निर्धाराचा अभाव आहे,आपल्यामध्ये विघटन आहे,आपल्यामध्ये वैचारिक गोंधळ आहे,आपण विचलित आहोत.म्हणून आपण शासन,प्रशासन,न्यायालये, उद्योगांमध्ये मागे आहोत.
खरे पाहता आज आपण ओबीसी देशाच्या प्रधानमंत्री,राष्ट्रपती, उपराष्ट्रपति,चीफ जस्टिस,सर्व सेना दलांचे प्रमुख अशा सर्व सर्वोच्च पदांवर विराजमान असायला हवे होते.परन्तु आपण तिथे नाही.आणि असेच असंघटित राहिलो तर तिथ पर्यन्त कधीच पोहोचणार नाही.
ह्या देशाची सामाजिक,आर्थिक,राजकीय, सांस्कृतिक,धार्मिक व्यवस्था बदलून टाकणाऱ्या परमपूज्य विश्वरत्न ओबीसींचे उद्धारकर्ते ड़ॉ बाबासाहेब आम्बेडकर ह्यांनी ओबीसी असलेल्या महामानव तथागत बुद्ध,सत्यशोधक संत कबीर आणि थोर समाज क्रांतिकारक महात्मा फुले ह्यांना आपलें गुरु मानले आणि जग बदलून टाकला,माणूस बदलून टाकला.म्हणजे ओबीसी किती महान आहेत ज्यांना बाबासाहेब गुरु मानतात.
शेतकरी आपला,शेतमजूर आपला,कामगार आपला,शिक्षक वकील डॉक्टर कर्मचारी अधिकारी व्यापारी आपलें आणि नेते इतर ही व्यवस्था बदलली पाहिजे.आपण ग्राहक आणि दुकानदार इतर,आपण श्रोते आणि वक्ते इतर ,सैनिक आपलें आणि सेना प्रमुख इतर ही व्यवस्था बदलली पाहिजे.ही शोषणाची व्यवस्था बघून मन अस्वस्थ होते.ही शोषणाची व्यवस्था बदलली पाहिजे.प्रस्थापितांनी आपली पार वाट लावली आहे.धनाने,प्रतिष्ठेने,शासन प्रशासनातील सत्तेने,उद्योगाने प्रस्थापित असलेले लोक आपलें शोषण कर्ते आहेत.ते कधीच आपलें होवू शकत नाही.ते नेहमी साठी शोषक आहेत आणि राहतील.
मित्रांनो,ओबीसीना इतर राजकीय पक्ष गृहीत धरतात. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या ओबीसी आघाड़या ह्या बकवास आहेत,गुलाम आहेत,फसवणूक आहे,लुबाड़णूक आहे,नागवणुक आहे हे आपण लक्षात घ्यावे.आपली शक्ती निर्माण झाल्या शिवाय ही फसवणूक थांबणार नाही.आपण आपली राजकीय शक्ती निर्माण केलीच पाहिजे.
सर्वप्रथम ओबीसी आणि भटके विमुक्त ह्यांची एक भक्कम शक्ती निर्माण करण्याची गरज आहे.अनुसूचित जाती,जमाती,अल्पसंख्यक हे आपलें अत्यंत जवळचे बांधव आहेत ते येतील.ते आपणास साथ देतीलच.ते आपलें सच्चे हितचिंतक आहेत.
आपल्या ओबीसिंचा पिवळा झेंडा कुठे आहे?ओबीसिंच्या ताकतीवर भगवा झेंडा,लाल झेंडा,नीळा आणि हिरवा झेंडा डौलाने फड़कते आहे परन्तु पिवळा झेंडा कुठे आहे.भगवा,लाल,नीळा आणि हिरवा ह्या झेंड्यांनी ओबीसीना सलाम केले पाहिजे अशी शक्ती निर्माण करण्याची गरज आहे.
जिसकी जितनी संख्या भारी उनकी उतनी भागीदारी हा केवळ नारा राहु नये तर वास्तवात उतरले पाहिजे.
चला तर मग आपण आपल्या ओबीसी बांधवांच्या मनांची मशागत करण्यासाठी,प्रबोधन करण्यासाठी,त्यांना संघटीत करण्यासाठी आपण आपल्या धन,बुद्धि,वेळ ह्यांचा पूर्णपणे उपयोग करूया.

बलदेव आडे
संयोजक-ओबीसी वॉरियर्स मिशन
(9890914480)

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button