सोशल

शरणगाथा क्रमशा.38

शरणगाथा क्रमशा.38

करण्याचा आग्रह प्रभुदेवांनी धरला आहे.

दगडाचे मंदिर बांधून,

दगडाचेच देव स्थापून,

तो दगड दुसऱ्या दगडावर आदळल्यास देव कोठे गेला, गुहेश्वरा

(समग्र वचन संपुट-२ : वचन क्रमांक २१२)

असा सवाल करत देव आपल्या शरीरातच आहे, त्याला मंदिराची गरज नाही, असे उत्तरही तेच देतात.

देहाचे मंदिर असताना पुन्हा वेगळे मंदिर कशासाठी, गुहेश्वरा तुम्ही मंदिरातील ‘शिळा’ (मूर्ती) झाल्यास माझा वाली कोण?

(समग्र वचन संपुट-२ : वचन क्रमांक २१३)

असा प्रश्न ते आपल्या इश्वराला विचारतात.

कर्मयोगी असलेल्या सिद्धरामांच्या जीवनास कलाटणी देणाऱ्या प्रसंगाचे वर्णन करणारी अशी अनेक वचने आहेत.

सिद्धरामेश्वर योगिकुलचक्रवर्ती होते. ते सिद्धयोगी होते. साक्षात कपिलसिद्ध मल्लिकार्जुनास प्रसन्न करून घेणारे अशी त्यांची ख्याती होती. परंतु पूजा पाठ, कर्मकांडात सिद्धरामेश्वर अडकून पडल्याची खंत प्रभुदेवांच्या मनात होती. ते सोन्नलगीला – सोलापूरला आल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या मनातील स्थावर उपासनेतील गृहितके दूर करतात. त्यांना बसवण्णा प्रणीत शिवयोगाची महती सांगतात. त्यातून सिद्धरामेश्वरांचे मत परिवर्तन होते. ते प्रभुदेवांना शरण येतात. त्यानंतर आपला ‘कर्मयोगी ते शिवयोगी’ असा झालेला प्रवास प्रभुदेवांच्या साक्षीने त्यांच्या कृपेने झाल्याचे सिद्धराम सांगतात.

सिद्धपुरुष म्हणून अहंकारात गेलेल्या गोरक्ष-गोरखनाथाला शिवयोगाचा साक्षात्कार घडविणारे प्रभुदेव सारेच विलक्षण आहे. योगसाधनेमुळे वज्रदेही झाल्याचा अहं गोरक्षनाथांना आला होता. त्यावर देहाला वज्र बनविणे हे योगसाधनेचे उद्दिष्ट असू शकत नाही वा नसावे, असे खडसावून सांगताना कल्याणकारी ‘शिवयोगा’ची महती विशद केली आहे.

त्याचे असे की, गोरक्षनाथांनी हटयोगातून स्वतःच्या शरीराला वज्राप्रमाणे कठीण केले होते. ते वज्रदेही झाले होते. आपल्या साधनेवर त्यांना अभिमानही होता. आपल्या शरीरावर तलवार चालत नाही, कोणत्याही शस्त्राने आपल्याला इजा होणार

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button