मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केली असे बनाव करून बापाने केलेला लेकाचा खून उघडकीस. तिर्थपुरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी….

प्रेस नोट दि. 06.05.2024
मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केली असे बनाव करून बापाने केलेला लेकाचा खून उघडकीस. तिर्थपुरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी….
पोलीस स्टेशन व घटना स्थळ
पोलीस ठाणे तिर्थपुरी हददीतील मुरमा गावी
गुरनं. व कलम
91/2024 कलम 302 भादवी
फिर्यादीचे नाव व पत्ता
आरोपीचे नाव व पत्ता
नारायण बाजीराव माळी वय 37 वर्ष व्यवसाय नोकरी पोहेकॉ/1302 नेमणूक पोलीस ठाणे तिर्थपुरी जि. जालना
महादेव त्रिंबकराव घुटे वय 45 वर्ष व्यवसाय शेती रा. मुरमा ता. घनसावंगी जि. जालना
गुन्हा घडल्याची तारीख वेळ ठिकाण दिनांक. 23.02.2024 रोजी 22.30 वा. ते दि.24.02.2024 रोजीचे 08.00 वा. सुमारास मौजे मुरमा मयताचे राहते घरात
दाखल तारीख व वेळ
दि. 18.04.2024 रोजी 23.23 वा
गुन्हयाची माहोती कशी प्राप्त झाली
तपास अधि/तपास मध्ये मदत करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार
वैद्यकिय अभिप्राय पी. एम. रिपोर्ट वरून
मा. श्री. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे साहेब, पोनि. श्री खनाळ साहेब स्थानिक गुन्हे शाखा जालना, साजीद अहेमद सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे तिर्वपुरी पोउपनि, बाघ स्थानिक गुन्हे शाखा जालना, पोहेकों/1302 माळी, पोकों/298 पवार, पोकों/1657 तोटे, पोकों/943 फोलाने, पोकों/992 जाटे, पोलीस ठाणे तिर्थपुरी जि. जालना.
थोडक्यात हकिकत
गुन्हयाची थोडक्यात हकिकत अशी आहे कि, पोलीस ठाणे तिर्थपुरी येथे खबर देणार नामे बिबीशन किशनराव गपाट वय
50 वर्ष व्यवसाय शेती रा. मुरमा ता. घनसावंगी जि. जालना यांनी पोलीस ठाणे येथे हजर येवून खबर दिली की मयत नामे
शिवप्रसाद महादेव धुटे वय १९ वर्ष रा. मुरमा ता घनसावंगी जि. जालना याने राहते घरामध्ये मराठा आरक्षण न मिळाल्याने
घरातील लोखंडी फॅनला चादरच्या सहायाने गळफास घेवून आत्महत्या केली. वरून दि. 24.02.2024 रोजी आ. मृ. क्र.
06/2024 कलम 174 फो. प्र. स. प्रमाणे दाखल करून चौकशी बिट अंमलदार पाहेका माळी ब.नं. 1302 यांना देण्यात
आली. दि. 16.04.2024 रोजी मा. वैद्यकिय अधिकारी श्री. शिवाजी घुले प्राथमिक आरोग्य केंद्र तिर्थपुरी ता. घनसावंगी
जि. जालना यांनी शवविच्छेदन अहवाल दिला त्यात मयत नामे शिवप्रसाद महादेव धूटे वय 19 वर्ष रा. मुरमा ता.
घनसावंगी जि. जालना याचे मरणाचे कारण हे STRANGULATION (UNNATURAL) असे निष्पण्ण झाल्याने
वरिष्ठांच्या निदर्शनात आणून पोहेकों माळी ब.नं. 1302 यांचे फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुदध गुरनं. 91/2024
कलम 302 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस ठाणा प्रभारी सपोनि साजीद अहेमद यांनी स्वतकडे तपासकामी
घेतला. आज रोजी मयत शिवप्रसाद याचे वडील तथा संशयीत आरोपीत नामे महादेव थुटे यांना स्थानिक गुन्हे शाखा
जालना येथे विचारपूस करणेकामी पोनि. श्री. खनाळ साो. यांचे समक्ष हजर केले असता आरोपीताने नमुदचा गुन्हा
केल्याचे कबूल केले. तसेच मराठा आरक्षणाचा फायदा व्हावा करीता आरोपीताने मुलाचा केलेला खून लपवून
बनावट चिठठी तयार करून मुलाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असल्याचा बनाव रचला. सदरचा
बनाव पोलीसांनी फस्त केला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री. विशाल खांबे साहेब, पोनि. स्थानिक गुन्हे शाखा श्री. खनाळ साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे तिर्थपुरी येथील सहायक पोलीस निरीक्षक साजीद अहेमद, पोहेकॉ/1302 माळी, पोकों/298 पवार, पोकों/1657 तोटे, पोकों/943 फोलाने, पोकों राजू जाटे/992, पोकॉ. बावीस्कर स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
mud hand
साजीद अहेमद सपोनि पोस्टे. तिर्थपुरी


