सोशल

मंडलनामा क्रमशः 8. जात नव्हे वर्ग

मंडलनामा क्रमशः 8. जात नव्हे वर्ग

मी जनार्दन पाटलांकडून परत आलो. माझे दैनंदिन काम सुरू होते. आरे कॉलनीतील गोलनींची नोकरी सोडून अलीकडेच माहीमला गांधी यांच्या होजिअरी कारखान्यात दाखल झालो होतो. अधूनमधून जालन्याला जायचो. पत्नी, कुटुंबाला भेटून परत यायचो. पक्का चाकरमानी झालो होतो. जालन्याहून आणलेल्या काही मशीन विकल्या तर काही धूळ खात पडल्या होत्या. या धबडग्यात होजिअरी फॅक्टरी सुरू करण्याचे स्वप्न विरून गेले. मी नोकरीत रमत होतो. जनार्दन पाटील यांची भेट झाल्यानंतर डोक्यात खळबळ सुरू झाली, ‘तुझ्या धर्मातील त्या जातींचा शोध तुलाच घ्यावा लागेल’ हे जनार्दन पाटलांचे वाक्य सतत आठवत होते.

जालन्याला गेल्यानंतर काही जणांकडे पुन्हा चौकशी केली. हाती काहीच लागले नाही. मुंबईत काही मुसलमानांकडे चौकशी केली. तेव्हा कुछ भी पुछते क्या….? आपनेमें ऐस्सा कुछ नहीं’ असे उत्तर मिळायचे. असेच काही दिवस गेले. काम सुरू होते. कामासोबत विचारही सुरू होता. जनार्दन पाटलांनी ‘येत जा’ असे सांगितल्याचेही लक्षात होते. माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडेच मिळेल, असे मनोमन वाटू लागले. मी जनार्दन पाटलांकडे नियमित जाण्यास सुरुवात केली. त्यांच्या घरी जायचो, चर्चा करायचो. ते मला बैठक, भेटीगाठी, कार्यक्रमासाठी सोबत येण्यास सांगायचे. सुरुवातीला नाही म्हणालो, पण नंतर वेळ असेल तर त्यांच्यासोबत काही बैठकांना जायला सुरुवात केली.

त्यामुळे मुंबईतील जाती, लोक, त्यांच्या प्रथा, परंपरा, भाषा, राहणीमान, शिक्षण, नोकऱ्या, व्यवसाय याचा परिचय होऊ लागला. महाराष्ट्रात १८० ओबीसी जातींना शासकीय नोकऱ्यात दहा टक्के आरक्षण लागू होते. पण, ओबीसींची लोकसंख्या मोठी व खूप जाती यादीबाहेर असल्याचे मुद्दे बैठकीत मांडले जात. सर्व ओबीसींना यादीत सामावून घेऊन आरक्षणाचे प्रमाण वाढवावे, असा विचार व्हायचा. त्यासाठी मंत्र्यांच्या गाठीभेटी, निवेदने देणे, असा नित्य कार्यक्रम असायचा. जनार्दन पाटील हे ओबीसींसाठी सतत कार्यरत असत. ते वकील असले तरी कोर्टात वकिली केल्याचे मी पाहिले नाही. त्यांना सदासर्वकाळ ओबीसींचाच ध्यास असायचा.

मी जनार्दन पाटील यांच्यासोबत मुंबई व शहराजवळच्या गावांतील बैठकांना जाणे सुरू केल्याने लोकांच्या ओळखी वाढण्यास सुरुवात झाली. त्यावेळी जनार्दन पाटील यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाचे भाई दि. बा. पाटील, कम्युनिस्ट नेते लाड यांच्यासह नामदेव सुतार, असगर अली इंजिनीअर हे येत असत. पाटीलही त्यांच्याकडे जात असत. त्यांच्यासोबत अशा थोरामोठ्यांच्या ओळखी होऊ लागल्या. हिंदू ओबीसींमध्ये त्यांच्या हक्काबद्दल जनजागृती करणे सध्याच्या काळातही कठीण आहे. त्यावेळी ते किती महाकठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी. वेगवेगळ्या जाती, त्यांच्यातील उच्चनीच भाव, जातीय अहंकार या सर्वांवर मात करून ओबीसी आंदोलनासाठी त्यांची एकजूट घडवून आणण्याचे काम जनार्दन पाटील करत असत. त्याचवेळी मंडल आयोगाचे देशभर दौरे सुरू होते. त्याचाही सकारात्मक प्रतिसाद जनार्दन पाटील यांच्या चळवळीला मिळत होता. पण त्यांचे काम खूप कष्टाचे होते. त्यांच्यासारखा चिवट व अभ्यासू नेता मिळाल्यामुळेच महाराष्ट्रातील ओबीसींना आज थोडेफार बरे दिवस आले आहेत.

मंडल आयोगाच्या दौऱ्यावेळी कोणत्या जातीने कोणते निवेदन करायचे, लोकसंख्या कशी शोधायची, त्याबद्दलचा दावा कसा करायचा, मंडल आयोगाने जाहीर केलेल्या निकषानुसार आपली जात इतर मागासवर्ग म्हणून पात्र कशी ठरेल, याची मांडणी कशी करायची, इत्यादी मार्गदर्शन, कायदेशीर सल्ला, माहिती, पूरक मदत, अशी कामे पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटना करत असे. वेगवेगळ्या जातींच्या मुंबई व लगतच्या भागात बैठका होत. परंतु, महाराष्ट्राच्या ओबीसी जातींच्या यादीत मुसलमानांतील चार जातींचा समावेश असताना त्यांची एकही बैठक झाल्याचे त्यावेळी माझ्या निदर्शनास आले नाही. एव्हाना ‘ओबीसी’ म्हणजे काय याबद्दल माझे
पुरेसे प्रबोधन झाले होते. त्यामुळे त्या चार जातींप्रमाणेच ‘ओबीसी’ला पात्र मुसलमानातील काही वर्ग माझ्या डोक्यात स्पष्ट होत होते. त्या समाजातही काही हालचाल दिसत नव्हती. मंडल आयोगाच्या निकषात कोठेही जात हा शब्द वापरलेला नाही. ‘कास्ट’ नव्हे तर ‘क्लास’, असा शब्द होता. जात नव्हे वर्ग, असे मंडल आयोगाला अपेक्षित होते. हे माझ्या लक्षात आले होते. मी त्याबद्दल जनार्दन पाटील व इतर मोठ्या नेत्यांसोबत चर्चा करत असे.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button