“भुजबळ साहेबांसाठी ‘पोस्ट कार्ड आंदोलन’ सुरु करा!” – प्रा श्रावण देवरे यांचे वडीगोद्रीच्या युद्ध भुमीवरून 16 जून रोजी केलेले आवाहन

“भुजबळ साहेबांसाठी ‘पोस्ट कार्ड आंदोलन’ सुरु करा!” – प्रा श्रावण देवरे यांचे वडीगोद्रीच्या युद्ध भुमीवरून 16 जून रोजी केलेले आवाहन
(फक्त 7 मिनिटे 12 सेकंदांची क्लीफ)
1) लोकसभेचा अनुभव पाहता विधानसभेच्या निवडणुकीत एकच-एक ओबीसींचा पक्ष दमदार असायला हवा.
2) दमदार पक्षासाठी नेताही दमदार असायला हवा
3) आज घडीला महाराष्ट्रात एकच असा नेता आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ओबीसी संघटित होऊ शकतो.
4) माननीय छगन भुजबळ हे एकमेव असे नेते आहेत, की ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व ओबीसी जाती संघटीत होऊ शकतात.
5) आपापले गट-तट, पक्ष-संघटना, जाती-भेद, मतभेद विसरून भुजबळांच्या नेतृत्वाखाली काम करायला समस्त ओबीसी आतूर झाला आहे.
6) भुजबळांनी प्रस्थापित पक्षांना लाथ मारून बाहेर पडावे व स्वतंत्र ओबीसी पक्ष स्थापन करावा, यासाठी “पोस्ट कार्ड आंदोलन” सुरू करा.
7) किमान 10 लाख पोस्ट कार्डांचा पाऊस भुजबळ साहेबांच्या बंगल्यावर झाला तर साहेब निश्चितच पॉझिटिव्ह निर्णय घेतील.
8) 2024 ची पहिलीच विधानसभा निवडणुक आपला ओबीसी पक्ष जिंकणार.. भुजबळ मुख्यमंत्री होणार.. खोटे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून ओबीसींचे आरक्षण वाचविणार.. बिहारच्या नितीशकुमारांप्रमाणे जातनिहाय जनगणना करुन Sc+St+OBC चे आरक्षण ते 75 टक्केपर्यंत नेणार…
-प्रा श्रावण देवरे
संस्थापक-अध्यक्ष
ओबीसी राजकीय आघाडी
संपर्कः 88 301 27 270


