मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण

*मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
20*
*
शेतकरी जात असल्याचे सिद्ध होते. या पार्श्वभूमीवर मगर प्लान असा उभा राहतो कि, मराठे हे जर वरचढ शेतकरी जातीचे सदस्य असतील मग गेल्या तीच दशकात महाराष्ट्रातील शेतकरी सातत्याने आत्महत्या का करत आहेत ? मराठा जातीत गरिबी व दारिद्र्याचे अस्तित्व इतके सार्वत्रिक का आहे ? ह्या प्रश्नांनी मराठ्यांच्या संदर्भातील अंतर्विरोधी वास्तव अधोरेखित होते. हे अंतर्विरोधी वास्तव जन्माला का आले याच्या उत्तरातच आज मराठे आरक्षणाची मागणी का करत आहेत याची कारणे दडलेली आहेत.
भारताने १९९१ ला खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. खाउजा (खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण) धोरण म्हणूनही आपण त्यास ओळखतो. ह्या धोरणाचा स्वीकार केल्यानंतर विशेषतः भारत जागतिक व्यापार संघटनेचा (World Trade Organization – WTO) १९९५ मध्ये संस्थापक सदस्य बनल्यानंतर येथील कृषी क्षेत्र कमालीचे अरिष्टग्रस्त बनले. आजही ते त्यातून पुरते सावरलेले नाही. शेतीचा विकास दर ह्या तीन दशकाच्या काळात अपेक्षेपेक्षा खूप कमी राहिला आहे. अनेक वेळेस तो शून्याच्या खाली गेला असून तो सातत्याने १ ते २ च्या दरम्यान घोटाळत राहिला आहे. इतका न्युनत्तम विकास दर राखून शेतीचा विकास साधला जाऊ शकत नाही. सध्या भारतात शहरीकरणाचा वेग लक्षणीय प्रमाणात वाढला असला तरी अजूनही जवळपास ६७ ते ६८ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यातील ५२ टक्के लोकसंख्या ही थेटपणे आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. उरलेली १५ टक्के लोकसंख्याही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शेतीवरच अवलंबून असते. त्यामुळे शेती क्षेत्राला अरिष्टात ठेऊन सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट गाठले जाऊ शकत नाही. उलट असा विकास भासमान आर्थिक विषमतेला जन्म देत असतो. गेल्या तीन दशाळा असतो किंवा तो प्रचंड अशा अध्यांनी आत्महत्या केल्या आहेत, आणि आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. प्रसिद्ध शोध पत्रकार पी. साईनाथ यांनी ‘विदर्भ हा शेतकऱ्यांसाठी सर्वात वाईट असा प्रदेश बनला आहे तर महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची दफनभूमी बनला असल्याचे विधान केले होते (The Indian Express १४ Nov. २००७). निरंतरपणे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी साईनाथांचे विधान सर्वथैव बरोबर असल्याची
प्रचिती पुन्हा पुन्हा येत राहते.
पहिली नोंदविण्यासारखी बाब म्हणजे आज देशातील शेतजमिनीच्या सरासरी धारण क्षेत्राचा आकार १ हेक्टरच्या न्युनत्तम पातळीला आला आहे. म्हणजेच मराठा ही वरचढ शेतकरी जात असली आणि तिच्याकडे महाराष्ट्रातील
मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
बहुसंख्य शेतजमिनीची मालकी असली तरी मराठ्यांकडील शेतजमिनीचे मोठ्या बहुसंख्य शेतजमि होऊन तिचे विभाजन व अपन धन आले आहे. त्यामुळे अनेक मराठ्यांमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग उदयाला आला अनेक एका बाजूला शेतजमिनीचे मोठे क्षेत्र असणारा, तालुका वा जिल्ह्याच्या आहरात जोडधंदे असणारा, राजकीय लागेबांधे असणारा, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी सोयरिकीचे संबंध असणारा वर्ग मराठा जातीत असतो. आणि दुसऱ्या बाजूला अल्पभूधारक, तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारा, शहरात मिळेल ते काम करणारा असा वर्ग मराठा जातीत दिसून येतो. मराठ्यांच्या एकूण लोकसंख्येत ह्या साधन मराठ्यांची संख्या एकूण मराठ्यांच्या तुलनेत अल्प असली तरी तिचा आपल्या जातीसदस्यांवरील व एकूणच महाराष्ट्रातील राजकीय, आर्थिक व सामाजिक प्रक्रियांवर प्रभाव लक्षणीय आहे. मराठ्यांमधील हे वर्गस्तरीकरण मराठा जातीचे वास्तव बनल्याचे उघडपणे प्रत्ययास येते.
जागतिकीकरणाचे विरोधग्रस्त वास्तव आणि मराठ्यांची स्वविकासाची धडपड जागतिकीकरणाने एक कमालीचे विरोधग्रस्त वास्तव जन्माला घातले असल्याचे
आपण पाहत आहोत. चकचकीत व गुळगुळीत रस्ते, त्यावर धावणाऱ्या मोठ्या चारचाकी गाड्या मोठमोठे मॉल्स, आकर्षक व मनाला भुलवणाऱ्या मोहमयी क्रयवस्तूंनी भरलेल्या बाजारपेठा, मोबाईल फोन्स, टीव्ही, चांगल्या वस्तीत वन/टू बीएचके फ्लॅट, आयटी क्षेत्रातल्या तथाकथित आकर्षक पॅकेजेसच्या व मध्यमवर्गीयांचे स्वप्न बनलेल्या नोकऱ्या, शेअर बाजारातील गुंतवणूकी ह्या विकासाच्या मानक बनल्या आहेत. जाहिरातींच्या ह्या समकालीन युगात विविध माध्यमातून आपल्यापर्यंत येणाऱ्या जाहिरातींमुळे वरील बाबी आपल्या मनाचा कब्जा घेतात आणि परिणामस्वरूप विकासाच्या ह्या दुनियेचा भाग बनण्यासाठी प्रत्येकजण धडपडतो आहे, अविश्रांत
पळतो आहे. शेतकरीही त्याला अपवाद नाहीत. वर उल्लेखिलेल्या विकासाच्या दुनियेचा भाग बनण्याची लालसा
शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होणे अगदीच स्वाभाविक आहे. कोणालाही स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा विकास व्हावा वाटतो. शेतकरी स्थूलमानाने दोन पद्धतीने स्वतःच्या प्रगतीचा विचार करतो. एक म्हणजे स्वतःच्या शेतजमिनीचे उत्पन्न वाढविणे आणि दोन, आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना चांगल्या नोकरीला लावणे. शेतीतून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी नगदी पिके घेणे, चांगली आदाने (inputs) वापरणे तसेच सिंचनाची म्हणजेच पिकांना पाण्याची सोय
*मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
20
*




