सोशल

मनोज घोडके यांचा लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

*१९-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसी नेते व राज्याचे मंत्री श्री.छगनरावजी भुजबळ यांचे कट्टर समर्थक मनोज घोडके यांचा लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल*

*छत्रपती संभाजीनगर-*:~राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील लोकसभेसाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला.
ओबीसी नेते व महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री श्री.छगनरावजी भुजबळ यांचे कट्टर समर्थक म्हणुन त्यांची ओळख आहे.
गेल्या १५ वर्षांपासुन त्यांना सामाजिक व राजकीय कार्यांचा अनुभव असुन
राष्ट्रवादी कॅाग्रेंस पार्टी ओबीसी सेलचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व समता परिषदेच्या माध्यमातुन त्यांनी संपुर्ण जिल्ह्यात ओबीसी समाजाचे,पदाधिकार्यांचे,कार्यकर्त्यांचे
संघटन केले आहे.त्यांच्या उमेदवारीने जिल्ह्यातील प्रस्थापित उमेदवारांचे राजकीय गणित बिघडू शकते.
नाशिक लोकसभेसाठी महायुतीने जेष्ठ नेते श्री.छगन भुजबळ यांना ताटकळत ठेवल्याने भुजबळांनी निवडणुक लढवणार नसल्याचे जाहीर केले असल्याने संपुर्ण ओबीसी समाजामधे प्रचंड असंतोष असल्याने कार्यकर्त्यांच्या व समाज बांधवांच्या आग्रहामुळे तसेच
सुशिक्षित,अभ्यासु,तरुण व नविन चेहरा असल्याने जिल्ह्याचा विकास होण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज सादर केल्याचे मनोजभाऊ घोडके यांनी यावेळी सांगितले आहे.
उन्हाचे दिवस असल्याने तसेच पदाधिकार्यांना विनाकारण त्रास होऊ नये यासाठी शक्ती प्रदर्शन न करता साधेपणाने त्यांनी निवडक सहकार्यांसोबत उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी सादर केला.
यावेळी साळूबा पांडव, सुरेश बनसोड,गणेश काळे,चंद्रकांत पेहरकर,निशांत पवार,अर्जुन सोनवणे,लक्ष्मण हेकडे,विनायक पाराशर,संदीप घोडके,गणेश हिवाळे,केतन हेकडे,गणेश निकम,विराज घोडके, यश घोडके आदींची उपस्थिती होती.

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा. कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button