पुरोगामी आणि मानवतावादी म्हणून आम्ही किती दिवस गप्प बसायचं.

पुरोगामी आणि मानवतावादी म्हणून आम्ही किती दिवस गप्प बसायचं.
सुरुवातीला जो मराठा ओबीसी वाद सुरु झाला आम्ही त्यात मध्यम भूमिका घेतली.
नंतर जो अतिरेक पहायला मिळाला, जी जाळपोळ झाली, स्टेटस ठेवलं म्हणून आणि पोस्ट टाकली म्हणून ज्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या तेंव्हा मनाला कुठेतरी खटकलं.
ओबीसी आमदाराची घरं, कोणाचे हॉटेल जाळून जो अतिरेक झाला तो ही खटकला.
गरीब मराठा समाजाला मार्ग काढून सरकारने आरक्षण द्यावं किंवा शैक्षणिक सुविधा द्याव्यात या भूमिकेच आम्ही समर्थन केलं या पुढे ही करू. पण ओबीसीतुनच पाहिजे हा अट्टहास कश्यासाठी हे काही समजलंच नाही.
Ews च 10% पैकी 8:30 % आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला झाला असताना सुद्धा ओबीसीतुनच आरक्षण पाहिजे, मंडल आयोगच चॅलेंज करू या गोष्टी तर मनाल्या पटल्याच नाहीत.
आरक्षणाला विरोध करणारे नेते म्हणजे ओबीसी नेते असे पाडा की त्यांच्या सात पिढ्या राजकारणात दिसल्या नाही पाहिजेत ही दडपशाही मनाला न पटणारीच होती.
लायकी नसताना सुद्धा त्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय म्हणून आरक्षण घेणाऱ्या जातींना जे हिनवल गेलं ते तर खूपच अस्वस्थ करणार प्रकरण होतं.
भारतीय राज्य घटनेने सामाजिक मागास जातींना दिलेले आरक्षण स्वतःची जात सामाजिक मागास नसताना ही सामाजिक मागास आरक्षनातूनच आरक्षण पाहिजे हा असंविधानिक मुद्दा तर मनाला कधीच पटला नाही.
मराठा ओबीसी वादात मराठा समाजातील वैचारिक लोकांनी वैचारिकता आणि पुरोगामीत्व बाजूला ठेवून मराठा कसे मागास आहेत आणि ओबीसी मधूनच आरक्षण मिळाल पाहिजे ही भूमिका घेतल्याने अजून अस्वस्थ झालं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांनी वंचित पिडीत दलित भटके विमुक्त यांना आरक्षण मिळावं, त्यांना ही मानवतेच्या प्रवाहात आणावं या साठी दिलेलं आरक्षण दडपशाही आणि दंडेलशाहीच्या जोरावर कोणी हिसकावून घेत असेल तर आम्हीच कुठपर्यंत वैचारिक आणि मानवतावादी भूमिका घ्यावी.
आम्हाला ही आता ओबीसी एस सी एस टी भटके विमुक्त यांच्या साठी रस्त्यावर उतरावेच लागेल..
– परमेश्वर बनकर, बीड 9503288282
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*




