मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः57

मराठा आरक्षण विरुद्ध एडवोकेट मंगेश ससाने, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे, आंदोलनानिमित्त निमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः57
अस्मितावादाचे कोणतेही राजकारण हे आपल्या हिताविरोधात आहे. सर्वांना शिक्षण आणि सर्वांना रोजगार या कामगार-कष्टकऱ्यांच्या नाऱ्याला पुढे नेत, जातीविरोधी भूमिका घेणारी कामगार-कष्टकरी एकजूट हाच सर्व जातींमधील ग्रामीण व शहरी गरिबांच्या राजकारणाचा एकमेव योग्य मार्ग आहे.
ओबीसी महिला आणि राजकीय आरक्षण
डॉ. लता प्रतिभा मधुकर
कोटा मध्ये कोटा, ओबीसी महिलांसाठी खोटा खोटा’ या देशात ओबीसी स्त्रियांच्या संदर्भात एवढा रोष आणि विरोध का? ज्या ज्या वेळी महिला आरक्षण संदर्भात विधेयक आले, तेव्हा एस सी, एस टी महिलांना त्यात संख्येनुसार आरक्षण कोटा देण्याचे अंतर्भूत केले गेले, परंतु ओबीसी स्त्रियांना मात्र राजकीय आरक्षण दिले गेले नाही.
स्वतःच ओबीसी महिलांसोबत भेदभाव करायचे, त्यांना उपेक्षित ठेवायचे आणि त्यांना कोणतेही अवसर, सधी मिळू न देता निराश करून नशीब आणि देव धर्म यांच्या फेऱ्यात अडकवायचे असा हा डाव आहे. ओबीसी महिलाना अंधश्रद्ध म्हणून मग प्रतिगामी आणि पुरोगामी यांनी त्यांची लक्तरे फाडून आपल्यासाठी एक दैववादी स्त्री कामगार वर्ग कायम उपलब्ध राहील अशी व्यवस्था केली आहे. याचा अर्थ ३३ टक्के आरक्षणात सुद्धा हेच ब्राह्मणवादी धोरण राबवले आहे.
या विधेयकात उच्चवर्णीय महिलाना ७७ टक्के आरक्षण आणि २३ टक्के एस सी आणि एस टी महिलांचे. यात ओबीसी प्रवर्गातील महिलांना मात्र कुठेही आरक्षण नाही. त्यांना खुल्या गटात ठेवले म्हणायचे आणि त्यांची निवडणूक लढण्याची ताकद नसल्याने सर्व जागा उच्च वर्णीय स्त्रियांनी काबीज करायच्या. आणि एस सी, एस टी ना आरक्षण मिळाले आम्हाला नाही, असे म्हणून ओबीसी महिला मध्ये द्वेष पेरायचा, असे एकीकडे. तर एस सी, एस टी ना असे वाटू लागते की यांना ओपन मध्ये ठेवल्याने या स्वतःला ब्राह्मण मानतात आणि त्यांना काही प्राब्लेम नसल्याने त्या ओपन मध्ये आहेत. खरेतर ही एक विभाजन करून सत्ता ताब्यात ठेवण्याची जुनीच रणनीती आहे. त्यामुळे ज्या स्त्रिया फुले-शाहू-आंबेडकर अशा सत्यशोधक वाटेवर आहेत ज्यांना संविधान आधारित हक्क हवे आहेत,
अशा ओबीसी स्त्रिया मात्र या खेळीला बळी पडलेल्या दिसत नाहीत. या बाबतीत लक्षात घेतले पाहिजे की एक तर ओबीसी म्हणून मागास ठेवायचे, पण मागास म्हणून आरक्षण मिळू द्यायचे नाही. खुल्या वर्गातील उच्च
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




