मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 72

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
72
तत्त्वाच्या विरोधी वातावरण भारतात निर्माण करण्यात ब्राह्मणवादी यशस्वी झाले. विशेषतः “आरक्षण” हा विषय बदनाम करण्यात आला. जाती आधारीत आरक्षणा ऐवजी आर्थिक दृष्ट्या आरक्षण व्हावे असा सुर आळवला जावू लागला. त्याचा परिणाम म्हणून बहुजन जाती देखील आर्थिक दृष्ट्या आरक्षणाचा पुरस्कार करतांना दिसू लागल्या. यात ओबीसी प्रवर्गातील लोकांचा देखील सहभाग होता हे दुर्दैव आहे पण सत्य नाकारता येत नाही.
देवेगौडा सरकारने जातनिहाय जणगणना करण्याचा जो ठराव पास केला तो ठराव अटल सरकारने रद्द केला शिवाय सामाजिक न्यायाच्या लढ्यास रोखण्याचा प्रयत्न केला. अरुण शौरी या पत्रकारास डॉ. आंबेडकरावर “Worshipping false Gods” नावाचे पुस्तक लिहावयास लावून संघ भाजपाने डॉ. बाबासाहेबांना बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधाना विरोधी असलेले म्हणजे आरक्षण विरोधी असलेले धोरण म्हणजे निर्गुतवणूक मंत्रालय यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करून खासगीकरणास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. याचा परिणाम असा झाला की सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी होऊन खासगीकरणास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. परिणामी सामाजिक न्यायविरोधी धोरण राबविण्यास अटल सरकारने प्रयत्न केले.
शिवाय सरकारी नोकऱ्यांना पेंशन बंदीचा निर्णयही अटल सरकारने घेतला. पेंशन बंदी करून लाखो करोडो सरकारी-निमसरकारी नोकऱ्यांना पेंशन नाकारून त्यांचे आयुष्य बेदखल केले गेले. या धोरणाचे परिणाम आज आपण भोगत आहोत. कार्पोरेट सेक्टरला प्रोत्साहन देऊन सरकारी नोकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचे हे महापाप याच सरकारने केले.
गोध्रा हत्याकांड गुजरातमध्ये घडत असतांना तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्व घटनाद्रोही कारनाम्यास अप्रत्यक्ष पांठिबा दिला. राजधर्माची आठवण करून दिली खरी पण कोणतीही योग्य कारवाई मोदी सरकारवर केली नाही, हिंदु-मुस्लिम या दोन धर्मामधील दरी मोठ्या प्रमाणात वाढवल्या गेली. हजारो मुस्लिम स्त्रिया, पुरूष व बालकांचा नरसंहार घडविण्यात आला. हे उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या अटल सरकार मात्र बघ्याचे धोरण आखत होते. वंशद्वेष व धर्मद्वेषावर राजकारणाची फॅक्टरी म्हणून गुजरात मॉडेल उभे राहिले. एकिकडे विकासाचे मॉडेल व दुसरीकडे हिंदु-मुस्लिम द्वेषाचे बिजारोहण करून आगामी संघभाजपाचा धर्मद्वेषाच्या राजकारणाची प्रयोगशाळा गुजरात करून केंद्रात नेण्याचा हा प्रयत्न होता. ज्या अडवाणींनी, नरेंद्र मोदीची पाठराखण केली आज त्यांनाही बेचिराख करण्याचे कार्य नरेंद्र मोदींनी केले ते आपण आज पाहत आहोत. राजकीय दृष्ट्या आपल्या गुरूला अडगळीत टाकाण्याचे पुण्यकर्म आज मोदींनी केले आहे.
“शायनिंग इंडिया” चा नारा देत संघ भाजपाचा हा वारू दौडत राहिला. सुपर पॉवर २०२० ची स्वप्ने दाखून खाउजा धोरणाची अमलबजावणी करतांना सामाजिक न्यायाचा बळी मात्र गेला. अगोदरच अण्वस्त्रधारी असलेला भारत पुन्हा ४ अनुस्फोट घडवून आणले, शेजारी झोपलेल्या पाकिस्तानने उसणवारी करून अनुस्फोट घडवून आणले. ।। घाँस खाएँगे। लेकिन अणुबॉम्ब बनायेंगे ।। चा नारा पाकिस्तानने दिला. परिणामी हिंदु-मुस्लिम ध्रुविकरणाचा अजेंडा पुढे नेण्यास अटल सरकार यशस्वी झाले. “Super Power” ची स्वप्ने दाखवत भारतीय संविधानाचा गाभा तत्वांना हारताळ फासण्याच काम अटल बिहारी सरकारने केले.
अटलबिहारी वाजपेयीच्या स्वच्छ व सौम्य छबीचा वापर करून ब्राह्मणी मुलतत्वावाद वाढविण्यास संघभाजपा यशस्वी झाले. आम्ही “Right Man in Wrong Party” म्हणत बसलो ते मात्र बहुजन विरोधी अजेंडा बनवत राहिले. व त्यांची अमलबजावणी करण्यात ही यशस्वी झाले. बहुजन विरोधी धोरणे आखणाऱ्या व अंमल करणाऱ्या या नेत्यास पुढे “भारतरत्न” सारखे किताब देऊन गौरवण्यात आले. खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. हे आम्हाला म्हणजे ओबीसींना अजूनही कळत नाही हे दुर्दैव आहे.
ब्राह्मणवादाचा परमोत्कर्ष नरेंद्र मोदीचा उदय
२०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजप व मित्रपक्षाला दोन तृतीयांपेक्षा जास्त खासदार निवडून आणता आले. संसदेमध्ये प्रथम प्रवेश करतांना पायऱ्यांवर डोक ठेवून पंतप्रधान मोदींनी प्रवेश केला मात्र खरा पण संसदीय लोकशाहीच्या प्रथा आणि परंपरा मात्र न पाळण्याची त्यांनी शपथच घेतली. २०१४ च्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी सामाजिक न्यायास हरताळ फासण्याचे काम केले. आपण स्वतः ओबीसी प्रवर्गातून येतो असे म्हटले पण ओबीसीच्या कल्याणाच्या कृतीकार्यक्रम मात्र त्यांनी आखले नाहीत. उलटपक्षी ओबीसी भटके विमुक्तावर कसा न्याय होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली. केंद्रिय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उर्तीर्ण झालेल्या ३०० पेक्षा जास्त
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




