सोलापूर

🔥 नांद्रा कोळीत माळी महासंघाची दमदार एंट्री!


🔥 नांद्रा कोळीत माळी महासंघाची दमदार एंट्री!

 

 

शाखा उद्घाटनातून ओबीसी हक्कांसाठी संघर्षाची रणशिंगे; जातनिहाय जनगणनेसाठी १५ ऑगस्टला ग्रामसभेत ठरावाचा निर्धार!

नांद्रा कोळी | बुलढाणा

संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७३१ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून तसेच अखिल भारतीय माळी महासंघाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त बुलढाणा तालुक्यातील नांद्रा कोळी येथे अखिल भारतीय माळी महासंघाच्या ग्राम शाखेचे उद्घाटन व नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय राजाभाऊ खरात होते, तर शाखेचे उद्घाटन राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश भाऊ हिरळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अभिजीत तायडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रीतीताई खंडारे, बुलढाणा शहराध्यक्ष प्रीतीताई डांगे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, तालुका उपाध्यक्ष रमेश माधवराव उबाळे तसेच ग्रामसभा अध्यक्ष अशोक होळेकर यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. विजय राजाभाऊ खरात यांचे स्वागत रमेश उबाळे यांनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश भाऊ हिरळकर यांचे स्वागत अशोक होळेकर यांनी, अभिजीत तायडे यांचे स्वागत भानुदास होळकर यांनी, राजेंद्र पवार यांचे स्वागत पंढरी राऊत यांनी, प्रीतीताई खंडारे यांचे स्वागत हिराबाई क्षीरसागर यांनी, तर प्रीतीताई डांगे यांचे स्वागत राधाबाई यांनी केले.

🔥 गावागावात, घराघरात पोहोचवणार फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार!

शाखा उद्घाटनानंतर पदाधिकाऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार, ओबीसी समाजावरील अन्याय-अत्याचाराविरोधात संघटित लढा आणि समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी गावागावात जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.

अखिल भारतीय माळी महासंघाची संघटनात्मक ताकद वाढवत गावातील प्रत्येक गल्ली-बोळात आणि घराघरात पोहोचून समाजाला संघटित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

🔥 जातनिहाय जनगणनेसाठी १५ ऑगस्टला ग्रामसभेत ठराव!

जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, या मागणीसाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभेत ठराव मांडून तो मंजूर करण्याचा निर्धार नांद्रा कोळी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ओबीसींचे न्याय्य हक्क, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या, महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न तसेच समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आवाज बुलंद करण्यात येणार आहे. या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संघर्षाची दिशा स्पष्ट!

“अन्याय सहन करणार नाही आणि हक्क मिळेपर्यंत शांत बसणार नाही,” या भूमिकेतून अखिल भारतीय माळी महासंघाची नांद्रा कोळी ग्राम शाखा सामाजिक व संघटनात्मक प्रश्नांवर आक्रमकपणे काम करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या शाखेच्या उद्घाटनाबद्दल अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी ग्राम शाखेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

उपस्थित पदाधिकारी व समाजबांधव

ग्रामसभा अध्यक्ष अशोक होळेकर, ग्राम शाखा उपाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, सचिव अर्जुन उबाळे, सहसचिव शंकर राऊत, सदस्य संजय गवळी, विष्णू होळकर, गजानन राऊत, सुरेश जित्ते, राजेश लहासे, राजू गोरे, पुरुषोत्तम होळेकर यांच्यासह श्रीराम महाराज, रामेश्वर राऊत, माधव दराखे, गजानन गवळी, प्रल्हाद गोरे, तुकाराम गायकवाड, गजानन घोगळे, मनोज जाधव, संदीप क्षीरसागर, कडूबा सोनवणे, संजय उबाळे, राजाराम गोरे, दुर्योधन जाधव, कृष्णा धनेश्वर, विष्णू गवळी, सीताराम सोनवणे, दगडूभाऊ राऊत, सुखदेव होळेकर, सुरेश हुडेकर, पांडुरंग गवळी, आत्माराम गोरे यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.

📰 संपादकीय संदेश | दिनबंधू न्यूज – शिवक्रांती टीव्ही

संघटना ही केवळ पदांची माळ नसते; ती समाजाच्या प्रश्नांसाठी उभी राहणारी संघर्षाची ताकद असते.

नांद्रा कोळी येथे सुरू झालेली ही ग्राम शाखा केवळ उद्घाटनापुरती मर्यादित न राहता ओबीसी हक्क, जातनिहाय जनगणना, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी प्रभावी जनआंदोलनाचे केंद्र बनावे, हीच अपेक्षा.

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची मशाल घेऊन अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करा, समाजाला संघटित करा आणि संविधानिक मार्गाने न्यायासाठी संघर्ष करा!

— सत्यशोधक शंकरराव लिंगे
संपादक, दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

📱 व्हॉट्सॲप संपर्क : ७३८७३७७८०१

👉 बातमी लाईक करा | शेअर करा | फॉरवर्ड करा | कमेंट करा | सबस्क्राईब करा | बेल आयकॉन दाबा
👉 ७३८७३७७८०१ हा नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की जोडा.हॅशटॅग

#अखिलभारतीयमाळीमहासंघ #नांद्राकोळी #बुलढाणा #सावता_महाराज #सावता_महाराज_संजीवन_समाधी #जातनिहाय_जनगणना #ओबीसी #ओबीसीहक्क #महात्माफुले #फुलेविचार #सामाजिकन्याय #ओबीसीआंदोलन #शेतकरीप्रश्न #विद्यार्थीप्रश्न #महिलाप्रश्न #कामगारप्रश्न #दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #सत्यशोधकशंकररावलिंगे #MaliMahasangh #OBC #CasteCensus

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button