राजकारण

# 🚨 पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाला ₹३,९९३.९० कोटींची गती; मात्र सोलापूर जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांना समान न्याय द्या, अन्यथा जनआंदोलन – सत्यशोधक शंकरराव लिंगे

# 🚨 पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाला ₹३,९९३.९० कोटींची गती; मात्र सोलापूर जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांना समान न्याय द्या, अन्यथा जनआंदोलन – सत्यशोधक शंकरराव लिंगे

मुंबई येथील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आमदार समाधान आवताडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेस ₹३,९९३.९० कोटींची प्रशासकीय मान्यता दिली असून, पंढरपूरला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या आराखड्यांतर्गत वारकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा, मंदिर परिसरातील भव्य कॉरिडॉर, पुरातन मंदिरे व मठांचे जतन, नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास, चंद्रभागा नदी घाटांचे सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळ, व्यापारी संकुले, शहर सुशोभीकरण, नवीन रस्ते, पूल, पालखी तळांचा विकास आदी विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, विकासकामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी भूसंपादन, पुनर्वसन आणि मोबदल्यासाठी ₹२,०२६.७२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच भूसंपादनासाठी आवश्यक निधीपैकी तातडीने ३० टक्के निधी वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले असून, सन २०२६-२७ च्या पुरवणी मागणीत ₹६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पंढरपूरच्या धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असून वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

✍️ संपादकीय संदेश

अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी महाराष्ट्र शासनाकडे ठाम मागणी केली आहे की, पंढरपूरप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील अरणसह सर्व तीर्थक्षेत्रांसाठीही समान विकास धोरण लागू करण्यात यावे. कोणत्याही एका तीर्थक्षेत्रालाच प्राधान्य देऊन इतर तीर्थक्षेत्रांवर अन्याय होऊ नये.

सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी भूसंपादन होत असल्यास बाधित शेतकरी, जमीनधारक, व्यापारी व स्थानिक नागरिकांना सर्वतोपरी प्राधान्य देऊन न्याय्य मोबदला, प्रभावी पुनर्वसन, रोजगाराच्या संधी आणि कायदेशीर हक्कांची पूर्ण हमी देण्यात यावी.

विकासाच्या नावाखाली कोणत्याही तीर्थक्षेत्रातील बाधितांवर अन्याय झाल्यास अखिल भारतीय माळी महासंघ जनतेच्या पाठिंब्याने तीव्र लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारेल, असा इशारा सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी महाराष्ट्र शासनाला दिला आहे. विकासाला विरोध नाही; मात्र समान न्याय, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक पुनर्वसन हीच शासनाची खरी जबाबदारी आहे

📢 आवाहन

आपला व्हॉट्सअॅप क्रमांक : ७३ ८७ ३७ ७८ ०१
हा क्रमांक आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

बातमी लाईक करा • शेअर करा • सबस्क्राईब करा • फॉरवर्ड करा • कमेंट करा • बेल आयकॉन दाबा • दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनेल फॉलो करायला विसरू नका.

#हॅशटॅग

#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #सत्यशोधकशंकररावलिंगे #पंढरपूर #पंढरपूरकॉरिडॉर #विठ्ठलरुक्मिणी #सोलापूर #अरणतीर्थक्षेत्र #तीर्थक्षेत्रविकास #भूसंपादन #पुनर्वसन #बाधितांनासमानन्याय #महाराष्ट्रसरकार #जनआंदोलन #वारकरी #धार्मिकपर्यटन #समानविकास

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button