मोदी लाट ओसरली…

मोदी लाट ओसरली…
🙏🙏🙏🙏💐💐💐💐🟡🟡🟡🟡
सचिन गाजलेली ही अठरावी लोकसभेची निवडणूक ! १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. रणांगणावर एनडीए व इंडिया आघाडी अशी दोन सैन्ये आमने-सामने
💐💐💐💐💐💐💐💐 १०९ मतदारसंघातील मतदान सारी आहेत. या निवडणुकीच्या पक्षित निवडणुकीत मतदानाच्या एकहदी मत फेऱ्या होणार अहित तमामुळे यावेळच्या लोकसा चाहूल पहिल्या फेरीतच लागली, हिंदी भाषिक पट्ट्यात व अन्यत्रही मतदानाची टसाध्या कमी झाली. नागालँडमध्ये नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे तिथे काही ठिकाणी शून्य मतदान झाले. या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी ६०% मतदान झाले. तेही अपेक्षेपेक्षा कमी झाले. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये ‘मोदी लाट’ जाणवत होती. यावेळी मात्र मोदी लाट ओसरलेली दिसते.
मोठ्या लाटेखाली समुद्राच्या पोटातल्या छोट्या लाटा व लहरी दबल्या जातात. पृष्ठभागावरची मोठी लाट ओसरली, की समुद्राच्या पोटात दडलेल्या छोट्या लाटा वर येऊ लागतात. नेमके तसेच या निवडणुकीत घडताना दिसत्येय. आजवर मोदींची मोठी लाट असायची. पंतप्रधानपदावर मोदी हवेत की नकोत, असा मध्यवर्ती प्रश्न असायचा. ‘मोदींचे दोष काढू नका’, ‘ते अपयशी असतील तरी तसे बोलू नका’, ‘मोदी-शहा यांची हुकूमशाही चालू असली तरी चूप बसा’, ‘बोललात तर तुम्हाला उद्ध्वस्त केले जाईल’, ‘याद राखा’, ‘मोदींना पर्याय नाही’, असे फंडे आजवर खूप चर्चिले जात. यावेळी त्यात तपास यंत्रणेकरवी विरोधकांच्या छळाची आणि देशात सार्वत्रिक भय निर्माण करण्याची भर पडली. मोदी पंतप्रधान नसतील तर देश रसातळाला जाणार हे खरे नाही. मोदी-शहा यांच्या
दादागिरीपेक्षा आघाडीचे लोकशाहीवादी केंद्र सरकार आले तर जगबुडी होणार नाही. जनादेश किंवा बहुमत हे कायमस्वरूपी नसते. तसेच ते सार्वभौमही नसते. भारतीय राज्यघटनेप्रमाणे संसद सार्वभौम नाही. ‘भारतीय जनता’ सार्वभौम आहे. ती अनादी काळापासून आणि अनंत काळ सार्वभौमच राहणार आहे. लोकसभा व बहुमत यांची मुदत फक्त पाच वर्षांपुरतीच असते. स्वाभाविकच संसद सार्वभौम असू शकत नाही. नरेंद्र मोदींना लागोपाठ दोन वेळा बहुमत मिळाले. म्हणून चंद्र व सूर्य असेपर्यंत मोदी पंतप्रधान राहणार, हा विचार बालबुद्धीचे भाजप व संघ स्वयंसेवक सांगू लागले, काळाच्या अंतापर्यंत मोदी पंतप्रधान राहणार हे सिद्ध करण्यासाठी ते अमर आहेत असे ही मंडळी सांगत. मोदी विष्णूचा अवतार आहेत हा तर्क मग ओघानेच आला. माणसाला निश्चित ठाऊक असते, की तो मरणार हे नक्की आहे. मृत्यू अटळ आहे. या अटळ गोष्टीची प्रचंड भीती वाटते, म्हणून तो अमरत्वाची कल्पना रंगवतो.स्वतःला खोटा दिलासा देऊन स्वतःचीच फसवणूक करतो. त्यामुळेच माणसाला देवाची मानसिक गरज असते. मोदी व महाही चालतं आहेत, याबदल कुणाच्या आणि असू नये. ते अमरपट्टा घेऊन आले आहेत, असे बालकांना वाटले तरी प्रौढांना वाटता कामा नये, बालवयात बालमा रगवण्यात आनंद मिळतो. बालकांच्या या स्वानंदाला कुणी धक्का लावत नाही, म्हणून तर, बालकांना मतदानाचा अधिकार नसतो. फक्त प्रौढांनाच मतदानाचा हक्क प्राप्त होतो, मोदी देवाचा अवतार आहेत या कल्पनेने भाजपवाले
आमोदी स्वतःच फसले. त्यामुळे त्यांच्यामध्ये बुध्दीमांद्य आले. त्यांची विचारशक्ती संपुष्टात आली, मोदी-शहा हुकमाचे एका झाले आणि भाजपचे पुढारी, मुख्यमंत्री पत्त्याच्या डावातले दुशैं-तिरी बनले. रणनिती व डावपेच आखण्याची सारी जबाबदारी मोदी-शहा या जोडगोळीवर आली. त्यांची बुध्दी गुजराती व्यापाऱ्याची. ती त्यांची शक्ती आणि तीच त्यांची मर्यादा. गेल्या दहा वर्षांत या जोडगोळीने भरपूर व्यापार केला. त्यापेक्षा अधिक काही करण्याची त्यांची क्षमताच नव्हती. म्हणून त्यांना माफ केले पाहिजे, पण त्याच बरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे, की व्यापार करण्यासाठी ईश्वर भूतलावर अवतार घेत नसतो. शेतकऱ्यांचे प्रश्न, गरीबी, बेकारी, महागाई, महिलांवरील अत्याचार, धर्मद्वेष, जातीद्वेष या समस्या मोदी शहांच्या आकलनक्षमतेच्या कक्षेबाहेर आहेत. व्यापाऱ्यासमोर कोणताही प्रश्न आला तर त्यात तो फक्त ‘नफा-तोटा’ शोधतो. तसेच या जोडगोळीचे झाले.
करोना महामारीची अक्राळविक्राळ समस्या देशासमोर उभी राहिली. परंतु त्या समस्येत या जोडगोळीला फक्त आपला नफा दिसला. नेमक्या त्याच काळात भाजप मयदिबाहेर श्रीमंत पक्ष बनला. व्यापारी सौदेबाजीत तरबेज असतात. नेमक्या करोनाच्या काळात भारतातले शंभर चोर व भामटे अब्जाधीश बनले. त्यात प्रामुख्याने औषध कंपन्यांच्या मालकांचा समावेश आहे. करोना महामारीत माणसे मरत होती; पण व्यापाऱ्यांनी नकली औषधे खपवून प्रचंड संपत्ती गोळा केली. त्यांचा काळाबाजार, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा पारंपारिक धंदा चालू ठेवण्यासाठी त्यांना निवडणूक रोखे (इलेक्टोरल बॉण्डस्) या नकली नावाने भाजपला निधी द्यावा लागत असे. निवडणूक रोख्यांचा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेऊन उघडा केला. तेव्हा कळले, की जगातली मोठी राजकीय पार्टी म्हणून बिरूद मिरवणारी
भाजप जगातील सर्वात मीठा भ्रष्टाचार करणारा पक्ष आहे. देव अजर, अमर असले तरी माणूस आपल्या संकुचित नारीने त्यांना गावात आपल्या खातो, पण इथे विपरित घडले. विष्णूचा अवतार स्वतःच सगळ्यांचे नैवेद्य खाऊ लागला, जी भक्त पंचपक्वाने खाऊ घालेल, त्यांच्यावर विशेष कृपा को अक्ल पक्षाचे सा अदानी-अंबानी यांनाच मिळू लागली सरकारी सर्व ले करण्याची अक्कल त्यांच्याकडे आहे किंवा नाही याची पडताळणी केली जात नव्हती. भाजपचे पाठीराखे भांडवलदार बकासूर प्रजातिचे आहेत. ते कोळश्याच्या खाणी, विमानतळे, बंदर, सिमेंट, ऊर्जा क्षेत्रे सारे काही मटकावू लागले, पंतप्रधानांच्या दौऱ्याचा खर्च भारत सरकार जनतेच्या कररूपी पैशांमुळे करते, सार्वजनिक खचर्चाने मोदी जगभर फिरू लागले. दौरे कशासाठी… तर अदानींना बांगला देशने, श्रीलंकेने, फ्रान्सने कंत्राटे द्यावीत हा त्या देशांच्या प्रमुखांवर दबाव आणण्यासाठी. मोदी त्यांच्या कार्यकाळात देशाचे पंतप्रधान नव्हतेच मुळी, तर ते होते अदानींच्या कार्पोरेट कंपनीचे विक्रेते! हा तमाशा हळूहळू सामान्य जनतेला कळू लागला.
व्यापारी जेव्हा राजकीय सत्ता हस्तगत करतात, तेव्हा त्यांच्या नफ्याच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला ते संपवतात. पण तरीही व्यापारी मंडळी क्षत्रियांप्रमाणे पराक्रमी तलवारबाज नसतात. क्षात्रतेज नसलेले हे व्यापारी सारी अपकृत्ये अंधारात, पण अप्रतिम कौशल्याने करतात. ती काळी कृत्ये उजेडात यायला आणि सामान्य जनतेसमोर उघड व्हायला काही वेळ लागतो, एवढेच ! आपल्या मार्गातले एकेक अडथळे दूर करायला मोदी-शहांनी सुरूवात केली. त्यांनी पहिला हल्ला स्वपक्षावरच केला. भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना कचऱ्याच्या डब्यात टाकले. मग वेगवेगळ्या राज्यातील स्वपक्षातील लोकप्रिय नेत्यांची काटछाट केली. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान, राजस्थानमधील वसुंधरा राजे यांची उदाहरणे ठळक आहेत. स्वतःच्या पक्षातील संभाव्य स्पर्धक नष्ट केल्याशिवाय मोर्दीचे स्थान अढळ झाले नसते. त्यासाठी त्यांनी विरोधी राजकीय पक्षांतून अनेक नेते आयात केले. दुसऱ्या पक्षातून येणारे नेते त्यांना सहजासहजी मिळत नव्हते. मग त्यांच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय अशा तपास यंत्रणा लावून त्यांना प्रथम बिलबिले करण्यात आले. नंतर त्यांना तुरुंगाची भीती दाखवून, ते शरणागत झाल्यानंतर त्यांना भाजपत प्रवेश दिला.
सत्याग्रही विचारधारा मे २०२४ । भाग पहिला
🙏🙏🙏🙏🟠🟠🟠🟠🔴🔴🔴🔴🟡🟡🟡🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




