अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!!! हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सींग सैनी यांची नुतन मुख्य मंभी पदी निवड झाले बददल हर्दिक अभिननंदन

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!!! हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सींग सैनी यांची नुतन मुख्य मंभी पदी निवड झाले बददल हर्दिक अभिननंदन
हरियाणात प्रस्थापित जाट विरुद्ध ओबीसी : संघर्ष ओबीसी चा विजय
हरियाणा मध्ये माळी सैनी ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री नायक सिंग सैनी माळी (आ बी सी ) झाल्यानंतर मुख्यमंत्री येणे यांनी महात्मा फुले यांची प्रतिमा डोक्यावर घेऊन आनंद व्यक्त केला केला महात्मा फुले म्हनसतेतात सत्ते वाचुन आल्या अवकळा सकळ कळा । आज सत्ता आली आनंद झाला
भाजपची यशस्वी खेळी!…
2014 पासून जसे महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चा निघाले आंदोलन तीव्र झाले त्याचप्रमाणे हरियाणा मध्ये “जाट” समाजाने ओबीसीतून आरक्षणाचा लढा 2016 – 17 मध्ये तीव्र केला होता. हे आंदोलन अतिशय हिंसक होते. या आंदोलनामध्ये अनेक ओबीसींची हॉटेल्स, दुकाने, घरे उध्वस्त केली होती. जाळपोळ केली होती. मारहाण केली होती. या आंदोलना भीक न घालता भाजप सरकारने जाट समाजाची मागणी मान्य केली नाही. हरियाणा हायकोर्ट ने जाट समाजाच्या विरुद्ध निकाल दिला. “जाट” समाज ही जमीनदार राज्यकर्ती जमात आहे. राज्याचे पालक जाट असल्यामुळे त्यांना कोर्टानेही आरक्षण नाकारले. आणि सरकारने ही नाकारले. त्यामुळे या ठिकाणी भाजपला खूप नुकसान झाले होते. यावेळी भाजपचे रणनीतीकार अमित शहा यांनी ओबीसीच्या छोट्या छोट्या जाती एकत्र करून त्यांना बळ दिलं. साहेब सिंग “सैनी” या “माळी ओबीसी” समाजातील नेत्याला मुख्यमंत्री बनवलं. भाजप सरकारचे प्रतिमा सुधारण्यास सुरुवात झाली. छोट्या छोट्या दलित जातींनाही पाठबळ दिलं. “विश्वकर्मा आर्थिक विकास महामंडळाच्या” माध्यमातून बारा बलुतेदारांना सक्षम आर्थिक कार्यक्रम केंद्र सरकार मार्फत राबवला. त्याचा फायदा बीजेपीला झाला. त्याचबरोबर बीजेपी ने दूषण सिंग चौटाला पार्टी,आम आदमी पार्टी, मायावती पार्टी, लोक दल पार्टी, आझाद यांची दलित पार्टी, यांना स्वतंत्र लढवून काँग्रेसचे मतदान मोठ्या प्रमाणात विभाजन केले. काँग्रेसचा ही मतदार दलित ओबीसी आणि अल्पसंख्यांक होता परंतु काँग्रेस नेहमी “जाट” समाजाला प्राधान्य देऊन झुकते माप देत होते. आणि त्यांचा मुख्यमंत्री करत होते. कधी भजनलाल कधी बनशीलाल यांना सक्षम देवीलाल यांच्या समोर ताकद देऊन जाट समाजाचे मतदान मिळत नसतानाही त्यांचे लाड पुरवत होते. त्यामुळे त्यांच्यापासून दलित आणि ओबीसी भटकत गेला आणि त्याचाच फायदा बीजेपीला झाला.
अशाच प्रकारची परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे “ओबीसी विरुद्ध मराठा” आरक्षणाचा वाद पेटला आहे. मराठा ओबीसीतूनच आरक्षण मागत आहे. आठ आयोग सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांनी नाकारले तरी झुंडशाही गुंडशाही साम-दाम-दंड-भेद नीती वापरून ओबीसी समाजावर अन्याय करत आहे. जातीवादी एकनाथ शिंदे सरकार बेकायदेशीर जीआर काढत आहे. या वेळेला मराठा आरक्षणाने हिंसक वळण घेऊन ठिकठिकाणी जाळपोळ मारहाण जीवित हानी वित्तहानी करून दहशतीचे वातावरण मराठा झुंड शाहीने तयार केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजापुढे दुसरा पर्याय नाही. ओबीसीला साथ देतील त्या पक्षाबरोबर जाणे मराठ्यांच्या विरोधातल्या उमेदवारांना निवडून देणे. ओबीसीची सक्षम पार्टी झाल्यास त्यांना साथ देणे हिताचे ठरणार आहे. भाजप हा जरी जातीवादी पक्ष असला किंवा ओबीसींच्या शिवफुले शाहू आंबेडकर विचाराच्या विरोधात असला तरी सुद्धा जरांगेच्या बेकायदेशीर मागण्या, अन्याय अत्याचार झुंडशाही गुंडशाही दहशत निर्माण करणाऱ्या मराठ्यांना रोखण्या साठी विचाराच्या पलीकडे जाऊन बीजेपी मधील “मराठा उमेदवार सोडून” ओबीसींना साथ देणाऱ्या उमेदवारांना सढळ हाताने मतदान केल्या शिवाय मस्तवाल मराठ्यांना रोखू शकत नाही. त्यामुळे ओबीसी हा मराठा सोडून खास करून राष्ट्रवादी शरद पवार तुतारी सोडून कोणत्याही पक्षाच्या आदिवासी बीसी ओबीसी अल्पसंख्यांक उमेदवारांना ओबीसी मतदान करणार आहे. कोणत्याही परिस्थिती मध्ये मराठा उमेदवारांना मतदान करणार नाही!
महाराष्ट्राचे अभिमन्यू देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जर…..”दलित ओबीसीचे जास्तीचे उमेदवार उभे केले”…..त्यांना सर्व प्रकारचे पाठबळ दिले तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा युतीचे सरकार येऊ शकते. राष्ट्रवादी ही मराठा समाजाची पार्टी डिक्लेर झालेली आहे. शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे रोहित पवार आता आणखी दोन पवार यामध्ये उभा राहण्याची शक्यता आहे त्यांनी पुणे जिल्हा नगर जिल्हा सोलापूर रायगड जिल्हा मध्ये उभा राहून सर्वसामान्य उमेदवारांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला आहे अनेक घराणे फोडून आपली पोळी भाजून घेतली आहे त्यामुळे पवार घराण्याचे फावले आहे त्यांना स्वतःच्या घराशिवाय सगे – सोयऱ्या शिवाय दुसरे काही दिसत नाही “मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची पार्टी मराठा व जातीवादी डिक्लेअर झालेले आहे त्यांना मराठा समाजाने आणि हिंदू वोट बँकेने साथ दिली तरच त्यांचा टिकाव लागू शकतो या पार्टीला ओबीसी चुकूनही मतदान करणार नाही ओबीसी चे फार मोठे नुकसान केले आहे ती पार्टी फेल होऊ शकते अजित दादा पवार यांनी ठरवून अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला जास्तीचे तिकीट दिली भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून तटकरे साहेब यांच्या माध्यमातून ओबीसी ना झुकत माप दिलं ओबीसी नेत्यांना स्टार प्रचारक बनवलं सर्व प्रकारची ताकद दिली तरच राष्ट्रवादी अजित दादा गट तरू शकतो. अन्यथा नात्यागोत्यामध्येच पवार पाटील देशमुख लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका मुलगा लाडका पुतण्या लाडका चुलता लाडकी चुलती कोणत्याही लाडक्याला लाडकी ला घरच्यांना सगळे सोयऱ्यांना तिकीट वाटत बसले तर ही पार्टी सुद्धा फेल होऊन घरी बसू शकते.
शिवसेना यु बी टी ठाकरे गट त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाची मतं पाहिजे तेवढी मिळालेले नाहीत. त्यांना हिंदू मुस्लिम मते मिळाली ओबीसींची ही मते त्यांना मिळालेली आहेत. त्यामुळे शिवसेना उभाटा गट यशस्वी व्हायचा असेल तर ओबीसींना जास्तीची तिकीट दिल्या शिवाय कोणताही उपाय नाही. उबाटा मध्येही मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे उबाटा पार्टीला सोडून ओबीसी दुसरीकडे वळण्याची शक्यता आहे. याची दखल उद्धव साहेबांनी घ्यावी काँग्रेसने नेहमीच देश स्वतंत्र झाल्यापासून खास करून 1960 पासून यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी “सहकार क्षेत्राचे” निर्मिती केल्यानंतर मराठा समाजाला सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका दूध डेरी, शिक्षण संस्था, गावातील मंदिर ट्रस्ट, प्राचीन मंदिरे देऊन आर्थिक दृष्ट्या मजबूत केले मराठ्याला काय दिलं नाही ते सांगा. शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर उरली सोडली ताकद मराठा समाजाला नेहमीच दिली आहे. प्रत्येक तालुक्याला दोन सूतगिरणीचे वाटप करताना पवार साहेबांनी 90% सूतगिरण्या मराठ्यांना दिल्या होत्या. एवढ देऊनही सर्व जवळ जवळ 90% मराठा समाज हा काँग्रेस पासून दूर झालेला आहे. मराठा समाज एवढं जर ओबीसी अल्पसंख्यांक लोकांना जर दिल असतं तर काँग्रेस कधीच पराभूत झाली नसती. ज्या वेळेला पवार साहेबांनी काँग्रेस सोडली काँग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नसताना काँग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत. या बाबीचा काँग्रेसने प्रामुख्याने विचार केला पाहिजे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दलित मुस्लिम काही प्रमाणात ओबीसी आदिवासी अल्पसंख्यांक यांच्या मतदाना मुळेच काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे तरीसुद्धा आज काँग्रेस मराठ्यांचे लाड पुरवत आहे. ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण करत आहे. ओबीसी नेत्यांना ओबीसीच्या कोणत्याही कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने काँग्रेस मधील मराठा नेते करत आहे. त्यामुळे ओबीसीचा काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. काँग्रेस वरील विश्वास उडत चालला आहे काँग्रेसला वाटतं उंटाचा वट मला आजही खायला मिळू शकेल. परंतु काँग्रेसला उंटाचा वट खायला मिळणार नाही उलट मराठ्यांच्या नादाला लागून काँग्रेसची फरफट होऊ शकते. काँग्रेसचे नेते शरद पवार साहेबांच्या दबावाला बळी पडत असल्याचे दिसत आहे. सर्व मराठा नेते सर्व पक्षात सत्तेला चिटकून आहेत. जास्तीचा मराठा समाज हा राष्ट्रवादीमध्ये आहे. काँग्रेस मधील मराठा नेते प्रामुख्याने जातीवादी पृथ्वीराज बाबा यांना जर लगाम घातला नाही तर विधानसभेमध्ये काँग्रेसचे पुन्हा तीन तेरा वाजल्याशिवाय राहणार नाही. पृथ्वीराज चव्हाण यांचा कोणताही जनाधार नाही काँग्रेसला पुन्हा 1980 प्रमाणे दलित आदिवासी मुस्लिम ओबीसी यांच्यासारख्या विस्थापित समाजांना जर त्याने तिकिटाचे वाटप केलं तरच काहीतरी चांगल्यापैकी जागा मिळू शकतील अन्यथा हरियाणा सारखी मध्य प्रदेश सारखी छत्तीसगड सारखी परिस्थिती महाराष्ट्रात ही झाल्याशिवाय राहणार नाही याशिवाय एम आय एम, वंचित बहुजन आघाडी, जनसुराज्य संभाजी भोसले साहेब, बच्चू कडू सारख्या पार्ट्या इंडिया गटबंधन काँग्रेसच्या विजयामध्ये हरियाणा सारखे अडथळे निर्माण करू शकतात.
एकच शाश्वत पर्याय आहे सर्व पार्ट्यांना ओबीसी शिवाय पर्याय नाही ओबीसी ना हलक्यात घेऊ नये मराठ्यांचे लाड पुरवू नये!
स्पेशल रिपोर्ट :-
सत्यशोधक शंकरराव लिंगे
शिवक्रांती टीव्ही
दिनबंधू न्यूज
संपादक
सत्यशोधक शंकरराव लिंगे
7387 37 78 01
हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा


