राजकारण

प्रकाशआण्णा यांच्या प्रचार यंत्रणेस अडवणूक करणे, प्रचारक गाडी ड्रायव्हरला मारहाण करणे, गावात पत्रक वितरण करुन न देणे हे तुम्ही अस्तित्वशुन्य असल्याचे जगजाहीर करणे.*

*प्रकाशआण्णा यांच्या प्रचार यंत्रणेस अडवणूक करणे, प्रचारक गाडी ड्रायव्हरला मारहाण करणे, गावात पत्रक वितरण करुन न देणे हे तुम्ही अस्तित्वशुन्य असल्याचे जगजाहीर करणे.*

ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभा उमेदवार मा. प्रकाशआण्णा शेंडगे यांच्या निवडणुक प्रचार यंत्रणेची गावागावात अडवणुक होऊ लागली.
१) प्रथम खरसिंग ता. कवठेमहंकाळ येथे मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणास विरोध म्हणून मा. भुजबळ व मा. प्रकाशआण्णा यांना नालायक असा उल्लेख करुन आम्हास पत्रक वाटायची नाहीत असे म्हणत वादावादी केली.
२) कर्नाळ, ता. मिरज येथे प्रचार रिक्षा गाडीस गावात प्रचारास येणेस मज्जाव केला. गावात प्रचार करायचा नाही परत जा असे म्हणत ड्रायव्हरला दम दिला. रिक्षा चालक रिक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून कर्नाळमध्ये प्रचारास न जाता मागे फिरले.
३) रांजणी ता. कवठेमहंकाळ गावात प्रचार गाडी ड्रायव्हरला गावात प्रचारास यायचे नाही म्हणत कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.
४) बलगवडे ता. तासगाव येथे कार्यकर्त्यांना पत्रके वाटू दिली नाहीत.



प्रकाशआण्णा यांचे गाडी काळे फासणे आणि चप्पलाहार घालून चिट्टी लिहून दम दिला.
तेड निर्माण होऊ नये म्हणून आण्णांनी तक्रार केली नाही.
परंतु हे अडवणुकीचे मारहाणीचे प्रकार रोज वाढू लागले.
सोशल मेडीयावर अनेकांनी अगदी अर्वाच्च असे लिहिले.

सांगली हा बहुजन बहुल भाग आहे तरीही ओबीसी तत्वावर कामाच्या मुद्यावर प्रस्थापित वर्ग अशा रितीने अडवणुक करुन आण्णासारख्यांचे दमन करण्याचा प्रयत्न करत असेल तर सामान्य तुमचे आमचे काय?

संख्येने इतके असुन तुमच्यावर असा घाला घालत असतील तर तुमची आमची गुलामी जवळ आली आहे.

तुम्ही तुमचे अस्तित्व गमावून बसलात.
पहिल्या फळीतील नेतृत्वांनी आत्मपरिक्षण करावे.
आपण कुणासाठी पायतान तुटेपर्यंत पळत आहोत.
तुम्हीही विरोधात गेला किंवा विरोधात जावून लढण्याचे धाडस दाखविले तर तुमची, तुम्हीच खतपाणी घातलेली प्रस्थापित व्यवस्था काय हाल करेल.
तुमच्या राजकीय मृतावस्थेतील जगण्यामुळे अखंड बहुजन कोलमडत आहे.

जिथं जिथं संधी आहे तिथं तिथं वाट निर्माण करुन दिल्ली दरबाराचा आजवरचा वनवास संपवावा लागेल. आगामी विधानसभेत सांगलीतून ७ आमदार ओबीसी झाले पाहिजेत. ओबीसी तत्वावर नगरपालिका, मनपा, झेडपी, पंचायत समित्या लढवून संख्येच्या जोरावर आणि ओबीसी आरक्षण बाबतीत होणार्‍या अन्यायावर सत्तेस्थानी ओबीसी बसवू.


शिवीगाळ, मारहाण, प्रचार साहित्य वातटण्यास अडवणु, सोशल मेडीयातून दम इतके होत असताना तुम्ही प्रस्थापितांच्या चिन्हाची पट्टी गळ्यात अडकवून त्यांच्या प्रचार रॅलीत सहभाग, स्टेजवर उसन्या आवेशाने बोलणे हे जमातीचा राजकीय घाताचे पहिले कारण आहे.
त्या मफलरने गळा पुर्णत: आवळला गेला आहे, सामान्यांचा श्वास गुदमरत आहे तरीही स्वत: पुरते पाहून जमातीच्या राजकीय र्‍हासास कारणीभुत होत आहात.


प्रकाशआण्णांचे प्रचाराचे शेवटचे पाच दिवस शिल्लख आहेत.
आपण सांगलीत निर्भिड प्रचारासाठी चार-पाच दिवस राहते या.

जोर वाढू लागलाय,
संधी निर्माण करणे व त्याचे सोने करणे आपल्या हातात आहे.

तुम्ही निर्भिडपणे आण्णासोबत राहाल हिच अपेक्षा.

आण्णांचा बॅलेट युनिटवरील नंबर १४
तर निळडणुक चिन्ह अॅटोरिक्षा आहे.

ओबीसी बहुजन सांगलीकरांनो,
१००% मतदान करा.
तुमच्या एका मतामुळे वाढलेली मुजोरी ४ जून पासून थंडगार पडू द्या.
कसलेही किंतू मनात न आणता आपल्या स्वाभिमानाला दिल्लीत पाठवा.
नाहीतर सतरंज्या/जोडे उचलण्यातच धन्यता माना.
येणारी पिढी माफ करणार नाही.


🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

७३८७ ३७७८ ०१

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button