महाराष्ट्र

🚩 चोंडी मालापूर येथे ओबीसी जातनिहाय जनगणना परिषद संपन्न !

🚩 चोंडी मालापूर येथे ओबीसी जातनिहाय जनगणना परिषद संपन्न !
“हक्क हवा असेल तर संख्या दाखवा… संख्या दाखवायची असेल तर जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे !”

📍 बाभूळगाव तालुक्यातील चोंडी मालापूर येथे ओबीसी जनगणना परिषदेचे जोरदार आयोजन करण्यात आले. ओबीसीसह सर्वच जातींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावागावातून आलेल्या नागरिकांनी “जनगणना करा – हक्क द्या” असा बुलंद नारा दिला.

🔥 बहुजन विचारवंत, चिंतक व कुशल संघटक राजू देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“जातनिहाय जनगणना ही केवळ आकड्यांची मोजणी नाही, तर सामाजिक न्यायाची लढाई आहे. देशात कोण किती मागास आहे, कोण शिक्षणापासून वंचित आहे, कोण बेरोजगारीने होरपळतोय, कोणाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही – हे सत्य समोर आणण्यासाठी जनगणना गरजेची आहे.”

🔥 मध्यवर्ती नागरी सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक देवरावजी जीभकाटे यांनी शासनाच्या धोरणांवर टीका करताना सांगितले की,
“ओबीसी समाजाला मुद्दाम दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एससी-एसटीप्रमाणे ओबीसींची खरी लोकसंख्या आणि सामाजिक परिस्थिती समोर आली तर अनेकांचे राजकारण उघडे पडेल.”

🔥 ओबीसी जनम मोर्चा व भारतीय पिछडा शोषित संघटनेचे पदाधिकारी, ओबीसी क्रांती दलाचे संस्थापक डॉ. विलास काळे यांनी सांगितले की,
“शिक्षण, नोकरी, निधी, शिष्यवृत्ती, राजकीय प्रतिनिधित्व आणि विकास योजनांमध्ये ओबीसींना न्याय मिळवायचा असेल तर जातनिहाय जनगणना अपरिहार्य आहे. चोंडी येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली पाहिजे, ही काळाची गरज आहे.”

⚠️ जातनिहाय जनगणना का गरजेची ?
✅ ओबीसींची खरी लोकसंख्या समोर येण्यासाठी
✅ आरक्षणाचा योग्य वाटा निश्चित करण्यासाठी
✅ शिक्षणातील मागासलेपण समजण्यासाठी
✅ बेरोजगारी आणि आर्थिक विषमता मोजण्यासाठी
✅ शासकीय योजनांचा लाभ कोणाला मिळतो हे स्पष्ट करण्यासाठी
✅ राजकीय प्रतिनिधित्वाचा योग्य हक्क मिळवण्यासाठी
✅ खेडे भारतातील वंचित समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी
✅ “डेटा नाही म्हणून हक्क नाही” हे राजकारण संपवण्यासाठी
✅ सामाजिक न्यायाच्या लढ्याला घटनात्मक आधार देण्यासाठी

🚨 “खेडे इंडिया जात नाही… पण दिल्लीला आमची जात विचारल्याशिवाय हक्कही मिळत नाही !”
म्हणूनच ओबीसींसह सर्व समाजांची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका परिषदेत मांडण्यात आली.

📢 यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र परडके, सरपंच शितल देवानंद मडावी, शिवदास कावलकर, अनिल शेंद्रे, प्रगती कावलकर, सोनाली नगराळे, यशोधरा जुमनाके, जोशना वाघाडे, अरुणा कांबळे, मंथन देवानंद मडावी, माजी सरपंच शांताबाई निरंजन हुकरे, गजानन महादेव परतीके, वंदना किशोर बागडे, लता शिवाचार फलके, वनिता लीलाधर झोड, किरण श्रावण वाघमारे, प्रवीण शंकर गोपने, शुभम राजू मेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

✊ माननीय तहसीलदार बाभुळगाव यांना निवेदन देण्यासाठी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

📲 दिनबंधूं न्यूज
“शिवक्रांती टीव्ही” चे संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01
हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा !

👍 बातमी LIKE करा
📤 SHARE करा
📲 FORWARD करा
💬 COMMENT करा
🔔 SUBSCRIBE करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका !

#OBCजनगणना
#जातनिहायजनगणना
#सामाजिकन्याय
#OBCआरक्षण
#बहुजनएकता
#शिवक्रांतीTV
#शंकररावलिंगे
#CasteCensus
#OBCRights
#BahujanVoice
#सत्यशोधक
#खेडेइंडिया
#जनगणनाहक्काची
#आरक्षणवाचवा
#ओबीसीक्रांती

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button