🔥 “ओबीसींच्या ताटात घुसखोरी बंद करा; सत्ता, संपत्ती आणि सगळे अधिकार घेऊनही मराठा समाज मागास कसा?” — ओबीसी समाजाचा भाजप सरकारला थेट इशारा ! 🔥

🔥 “ओबीसींच्या ताटात घुसखोरी बंद करा; सत्ता, संपत्ती आणि सगळे अधिकार घेऊनही मराठा समाज मागास कसा?” — ओबीसी समाजाचा भाजप सरकारला थेट इशारा ! 🔥
“आमचा डीएनए ओबीसी आहे”, “जातनिहाय जनगणना करू”, “ओबीसींना न्याय देऊ” अशी मोठमोठी आश्वासने देत सत्ता मिळवणाऱ्या भाजप सरकारने आज ओबीसी समाजाच्या पाठीवर वार करण्याचे काम सुरू केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी समाजाच्या मतांसाठी गोड बोलणारे नेते आज मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली ओबीसी आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा संताप ओबीसी समाजातून व्यक्त होत आहे.
देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार “आमचा डीएनए ओबीसी आहे” असे सांगत असताना प्रत्यक्षात मात्र ओबीसींच्या हक्कावर घाला घालण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत असल्याचा गंभीर आरोप आता उघडपणे केला जात आहे. जातनिहाय जनगणनेचे आश्वासन देऊनही आजपर्यंत ओबीसींसाठी स्वतंत्र जातनिहाय कॉलमच उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची घोषणा केल्यानंतर सरकार त्यांचे “लाड पुरविण्यात” व्यस्त असल्याचा आरोप ओबीसी संघटनांनी केला आहे.
⚫ ओबीसी समाजाच्या ठाम मागण्या :
➡️ सुक्रे समितीच्या आधारे दिलेले एसीबीसी आरक्षण तात्काळ रद्द करा
➡️ जस्टीस सुक्रे कमिटी, जस्टीस भोसले कमिटी आणि जस्टीस शिंदे कमिटी यांच्या सर्व शिफारशी रद्द करा बेकायदेशीर जस्टीस भोसले कमिटी जस्टीस शिंदे कमिटी रद्द करा
➡️ “कुणबी मराठा – मराठा कुणबी” हे एकच नाहीत; त्यामुळे हैदराबाद गॅझेट रद्द करा बेकायदेशीर 2004 चा कुणबी मराठा मराठा कुणबी जीआर रद्द करा
➡️ 1994 नंतर दिलेले सर्व कुणबी मराठा / मराठा कुणबी प्रमाणपत्र रद्द करा
➡️ त्या आधारे मिळालेले आरक्षण, नोकऱ्या, प्रवेश, लाभ आणि शासकीय सुविधा रद्द करा
➡️ मराठा समाजाला केंद्राने दिलेल्या EWS आरक्षणातूनच लाभ द्यावा; ओबीसीतून अजिबात नाही
➡️ ओबीसींची तात्काळ जातनिहाय जनगणना करा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण वआर्थिक बजेट द्या
➡️ ओबीसी महामंडळांना मोठ्या प्रमाणात निधी द्या
➡️ खऱ्या मागास समाजाचे आरक्षण आणि अधिकार अबाधित ठेवा
⚠️ “मराठा समाज मागास नाही” — ओबीसी समाजाने दिलेली कारणे
ओबीसी संघटनांच्या मते मराठा समाज हा मागासवर्गीय ठरत नाही, कारण —
🔸 ग्रामपंचायतपासून संसदपर्यंत सर्व स्तरावर या समाजाचे मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधित्व आहे
🔸 सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री अशी सर्व प्रमुख पदे मोठ्या प्रमाणात या समाजाकडे आहेत
🔸 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती अशा सर्वोच्च घटनात्मक पदांवरही या समाजाने काम केले आहे
🔸 सहकार क्षेत्र, साखर कारखाने, शिक्षण संस्था, देवस्थान ट्रस्ट, बाजार समित्या, बँका यांच्यावर या समाजाचे वर्चस्व आहे
🔸 हा समाज जमीनदार, जागीरदार, वतनदार आणि गावगाड्यातील प्रभावशाली समाज म्हणून ओळखला जातो
🔸 आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सत्ता मोठ्या प्रमाणावर या समाजाकडे केंद्रित आहे
🔸 राज्यातील बहुसंख्य शैक्षणिक संस्था आणि सहकारी संस्थांमध्ये या समाजाचे नियंत्रण आहे
🔸 त्यामुळे हा समाज सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या प्रगत असून त्याला “मागास” म्हणणे म्हणजे खऱ्या मागास समाजावर अन्याय आहे
ओबीसी नेत्यांच्या मते, “खऱ्या मागास समाजाचा हिस्सा काढून राजकीय दबावाखाली दुसऱ्या प्रबळ समाजाला देणे म्हणजे संविधान आणि सामाजिक न्यायाची हत्या आहे.”
🚨 भाजपला थेट राजकीय इशारा
“जर ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही, ओबीसी आरक्षणावर डल्ला मारण्याचे प्रयत्न सुरूच राहिले आणि मनोज जरांगे पाटील यांचे लाड पुरविणे थांबवले नाही, तर ओबीसी समाज एनडीए आणि भाजपपासून कायमचा वेगळा राजकीय निर्णय घेऊ शकतो,” असा थेट इशारा अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिला आहे.
“ओबीसींच्या ताटात घुसखोरी आम्ही कदापिही सहन करणार नाही. खऱ्या मागासांच्या हक्कावर डाका टाकणाऱ्यांविरोधात आता रस्त्यावर उतरून निर्णायक लढा दिला जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
📢 सोशल मीडिया सूचना
📰 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📲 7387377801 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा
👍 Like करा
🔁 Share करा
📤 Forward करा
💬 Comment करा
🔔 Bell Icon दाबायला विसरू नका
#OBC
#जातनिहाय_जनगणना
#OBCआरक्षण_वाचवा
#मराठाOBCमधूननको
#SaveOBCReservation
#JusticeForOBC
#OBCएकजूट
#सत्यशोधक
#शंकररावलिंगे
#MaliMahasangh
#OBCVoice
#ReservationPolitics
#MaharashtraPolitics
#DinbandhuNews
#ShivkrantiTV
#SocialJustice
#OBCFight




