📍 मंत्रालय, मुंबई : इंधन पुरवठ्याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

📍 मंत्रालय, मुंबई : इंधन पुरवठ्याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न
राज्यात पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. राज्यात सध्या पेट्रोल विक्रीत सुमारे २३ टक्के तर डिझेल विक्रीत तब्बल ५२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. अकोला, बुलढाणा, जालना आणि वर्धा जिल्ह्यांत पेट्रोल विक्रीत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून अनेक जिल्ह्यांत डिझेल विक्रीत ६० ते १०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही वाढ मुख्यतः अफवा आणि भीतीमुळे होत असल्याचे समोर आले आहे. राज्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि पीएनजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणतीही टंचाई नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तेल कंपन्या, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना अतिरिक्त साठेबाजी रोखण्याच्या तसेच जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्हीचे संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “दहा दिवसांत चार वेळा इंधन दरवाढ झाल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून अतिरिक्त साठा केला जात आहे. वारंवार दरवाढ केल्याने पुरवठा साखळीवर ताण येतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे इंधन दरवाढ एकदाच करावी. तसेच पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणणे ही काळाची गरज आहे.”
📢 सोशल मीडिया सूचना :
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387377801
हा नंबर आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडा.
✅ बातमी लाईक करा
✅ शेअर करा
✅ सबस्क्राईब करा
✅ फॉरवर्ड करा
✅ कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!#हॅशटॅग
#इंधनपुरवठा
#पेट्रोलडिझेल
#इंधनटंचाई
#महाराष्ट्र
#छगनभुजबळ
#FuelSupply
#PetrolDiesel
#BreakingNews
#DinBandhuNews
#ShivkrantiTV
#सत्यशोधकशंकररावलिंगे
#GSTOnFuel
#FuelPriceHike
#जनजागृती
#महाराष्ट्रन्यूज
#सोशलमीडिया
#व्हॉट्सअॅपन्यूज
#मराठीबातम्या








