काँग्रेस 75 वर्षानंतर शुद्धीवर आली जातनिहाय जनगणना करूया म्हणू लागली त्याचा हा जाहीरनामा प्रत्यक्षात महाराष्ट्रातील नेते लागू करू देणार का?

काँग्रेस 75 वर्षानंतर शुद्धीवर आली जातनिहाय जनगणना करूया म्हणू लागली त्याचा हा जाहीरनामा प्रत्यक्षात महाराष्ट्रातील नेते लागू करू देणार का?
विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार साहेब यांना ओबीसीच्या आंदोलनातून माघार घ्यावी लागली त्यामुळे ओबीसी नाराज झाला ओबीसी नाराजी कशी दूर करणार ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेचे उमेदवार देणार का! आमदार खासदार महिला आरक्षणामध्ये ओबीसी असणार का महाराष्ट्रातील मराठ्यांचे जमीनदारांचे कुणबीकरण थांबवणार का खोट्या कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये आलेल्या मराठ्यांना दिलेले सर्टिफिकेट रद्द करणार का
महाराष्ट्रातील प्रस्थापित नेत्यांचे लाड प्रस्थापितांना शाळा दिल्या कॉलेज दिले साखर कारखाने दिले बँका दिल्या कर्जमाफी दिली अर्थमंत्री केले संरक्षण मंत्री केले गृहमंत्री केले कृषी मंत्री केले मुख्यमंत्री केले उपमुख्यमंत्री केले मंत्री केले आमदार केले जिल्हा परिषद अध्यक्ष केले खासदार केले तरीसुद्धा पक्ष सोडून गेले तरीसुद्धा काँग्रेस या प्रस्थापिताच्या पाठीमागे का लागली आहे त्यांचे लाड चालूच ठेवले तर काँग्रेस सुधारण्याची शक्यता फारच कमी आहे!
कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील गोष्टी वास्तवाला अनुसरून आहेत. मराठीतून टाकतोय. विकासाच्या वल्गना करणा-या सत्ताधा-यांना इतक्या स्पष्टपणे आश्वासनांची मांडणी करताना गेल्या १० वर्षात पाहिले नाही.
– सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी जातीय जनगणना केली जाणार.
– घटनादुरुस्तीद्वारे 50% मर्यादा काढून एससी/एसटी/ओबीसींना आरक्षणाचा पूर्ण अधिकार.
– स्वामीनाथन फॉर्म्युल्यासह शेतक-यांसाठी हमीभावाची कायदेशीर हमी.
– कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरुपी आयोग.
– कॅशलेस हेल्थकेअरचे राजस्थान मॉडेल देशभरात लागू करणार. २५ लाख रुपयांचे आरोग्य कवच (मोफत उपचार, हॉस्पिटल, डॉक्टर, औषध, चाचणी ,शस्त्रक्रिया).
– सुरक्षित रोजगार – मुख्य सरकारी कामातील कंत्राटी पध्दती मजुरी थांबवणार.
– असंघटित कामगारांसाठी जीवन आणि अपघात विमा.
– केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण.
– विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्जाला एकदा माफी.
– २५ वर्षांखालील डिप्लोमा आणि पदवीधर विद्यार्थ्यांना एक लाख रूपयांच्या ॲप्रेंटनशीपचा अधिकार.
– युवांसाठी 5 हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी.
– पुढील दहा वर्षात GDP दुप्पट करणार.
– EVM च्या मतांची मोजणी करण्यासाठी VVPAT चा वापर.
– GST 2.0 ची पुनर्बांधणी करणार.
– प्रेस कौंसिलच्या मदतीने फेक न्यूज संदर्भात नवीन कायदा अमलात आणणार.
हे जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा का
वाचा. विचार करा आणि मगच मतदान करा!




