महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

*महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्री अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते संपन्न* आज छत्रपती संभाजी नगर पुंडलिक नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
मंत्री श्री अतुल जी सावे साहेब यांच्या हस्ते व आमदार श्री संजय जी शिरसाठ हरिभाऊ नाना बागडे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री राजेंद्रजी जंजाळ माजी महापौर बापू घडामोडी श्री सुहास जी शिरसाट रामभाऊ पेहरकर इंजिनियर जयंतरावजी गायकवाड अभिमन्यू उबाळे विजय वाघमारे सावता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष श्री शिवानंद जी झोरे आधी नेते मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाले
सुरुवातीला कार्यालयातील फीत कापून व महापुरुषांच्या फोटोस अभिवादन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल जी पुंड यांनी केले सूत्रसंचालन श्री सिताराम विधाते यांनी तर आभार प्रदर्शन विलास ढंगारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली




