राजकारण

ओबीसींनो, जातीसाठी माती खाण्याची शपथ घ्या .!

*ओबीसींनो, जातीसाठी माती खाण्याची शपथ घ्या .!*

*राज्यात सध्या तरी शिरूर मतदार संघात राष्ट्रवादीने (शरद पवार गट) श्री.अमोल कोल्हे यांना,भाजप ने बीड मध्ये पंकजाताई मुंडे यांना,परभणीत श्री.महादेव जानकर यांना, बुलढाणा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने श्री.वसंतराव मगर, बारामती मध्ये ओबिसी बहुजन पार्टीने महेशआण्णा सिताराम भागवत यांना उमेदवारी दिली आहे भाजपा-आघाडी असो की शिवसेना-काँग्रेस-शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी असो की अपक्ष असो

त्यांच्याकडून या मतदारसंघात जे ओबीसी उमेदवार निवडणुकीत उभे आहेत ते सर्व आपल्या वर्गाचे असून किमान महाराष्ट्रात तरी अगदी बोटावर मोजण्या एवढे ओबीसी समाजाचे उमेदवार आहेत.तेव्हा आता ज्या मतदारसंघात ओबीसीला उमेदवारी मिळालेली आहे तिथे तरी त्या मतदारसंघातील सर्व ओबीसी मतदारांनी कोणत्याही पक्षाचा विचार न करता निवडणुकीत उभा असलेला उमेदवार हा आपला ओबीसी आहे

हे पाहूनच मतदान करावे असे सर्व मतदारांना आवाहन करतो. बुलढाणा मतदारसंघात बहुतांश माळी व ओबीसी हे भाजपच्या विचारसरणीला बांधलेले दिसून येतात. परंतु एक लक्षात घ्या की, ओबीसींनो, आजवर त्यांनी तुम्हाला लहान सहान पदं देऊन आमदारकी, खासदारकी मात्र पिढी दर पिढी स्वतःकडेच ठेवत आले आहेत.तुम्ही बहुसंख्येने असुनही तुम्हाला मात्र सतरंज्या उचलल्याशिवाय कुठेही पुढे जाऊ दिलेले नाही. सत्तेची पदे फक्त त्यांनीच उपभोगलीत, तुम्हाला कोरडा पुळका दाखवून,

मोठेपणा देऊन खुश ठेवले आणि त्यातच तुम्ही खुश आहात. तेव्हा आता तरी त्या अंधभक्तीतून बाहेर पडा व जातीसाठी माती खाण्याची वृत्ती आपल्या मनात निर्माण करा.भलेही उघडपणे तुम्हाला अडचणी येत असतील तर प्रचार करू नका, परंतु मतदान करताना मात्र समोरचा उमेदवार हा ओबीसी आहे याची जाणीव असू द्या व त्यालाच मतदान करा.

ओबीसी-मराठा आरक्षण आंदोलनामध्ये आपले नेते छगनराव भुजबळ यांनी ओबीसीसाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली व ओबीसीचे आरक्षण वाचवले.त्या जारंगेने व त्याच्या काही चेलेचपाट्यांनी ओबीसीचे राष्ट्रीय नेते भुजबळ साहेब यांना शिविगाळ केली, आजही तो जारंगे किंवा त्याचे सर्व सहकारी व काही मराठा समाजातील कार्यकर्ते भुजबळ साहेब, पंकजाताई मुंडे, महादेवराव जानकर किंवा इतर ओबीसी उमेदवारांना मतदान करू नका असे जाहीरपणे सांगत महाराष्ट्रभर फिरत आहेत. पण ” तुमची ही भुमिका चुक आहे ”

असं स्वतःच्या समाजातील लोकांना सांगणारा एकही मराठा नेता आजवर पुढे आला नाही.याचा अर्थ, मराठा समाजाच्या या भुमिकेला महाराष्ट्रातील सर्व मराठा नेत्यांचा पाठिंबा आहे. हे असं सत्य नजरेसमोर असताना आता तरी तुमची डोळे उघडू द्या ! नाही उघड समोर येण्याची हिंमत तर आपल्या अमूल्य मताचा वापर करून आम्ही सुद्धा महाराष्ट्रातील किती मराठी नेते पराभूत करू शकतो हे दाखवून द्या.ते म्हणतात ना की आम्ही तुमच्या भुजबळांना पाडू.! तुमच्यात धमक नाही का ! तुम्ही ते आव्हान स्वीकारून एका भुजबळांच्या मोबदल्यात त्यांचे किती नेते घरी बसवू शकता हे एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे. तेव्हा बुलढाणा व महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील ओबीसींना जाहीर आवाहन करतो की ही संधी वाया जाऊ देऊ नका आणि आपला ओबीसी उमेदवार ओळखून कोणताही पक्ष न पाहता ओबीसी उमेदवारालाच आपले अमूल्य मतदान करून विजयी करा. धन्यवाद.!*.

ओबीसी पर्व बहुजन सर्व जातीसाठी माती खाल्ली पाहिजे हे जरी खरं असलं तरी उमेदवाराने सुद्धा जातीसाठी काम केलं पाहिजे ज्यावेळेला ओबीसीवर अन्याय झाला त्यावेळी जे नेते समोर आले नाही लढ्यामध्ये सामील झाले नाही त्यांना निवडून आणण्यात काहीच मतलब नाही जे समाजाच्या उपयोगी पडतील त्यांनाच निवडून दिलं पाहिजे मग ते कोणत्याही पक्षाचे असो कितीही लहान मोठा नेता असो चळवळीतल्या लोकांना खऱ्या ओबीसींना निवडून दिले पाहिजे. ही काळाची गरज आहे अन्यथा असे उंट निवडून दिले तर यांचा वट कधी समाजाला खायला मिळणार नाही हे फक्त वट दाखवत फिरणार आणि आपणाला बेजार करणार सत्यमेव जयते!

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button