🔥 आरक्षणाच्या लढ्यासाठी रणशिंग फुंकले! संभाजीनगरमध्ये धनगर समाजाचा विराट निर्णायक एल्गार! 🔥

🔥 आरक्षणाच्या लढ्यासाठी रणशिंग फुंकले! संभाजीनगरमध्ये धनगर समाजाचा विराट निर्णायक एल्गार! 🔥
छत्रपती संभाजीनगर येथे उद्या १५ तारखेला दुपारी १ वाजता इंद्रप्रस्थ लॉन येथे धनगर आरक्षणाच्या लढ्यासाठी ऐतिहासिक एकत्रिकरण होणार आहे. “ना नेता – ना पक्ष, धनगर आरक्षण हेच लक्ष्य” या निर्धारातून राज्यभरात प्रचंड आंदोलन उभारण्याचा सामूहिक निर्णय होणार आहे. या लढ्याचे नेतृत्व सकल धनगर समाज करणार असून कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेचे वर्चस्व नसणार आहे.
या बैठकीसाठी धनगर आरक्षणासाठी काम करणारे सर्व घटक, कार्यकर्ते आणि मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात प्रामुख्याने प्रकाश शेंडगे, बळीराम खटके, घनश्याम हक्के, राम गावडे, रामकृष्ण बिडगर, पांडुरंग मिरवण, विष्णू कुऱ्हाडे तसेच उत्तमराव जानकर यांच्यासह अनेक मान्यवरांशी संपर्क करण्यात आला आहे.
राज्यभरातील धनगर समाजाने कोणत्याही निमंत्रणाची वाट न पाहता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, सोशल मीडियातून संदेश व्हायरल करावा आणि आरक्षणासाठी एकजुटीचा निर्धार करावा, असे सकल धनगर समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. हा लढा निर्णायक टप्प्यात नेण्यासाठी राज्य कार्यसमिती गठित करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
📢 सोशल मीडिया सूचना:
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा.
👉 बातमी लाईक करा
👉 शेअर करा
👉 सबस्क्राईब करा
👉 फॉरवर्ड करा
👉 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!




