सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावाती शून्यातून विश्व निर्माण करणारे उद्योगपती माननीय सदाशिव बोराटे साहेब यांची यशोगाथा क्रमशः गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील सामाजिक आणि आर्थिक
प्रस्तावना
सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावाती शून्यातून विश्व निर्माण करणारे उद्योगपती माननीय सदाशिव बोराटे साहेब यांची यशोगाथा क्रमशः गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये एक महत्वाचा बदल घडून येत आहे. परंपरागत भाषेत बोलायचे झाले तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ब्राम्हण आणि क्षत्रिय हे दोनच वर्ग वाढले. वैश्य-व्यापारी हा वर्ग येथे गेल्या अनेक शतकांमध्ये फारसा कधी वाढलाच नाही. त्यामुळे येथील व्यापार हा प्रामुख्याने गुजरात, राजस्थान येथील व्यापारी वर्ग किंवा कर्नाटकामधील लिंगायत यांच्या हातात होता. फाळणीनंतर सिंध पंजाब येथून आलेले सिंधी व पंजाबी यांनीही येथील व्यापार कारखानदारी या क्षेत्रात चांगले यश मिळवले. परंतु प्रत्यक्ष महाराष्ट्रामधून व्यापाराकडे वळणारा वर्ग येथे फारसा नव्हता. उत्तर पेशवाईमध्ये देखील राजाश्रय देऊन इतर प्रांतातील व्यापारांना येथेच स्थायिक होण्यास मदत केली. परंतु महाराष्ट्रातून व्यापारी वर्ग फारसा कधी निर्माण झालेला नाही.
-
गेल्या काही वर्षांमध्ये मात्र महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात एक महत्वाचा बदल होत आहे. येथे आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जातीजमातींमधून व वेगवेगळ्या थरांमधून व्यापार व कारखानदारीकडे वळणारा एक नवा वर्ग निर्माण होत आहे. एका दृष्टीने महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक जीवनातील एक अमूलाग्र बदल म्हणूनच या परिवर्तनाचा उल्लेख करावा लागेल. क्रमशः भाग पहिला दीनबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे7387377801