भीमा सहकारी साखर कारखान्याचे फॅक्टरीचे प्रोसेस मधील दूषित पाण्याने प्रदुषण झाल्याने कारवाई
तक्रारी अर्ज
व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दावा शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01
- दि१२/१०/२०२३
प्रति,
मा. उप प्रादेशिक अधिकारी
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, ब/४, बाळी बिल्डींग सिव्हील लाईन, सोलापूर, शासकीय दूध डेअरी समोर, सात रस्ता, सोलापूर,
विषय:-
भीमा सहकारी साखर कारखान्याचे फॅक्टरीचे प्रोसेस मधील दूषित पाण्याने प्रदुषण झाल्याने कारवाई करणे बाबत….
अर्जदार :-
श्री. सोनाप्पा भीमराव सोनटक्के रा. टाकळी सिकंदर ता. मोहोळ जि.सोलापूर.
संदर्भ :- १.
आमचे दिनांक ३१/०७/२०२३ चा तक्रारी अर्ज आमचे दिनांक १७/०९/२०२३ चा तक्रारी अर्ज २.
महोदय,वरील नमुद संदर्भीय पत्रास अनुसरून आपणास तक्रारी अर्ज करतो की मी वरील ठिकाणचा रहिवासी असून माझी शेत जमीन १८०/४ ही भीमा सहकारी साखर कारखान्या लगत पूर्वेस ७०० फूट अंतरावर असून माझे विहिरीतील पाणी भीमा सहकारी साखर कारखान्याचे फॅक्टरीचे प्रोसेस मधील दूषित पाण्याने केमिकल सारखे पिवळे झालेले आहे व ते पिण्यास व वापरास अयोग्य झाले आहे. त्या पाण्यामुळे माझे शेतातील फळबागा व इतर पिके यांचेवर सुद्धा विपरीत परिणाम झालेला आहे. माझी व आमचे परिसरातील शेती नापीक होऊन जमीन पडीक बनत चालली आहे.
माझी शेतजमीन गट क्रमांक १८०/४ मध्ये मी डाळींब पिक घेतले असून सदर कारखान्याच्या दुषीत पाण्यामुळे माझी जमीन नापीक होत चाललेली आहे मी डाळींब पिक लावलेपासून डाळींब पिकाला या दुषीत पाण्यामुळे फळ धारणा होत नाही व हवेतून येणाऱ्या बर्गेस व राखेमुळे फळांची वाढ होत नसून त्यामुळे पिकाचे नुकसान होत असल्याने कोणतेही उत्पादन मला मिळत नाही. त्यामुळे माझे अर्थीक नुकसान झालेले आहे तसेच जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत असताना या कारखान्याच्या दुषीत पाण्यामुळे माझी जनावरे दुगावली असून व माझे उत्पन्नाचे सर्व रस्ते बंद होत असून मला माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे व बँकेचा कर्जाचा बोजा वाढत असून आपण आमचे तक्रारीची दखल नाही घेतली तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.
तसेच कारखान्याने संदर्भ क्रमांक उत्पादन १११३/२०२३-२०२४ दि १६/०८/२०२३ या पत्रामध्ये केलेला खुलासा लबाडीचा व खोट्या स्वरूपाचा आहे. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना केलेला टाकळी सिकंदर मंडळ मध्ये २२७.५० मिली मिटर पाऊस झालेलाच नाही. कारखान्याचे दुषित पाणी कारखान्यांच्या पाठी मागील बाजूस सोडले जात असून त्या पाण्याचे परक्युलेशन होऊन माझ्या विहीरीत आले आहे. आपल्य कक्ष अधिकान्याने तपासणी केलेली आहे.
तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाने दिनांक ०३/०७/२०२३ रोजी दिलेला पाणी तपासणी अहवाल व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिनांक ०५/०९/२०२३ दिलेल्या दोन्ही अहवालानुसार मारी जमीन नापीक होत असून पाणी पिण्यास योग्य नाही व सिंचनांस अयोग्य असे रिपोर्ट असताना आपल्या कार्यालयाकडे वारंवार पत्र व्यवहा केला असून आपण कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही व आपल्या कार्यालयाने कारखान्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. कारखान्याने दिलेला अहवाल हा बोगस स्वरूपाचा असून कारखाना वेळ काढूपणा करत आहे प्रदूषण मंडळाने दिलेल्या अटी व शर्ती नुसार सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही तसेच दुषित पाण्याचे विल्हेवाट न लावता कारखान्याच्या पाठी मागिल बाजूस सोडले जात आहे, तरी माझ्या तक्रारी अर्जाचे लवकरात लवकर निवारण करून योग्य तो न्याय मिळवा.
तक्रारदार एक दलित समाजाचा असल्याकारणामुळे आपल्या कार्यालयाकडून माझ्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे माझे कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे व माझ्या कुटुंबियांच्या जिवीतास कारखान्याच्या प्रदुषणामुळे धोका झाल्यास त्यास आपले कार्यालय सर्वस्वी जबाबदार असेल.
तरी वरील बाबींचा विचार व योग्य तो न्याय आम्हाला मिळावा तसेच आजपर्यंत माझे झालेले आर्थिक नुकसानीची भरपाई करून मिळावी अन्यथा मी व माझे कुटूंब दिनांक १२/१०/२०२३ रोजी पासून बेमुदत जिल्हाधिकारी कार्यालय, पुनम गेट समोर उपोषणास बसणार असून आपण वरील पत्राचा योग्य तो निर्णय घेऊन आम्हास न्याय द्यावा ही नम्र विनंती. सोबत १) अॅनालेसिस रिपोर्ट वॉटर इन्वॉमेंट
२) महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचेकडील पाणी तपासणी अहवाल.
माहितीस्तव
१) मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा अधिकारी कार्यालय, सोलापुर
२) मा. हरित लवाद कार्यालय, त्रिवूनलफरीद कोर्ट हाऊस, कोपसनिकस मार्ग, न्यू दिल्ली ११०००१ ३) मा. हरित लवाद नवीन प्रशासकीय ऑफिस पहिला मजला कॅम्प पुणे
४) मा. प्रादेशिक अधिकारी म.प्र.लि.नि.मंडळ पुणे. ५) मा. उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सोलापूर
६) मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर) रविवार पेठ, कन्ना चौक, सोलापूर ७) मा. साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य साखर संकुल शिवाजीनगर पुणे.
८) मा. पोलीस अधिक्षक साहेब, सोलापूर ग्रामीण, सोलापूर. ९) मा. पोलीस निरीक्षक, मोहोळ पोलीस स्टेशन, मोहोळ,
आपला विश्वासू,
.5.0.88- (सोनाप्पा भीमराव सोनटक्के)