सोशल

अनेक वर्षांपासून पाहिलेलं आपलं स्वप्न पूर्ण होतंय… मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी लवकरच येवल्यात पोहोचतंय!

अनेक वर्षांपासून पाहिलेलं आपलं स्वप्न पूर्ण होतंय…
मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी लवकरच येवल्यात पोहोचतंय!

मांजरपाडा प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे दरसवाडी धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. आज ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येऊन दरसवाडी कालव्याचे गेट उघडण्यात आले असून दरसवाडी-डोंगरगाव कालव्यातून येवल्याच्या दिशेने पाणी प्रवाहित झाले आहे.

आपला ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने पुणेगाव व दरसवाडी तलाव ओव्हरफ्लो झाले असून दरसवाडी धरणातून पाणी जलपूजन करून येवला तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे. दरसवाडी ते डोंगरगाव या दरम्यान काँक्रीटीकरण अधिक झाले असल्याने पाणी कमीत कमी वेळेत डोंगरगाव येथे पोहचेल असा विश्वास आहे.

सन १९७२ पासून पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे काम सुरू झाले होते. २००४ मध्ये येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आपण या कालव्याच्या नूतनीकरण कामास चालना दिली. मात्र दरसवाडी धरणातून येवला तालुक्यासाठी फक्त ओव्हरफ्लोचे पाणी मिळणार होते. हे पाणी पुरेसे नसल्याने आपल्या प्रयत्नांतून मांजरपाडा प्रकल्पाची उभारणी करून गुजरातला जाणारे पाणी अडवण्यात आले आणि बोगद्याद्वारे हे पाणी पुणेगाव धरणात आणण्यात येऊन तेथून दरसवाडी धरणात टाकण्यात येत आहे. त्यातून हे पाणी दरसवाडी-डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून येवला व चांदवड बंधारे भरण्यात येणार आहेत. अनेक अडचणींना तोंड देत आपला हा प्रकल्प पूर्ण झाला असून दरसवाडी ते डोंगरगाव कालव्याचेही काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. सुमारे ४० ते ४५ वर्षांनंतर आपल्या अथक प्रयत्नांतून हे शक्य झाले आहे.

आज दरसवाडी-डोंगरगाव कालव्यातून हे पाणी येवल्याच्या दिशेचे प्रवाहित झाले असून लवकरच हे पाणी डोंगरगाव ला पोहोचणार आहे. या पाण्यामुळे येवल्यातील उत्तर-पूर्व दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. चांदवड व येवला तालुक्यातील दुष्काळी भागाचा सिंचनाचा प्रश्न सुटणार असून शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत, याचा खूप आनंद होतोय.

ज्याचा अंगात पाणी त्याच्या घरात पाणी त्याच्या दारात पाणी त्याच्या शेतात पाणी त्याच्या तालुक्यात पाणी त्याच्या जिल्ह्यात पाणी त्याच्या राज्यात पाणीच पाणी पाणीदार नेता एकच नेता छगनरावजी भुजबळ साहेब!!!

आपला –
छगन भुजबळ
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button