अजितदा" />
सोलापूर

🔥 ३ फेब्रुवारी | महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी – सत्तेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ 🔥

🔥 ३ फेब्रुवारी | महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी – सत्तेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ 🔥

अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सातव्या दिवशीही राष्ट्रवादीतील एकीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम लागलेला नाही. मात्र वास्तव स्पष्ट आहे — अजितदादा गटाकडून कोणतीही अधिकृत एकीकरणाची हालचाल नाही. उलट, सत्ताकेंद्राची सूत्रे आता सुनेत्रा पवार यांच्या हाती जात असल्याचे ठोस संकेत मिळत आहेत.

सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याच्या हालचाली “ग्रीन सिग्नल”वर असल्याची खात्रीशीर चर्चा आहे. त्याचवेळी पार्थ पवार सक्रिय राजकारणात उतरणार असून, येत्या राज्यसभा निवडणुकीत सहा वर्षांसाठी खासदार होण्याचे संकेत स्पष्ट आहेत.

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदासह बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. मात्र अर्थमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असून काही दिवसांत मोठा निर्णय अपेक्षित आहे.

दरम्यान, विमान अपघाताबाबत “अपघात की घातपात” या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.
संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, अजितदादा पुन्हा राष्ट्रवादी (शरद पवार) गटासह इंडिया आघाडीत जाणार होते, त्यामुळेच ते उघडपणे बोलत होते की भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फायली माझ्याकडे आहेत.
या पार्श्वभूमीवर चौकशी कोणत्याही संस्थेमार्फत न करता उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फतच व्हावी, अशी आपली व जनतेची मागणी आहे.
मिटकरी, अजितदादा गटातील आमदार यांनीही हीच मागणी करत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.

प्रश्न गंभीर आहेत —
विमानातील सर्व मृतदेह जळालेले असताना कागदपत्रे कशी शाबूत?
सहा प्रवासी सांगितले असताना प्रत्यक्षात पाच मृतदेहच का?
वारंवार पायलट बदलण्यात आला का?
या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत संशय कायम राहणार आहे.

एकूण चित्र स्पष्ट आहे — शरद पवार गट आणि अजित पवार गट यांचे एकत्रीकरण होईल, अशी जी पहिली चर्चा होती, ती आता बहुतांश रद्द झाली आहे.
आता कोणताही अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेणार, आणि त्यात बदललेली राजकीय समीकरणे असतील.
मात्र हे नवे समीकरण भाजपला मान्य होईल का? हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवत आहे.

चंद्रपूर महानगरपालिका – दिल्ली दरबारातून समेट!
नवीन घडामोडीनुसार, वडेट्टीवार गटाला उपमहापौर पद,
खासदार प्रतिभा धानोरकर (नाव निश्चित) यांच्या गटाला महापौर पद,
तर सहकारी पक्षांना स्थायी समिती देण्यावर एकमत झाले आहे.
एकमेकांच्या अधिकारात हस्तक्षेप न करण्याचा स्पष्ट आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आला आहे.

⚡ निष्कर्ष : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर, संशय, आरोप आणि नव्या समीकरणांचा स्फोटक टप्पा सुरू झाला आहे. पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत. ⚡

दिनबंधू न्यूज | सेवक क्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकराव लिंगे
📞 ७३ ८७ ३७ ७८ ०१

👉 आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा नंबर जोडा
👉 बातमी लाईक करा
👉 शेअर करा
👉 सबस्क्राईब करा
👉 फॉरवर्ड करा
👉 कॉमेंट करा
👉 बेल आयकॉन दाबा – विसरू नका

#MaharashtraPolitics #AjitPawar #SunetraPawar #ParthPawar #NCP #RajyaSabha #Chandrapur #PoliticalExplosion #DinbandhuNews #SevakKrantiTV

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button