शरण गाथा क्रमशः ६

बसवेश्वर’ अशा शब्दात केला जाणारा गौरव यथार्थ असल्याचे दिसून येतो. मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे, आजोबांकडून नातवंडांनी परंपरा पुढे चालवावी अर्श । कालसापेक्ष मांडणी शरणांच्या वचनांतून आणि नामदेवराय आणि तुकोबारायांसह वारकरी संतांच्या अभंगातून झाल्याचे जाणवते. पुरोगामी वारशाचा तानाबाना विणताना एक धागा गुंफण्याचा प्रयत्न ‘शरणगाथा: कल्याणपर्वातील निवडक शरणांच्या कथा या पुस्तकातून शरण साहित्य अध्यासनने केला आहे.
हे करताना समकालीन संदर्भात त्या शरणांच्या जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आजचे जग तंत्रज्ञानाच्या कवेत आहे. ‘माणूस चंद्रावर जाणे’ ही घटना आता जुनी झाली असून आपण मंगळ ग्रहावर दावा करत आहोत. मोबाइलच्या स्क्रीनवर जगच आपल्या हातात आले आहे. आपल्याला हवी असलेली माहिती अनेक पर्यायांसह ‘गुगल सर्चइंजिन’ आपल्यासमोर ठेवत आहे. त्यामुळे चरित्रनायकांशी संबंधित पुराणातील, आख्यायिकांतील आणि चमत्कारांतील संदर्भाचा, कथांचा वर्तमानाशी सुसंगत अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. ते करत असताना पुराणांपेक्षाही चरित्र नायकांची स्वतःची वचने, त्यांचा उल्लेख असलेल्या समकालीन शरणांची वचने, शिलालेख, लोककथा, आख्यायिका असा क्रम ठरविण्यात आले आहे. ‘कानातून कोणीही जन्मू शकत नाही’ अशी बसवण्णांनी मांडलेली स्पष्ट भूमिका काळाच्या कितीतरी पुढची आहे. ती पूर्णपणे विज्ञानवादी आहे. विवेकवादी आहे. त्यामुळे या चरित्र नायकांचा अभ्यास करताना समकालीन उत्सुकतेतून प्रश्न उपस्थित करण्यात आली आहे. तर्क मांडण्यात आले आहेत. ते प्रश्न तरुणांच्या मनातील आहेत, त्यामागे इतर कोणताही हेतू नाही, हे स्पष्ट आहे.
शरण श्रेष्ठ मरूळशंकरदेव अफगाणिस्तानवरून कल्याणला आले होते. कल्याण आजोळ असलेल्या नामदेवरायांनी पंजाबसह अफगाणिस्तानपर्यंत भागवत पताका फडकावली. म्हणूनच बसवपत्नी निलम्मा- निलांबिका यांच्या चरित्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई भेटतात. हरळय्या आणि मधुवय्या यांना हत्तीच्या पायाला बांधून फरफटत चेत सार्वजनिकरित्या झालेल्या निर्घण खुनात स्वतःला सुळावर खिळे ठोकले जात असताना ‘देवा त्यांना माफ कर, आपण काय करतोय हेच त्यांना माहीत नाही,’ म्हणणारे प्रभू येशू भेटतात. एका माथेफिरूने गोळी झाडल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडूनही वर्षानुवर्षे जिवंतच असलेला मोहनदास करमबंद गांधी नावाचा महात्मा भेटतो. अनुभव मंटपाच्या आगीत भस्मसात झालेल्या वचनांच्या गट्ट्यात गाठ्डे डोक्यावर घेऊन जाणारे शिवय्या चोखोबांची गुरे राखणाऱ्या विठुमाऊलीत १२। शरणगाथा6
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा
टाका व्हिडिओ बनवा




