धाडसाने बोलणं खरं बोलणं

धाडसाने बोलणं खरं बोलणं
सत्यमेव जयते
पोलीस दलात पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारी नाही – मीरा बोरवणकर
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर पोलीस प्रशासनातील वाईट प्रवृत्तींवर निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. पोलीस दलात पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारीच नाही, एकही पोलिस स्टेशन नाही कि जिथे पैसे जमा होत नाहीत, असे धक्कादायक दावा निवृत्त पोलीस अधिकारी बोरवणकर यांनी केला आहे.
राज्यात पोलीस प्रशासनात प्रचंड खाबुगिरी असल्याचा धक्कादायक खुलासा मीरा बोरवणकर यांनी केला. पोलीस दलात पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारीच नसल्याचे त्यांनी सांगितले. एकही पोलीस स्टेशन नाही कि जिथे पैसे जमा होत नाहीत. यावेळी त्यांनी स्वतःचा किस्सा सांगितला. प्रत्येक पोलीस स्टेशन राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे. राजकारणी लोकांना हव्या तश्याच नियुक्त्या होतात.
महाराष्ट्र पोलीस प्रशासनात वाईट प्रवृत्ती वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसींग पुर्ण संपले आहे. महाराष्ट्राने केरळ, तेलंगणा या राज्यांकडून शिकावे, असा सल्लाबी बोरवणकर यांनी दिला.
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा




