मंडलनामा क्रमशः27.हज हाऊस परिषद

मंडलनामा क्रमशः27.हज हाऊस परिषद
हज हाऊस येथे ८ जानेवारी १९९६ रोजी झालेली परिषद ऐतिहासिक ठरली. या परिषदेत सहभागी व्हावे, अशी गळ मी चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांना घातली होती. ते या परिषदेला आले. त्यांच्यासह केंद्रीय नेते सुबोधकांत सहाय, रामविलास पासवान, शायर हसन कमाल, जनार्दन पाटील, जॉनी वॉकर या ज्येष्ठांसह माझे सहकारी विलास सोनवणे व पत्रकार कपिल पाटील (आता आमदार) हे सुद्धा उपस्थित होते.
मंडल आयोगाची १९९४ मध्ये अंमलबजावणी झाली होती. पण मुस्लिमांना ओबीसी जात प्रमाणपत्र काढण्यात प्रचंड अडचणी होत्या. अनेक ठिकाणी मुद्दाम अडवणूक केली जात होती. संघटनेने आतापर्यंत केलेल्या जनजागृतीमुळे अनेक मुस्लिम मोठ्या प्रमाणावर जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जात होते. परंतु, त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या परिस्थितीला तोंड फोडण्यासाठी हज हाऊस येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित केली. खरे तर शासनाने विविध जीआर काढून मुस्लिमांना जात प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी काही प्रमाणात दूर केल्या होत्या. पण शासकीय अधिकारी व कर्मचारी ते जीआर पाहतच नव्हते. त्यांचा एकच धोशा, मुस्लिमांना आरक्षण मिळत नाही. शासनाने काय निर्णय घेतले, हे त्यांच्या खिजगणतीत नव्हते. शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख नाही, असे अधिकारी, कर्मचारी सांगत. ते वेगवेगळे दाखले मागायचे. आतापर्यंत कधीच कागदाशी संबंध न आलेले मुसलमान गोंधळून जायचे. वेगवेगळे कागद जमा करून ते मेटाकुटीला येत. ‘प्रमाणपत्र देणारा अधिकारी समाधनी नसेल, तर प्रमाणपत्र द्यायचे नाही’, असा एक जीआर होता. त्यामुळे विविध कागदपत्रे, पुरावे सादर केल्यानंतरही ‘समाधान झाले नाही’, असा शेरा मारून प्रस्ताव फेटाळले जात. त्यांचे समाधान कशामुळे होईल, हेच लक्षात येत नव्हते. शाळेच्या दाखल्यावर उल्लेख नसल्याने सरपंचाचा दाखला घेऊन प्रस्ताव सादर केला जाई. परंतु, तहसीलदार तो अमान्य करत. तलाठी व मंडळ निरीक्षक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिक, त्यांच्या जातींची माहिती असते. त्यांनी शिफारस केली तरी तहसीलदार जात प्रमाणपत्राचा प्रस्ताव फेटाळत असत. मुस्लिम ओबीसीचे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी १९६७ पूर्वी संबंधित व्यवसाय करत असल्याचा पुरावा मागितला जाई. हा पुरावा सगळ्यांकडे नव्हता. जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यात तर यापेक्षाही जास्त अडथळे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दक्षता पथकाचा चौकशी अहवाल मान्य करणे भाग होते. पण जातवैधता समित्या दक्षता पथकाचा अहवालही अमान्य करत. जातवैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव फेटाळत.
या परिस्थितीत जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जाणाऱ्या मुस्लिमांमध्ये मोठा रोष निर्माण झाला. त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता होती. या सर्व समस्या मांडण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली. ऑल इंडिया मुस्लिम
ओबीसी ऑर्गनायझेशन, केंद्रीय नेते, चळवळीतील नेते व कार्यकर्ते, चित्रपटातील अभिनेते यांच्यासह अनेक जण गोरगरीब मुसलमानांसोबत आहेत. तुम्ही मागे हटू नका, ही दीर्घ लढाई लढावी लागेल, असा विश्वास देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे दोन हजारापेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित राहिले. उपस्थित प्रतिनिधींनी त्यांचे दुःख, अचडणी, अनुभव जाहीरपणे मांडले.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




