अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीची सरसकट मदत द्या, जळगांव जामोद काँग्रेसची मागणी

अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीची सरसकट मदत द्या, जळगांव जामोद काँग्रेसची मागणी
रविवार दि. 26 मे 2024 रोजी जळगांव जामोद तालुक्यासह संपूर्ण जिल्हयात चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी तथा सामान्य नागरीकांचे अतोनात नुकसान झालेले असुन या वादळामुळे शेती पिकांचे व छोट्या मोठ्या व्यवसायीकांचे व राहत्या घरांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच विज पडुन जिवीत
हानी सुध्दा झालेली आहे तरी सदर नैसर्गिक आपत्तीचे तत्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत मिळावी असे निवेदन जळगांव जामोद तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने सोमवार दिनांक 27 में रोजी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
याप्रसंगी जळगांव जामोद मतदार संघाच्या काँग्रेस पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, महीला प्रदेश प्रतिनिधी ज्योतीताई ढोकणे, जिल्हा सरचिटणीस अमर पाचपोर , शहराध्यक्ष अर्जुन घोलप, प्रवीण भोपळे, संदीप मानकर,श्रीकृष्ण केदार, डॉ.प्रशांत राजपूत, हुसेन राही, जुनेद शेख, शंकर म्हस्के, आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
एम सी एन न्यूज करिता
श्याम खंडागळे जळगांव जामोद





