54 मिटर रस्ता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने खुला न झाल्यास 02 ऑक्टोबर रोजी छेडणार तीव्र आंदोलन

प्रेस न्यूज
1) 54 मिटर रस्ता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने खुला न झाल्यास 02 ऑक्टोबर रोजी छेडणार तीव्र आंदोलन
सोलापूर विकास मंचाच्या वतीने ५४ मीटर रस्त्याच्या कामाबाबत आक्रमक पवित्रा
सोलापूर, दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी सोलापूर महानगरपालिका नगर प्र.अभियंता श्रीमती सारिका आकुलवार सोबत सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाची बैठक सोलापूर महानगरपालिकेत संपन्न झाली. सोलापूर विकास मंचच्या वतीने शहरातील अत्यंत महत्त्वाच्या 54 मीटर रस्त्याच्या संदर्भात मंचच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेला वारंवार प्रत्यक्ष भेटून तथा महापालिका आयुक्तांना पत्र देऊन सुचित करण्यात आले.
सोलापूर विकास मंचाने मागील 8 ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त यांना 54 मीटर रस्त्याच्या कामाबाबत निवेदन दिले होते .
महापालिकेकडून मिळालेल्या लेखी उत्तरामध्ये शहरातील 54 मीटर रस्ता पूर्ण करण्याबाबत असणाऱ्या कायदेशीर आर्थिक व न्यायालयीन अडथळ्या बाबत सविस्तर लिहिले होते.
सदर रस्ता शहराच्या वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढील काळात येणारे चळवळ शहरातील रस्त्यावर होणारी गल्ली या सर्वांचा विचार करून हा रस्ता तातडीने पूर्ण होणे अतिशय गरजेचे आहेया. साठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण हे महापालिका आयुक्तांची जवाबदारी आहे.
मंचाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर सदर रस्त्याचे काम 2 ऑक्टोबर 24 पर्यंत सर्व अडथळ्यांची पूर्तता करून रस्त्याचे काम सुरू न केल्यास 2 ऑक्टोबर रोजी सोलापूर विकास मंचाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. 54 मीटर रस्ता या विषयावर सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्यासह अनेक वाणिज्यिक आणि सामाजिक संस्थांनी सोलापूर विकास मंचला पाठिंबा दर्शवला आहे.
54 मीटर रस्त्याच्या कामातील अडथळ्या बाबतीत मनपा अभियंता श्री दिवाणजी यांनी सविस्तर माहिती दिली.
हे सर्व अडथळे तातडीने दूर करण्याची आणि काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी मंच तर्फे करण्यात आली. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, अॅड.दत्तात्रय अंबुरे, सारंग तारे, गणेश शिलेदार, प्रसन्न नाझरे, नरेंद्र भोसले, कैलास लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




