|| लढाई अस्मितेची || ओबीसींच्या हक्काची.||

|| लढाई अस्मितेची || ओबीसींच्या हक्काची.||
मी ओबीसी
माझं मत ओबीसीला…
मी माझे कुटुंबीय, माझे ओबीसीतील मित्रपरिवार आणि सर्व सोयरे यांना ओबीसी उमेदवारासचा मतदान करण्यासाठी निवडणुकीपर्यंत कार्य करेल.
ओबीसीलाच मत का द्यायचे.
१) आपण ओबीसी पहिल्या पिढीतील बांधव नोकर्या मिळवू लागलो होतो, खोट्या खाडाखोड केलेल्या नोंदीचा शोध घेतल्याचे दर्शवून आपल्या नोकर्यांवर १००% अतिक्रमण करणार.
२) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कुठेतरी राजकीय पदे मिळू लागली होती, त्या ओबीसीतूनच्या पदांची त्यांना फार अॅलर्जी, ती पदेही आता त्यांनाच मिळणार.
३)पक्षांच्या उमेदवार्या घेवून आपल्या मतावर आमदार / खासदार झाले, आपल्याच आरक्षणावर उठले. राजसत्तेचा अक्षरश: अमानुस वापर करुन ओबीसींच्या पुढील पीढ्या नोकर्यांतुन/स्थानिक राजकारणातून हद्दपार केल्या जाणार.
४) पदोन्नतीने चारदोन अधिकारी होत होते, ते आरक्षण स्वजातीच्या फायद्यासाठी तात्काळ रद्द करुन,अनेकांना पदापासून दूर ठेवले.
५)५४% ओबीसी लोकसंख्या असताना ५% जागांवरही विधानसभा/ लोकसभेस उमेदवारी देण्यास टाळणे.
६) ह्यांच्या ओबीसींचे मते हवी आहेत, मात्र आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक भागिदारी प्रमाणात नको.
७) ओबीसींची जातनिहाय जनगनणा केली जात नाही, जर तशी जनगनणा झाली तर ओबीसी संख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये तरतुद करावी लागते.
ओबीसींनो,
गत सहा महिन्यातील सत्ताधारी प्रस्थापितांचा ओबीसींवरील अन्याय आठवा, ध्यानात घ्या. पुन्हा ती वृत्तपत्रे काढून वाचा.
आणि मगच विचार करुन अन्यायाविरोधात मत द्या.
ओबीसींचे प्रत्येक एक मत अपल्याच ओबीसी उमेदवारास मिळायला हवे.
महाराष्ट्रात २०-२५ जागांवर दुसरा खासदार होऊच शकत नाही.
भावांनो,
तुमचे मत केवळ एक वेळ अजमावा…
राजकीय क्रांती होईल.
ओबीसींच्या राजकीय क्रांतीचा पाया प्रत्येक ओबीसी होईल अशी अपेक्षा.
यामध्ये मायक्रो ओबीसीची दिशाभूल केली जात आहे आपल्याला काय मिळत नाही माधव पॅटर्न राबवला जातो असं म्हटलं जातं परंतु मायक्रो ओबीसी किंवा मोठा ओबीसी दोघेही निवडणुकीला लवकर तयार होत नाहीत कारण खर्च मोठा असतो आणि वर्गणी कोणी द्यायला तयार होत नाही कारण मोठे उद्योग धंदे हे ओबीसी मायक्रो ओबीसी कडे नाहीत प्रस्थापित लोक याचाच फायदा घेऊन मायक्रो ओबीसीला गाव पातळीवरची छोटी छोटी पद देऊन खाल्ले घ्या रबरी स्टॅम्प पुढारी बनवले जातात आणि त्यांना पाहिजे तसे प्रस्थापित लोक कामे करून घेतली जातात तर वेळीच मायक्रोबेसिनी याच्यावर विचार केला पाहिजे आणि जो मोठा ओबीसी आहे त्यांनी सुद्धा विचार करून प्रत्येक ठिकाणी मायक्रोबेसिला स्थान दिले पाहिजे हे सुद्धा काळाची गरज आहे
निवांत कोळेकर सांगली
8329665901




