संत भगवान बाबाचे लिंगछेद कोणामुळे? क्रमशा.14

संत भगवान बाबाचे लिंगछेद कोणामुळे? क्रमशा.14
अर्जुनी सर्वस्य तुम्ही हो बाबा । वारकरी पंथाचा निर्मिला सुपा ।।३।। अशा पद्धतीने हे सर्व केलेत व तुमच्या वारकरी पंथाचा तुळशी माळेवर सवता सुभा निर्माण केलात. त्यामुळे तुमचे सर्वत्र लोक चरित्र गातील, कारण त्यामागील तुमच्या त्यागाचे वर्चस्व आहे. म्हणून मी भक्त प्रमोदबुवा लिहितोय. तुमच्या शब्दात ईश्वरी अवतार आहे. म्हणून मी ही आरती गात आहे.
सोपान गर्ने संपादित दसरा विशेषांक २०१० मध्ये सखाराम धाँडिया आंधळे यांनी रचलेली आरती पृ. १७ वर प्रसिद्ध झालेली आहे. मुळात आंधळे हे कवीमनाचे आहेत. त्यांच्या भगवानबाबांवरील काव्यरचनांचाही विचार आपण यापूर्वी केलेला आहे. भगवानभक्त असलेले हे सर्व दृष्टीने सात्विक सद्गृहस्त. त्यांनी रचलेली आरती ही आठ कडव्यांची इतर आरत्यांप्रमाणे भगवानबाबांचा महिमा आळवणारी आहे.
भगवानगडावर गोपिनाथ मुंडे यांच्या हस्ते प्रथम आरती ओवाळून महंत न्या. डॉ. नामदेवशास्त्री लिखित आरतीची सन २०१३ साली सुरुवात झाली. ही आरती आता सर्वमान्य झाली आहे. अगदी घरगुती तसेच मोठ्या कार्यक्रमातही सदरील आरती म्हटल्या जाते, ती आरती अशी,
“आरती भगवानबाबा । चिदानंदाचा गाभा ।
वैराग्य मुर्तीमंत । दिसे शांतीची शोभा ।।१।। तुळशी उगवल्या । रक्त सांडिले जेथे।
धावूनी आले देव । दिले अभय तेथे ।।२।। बैसोनी पाण्यावरी । वाचली ज्ञानेश्वरी ।
३.२.६ लोकगीते स्त्रीगीते :
नरनारायणाचे कैवारी । झाली किर्ती चराचरी ।।३।।”**
लोकसाहित्य मौखिक वा अलिखित स्वरूपात एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत येत असते. त्यातून लोकांच्या सांस्कृतिक जीवनाची अखंड परंपरा व्यक्त होते, लोकसाहित्याच्या या प्रवाहामुळे लोकजीवन घडविले जाते. त्याला आकार दिल्या जातो व त्याचे पोषण होते. लोकसाहित्य हे गद्य व पद्य स्वरूपात असते. त्याचा अभ्यास हा साहित्याच्या अभ्यासापेक्षा वेगळा असतो. “मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, पुरातत्त्वत्विद्या, दैवतशास्त्र, जातिसंस्थाशास्त्र इ. शास्त्रे आणि आधुनिक काळात प्रस्तुत झालेल्या चिन्हमीमांसा, कथनमीमांसादी पद्धती यांच्या अंतर्गत मर्मदृष्टीचा आधार घेऊन मानवाच्या
इती, प्रवृत्ती, सौंदर्यदृष्टी शोधतच लोकसाहित्याकडे जाये लागते,” असे कुचल म्हणातात. लोकसाहित्याच्या गद्य विभागात म्हणी, कोडी, उखाणे, लोककथा, कहाण्या तर पछ विभागात स्त्री-गीते (ओवीगीते), श्रमगीते, खेळगीते, चडबडगीते, विधिगीते, फेरावरची गाणी, भगतांची गीते, कथागीते असे प्रकार पडतात. आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी रचना ही पद्य विभागात स्त्री-गीतांच्या माध्यमातून झाली आहे.
भगवानबाबांच्या विचार-कार्याचा समाजमनावरील पगडा पाहता त्यांच्यावर शिक्षित तसेच अशिक्षित स्त्रियांनी स्त्री-गीतांची निर्मिती केलेली आहे. जी सामूहिक मनाचा अविष्कार आहे. त्या रचना जरी एखाद्या व्यक्तीच्या नावे आलेल्या असल्या किंवा संपादित केलेल्या असल्या तरी त्या कोणा एका व्यक्तीने किंवा स्त्रीने केल्या असे होत नाही. त्या सामूहिक पातळीवरच्या आहेत. समूहातीत प्रत्येक व्यक्तीला त्या जवळच्या वाटतात.
भगवानबाबांच्या विचारकार्याची प्रेरणा घेऊन त्यांच्याच विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी के. टी. तांदळे यांचा गोपिका दिवाळी अंक व चरित्र, एकनाथ कराडांचे चरित्र, राजकुमार घुले, भगवान मिसाळ, के. पी. सोनवणे आदींचे चरित्रे तसेच सोपान गर्ज संपादित विशेषांक, वंजारी परिवार-डिरेक्टरी अंक, नारायण नागरे संपादित जनांकुश विशेषांक आदींच्या माध्यमातून भगवानबाबांवरील संपादित लोकगीते किंवा स्त्री-गीते पाहावयास मिळतात. आसराबाई पांडुरंग जायभाये, के. टी. तांदळे, मुक्ताबाई केशव बांगर, इंद्राबाई भागुजी सानप, पार्वती रावसाहेब बडे, राहिबाई राख यांच्या तोंडच्या गीतांचे संपादन या लेखक संपादकांनी केलेले आहे. शिवाय स्वतः ही काही गीतांचे संपादने केलेले आहेत. जे या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
के. टी. तांदळे यांनी ‘गोपिका’ १९९७ च्या दिवाळी अंकात पृ. ११६ वर त्यांनी लिहिलेल्या भगवानबाबांवरील लघुनाट्याचा शेवट करत असताना एक गीत घेतले आहे. ते या स्त्री-मनाचा अविष्कार आहे. गीताच्या माध्यमातून भगवानबाबांच्या आयुष्यातील काही घटनांचा वेध घेतलेला आहे. त्याचे वर्णन,
“बांधिला भगवानगड । नाही पाहिला जाऊनी। गवंड्यान केलं काम । टाळ पखवाज लावूनि । अग भगवानगडावरील । खैर धामुडे तोडिले। गुरू मह्या महाराजांनी । खांब माडीला जोडीले । अग भगवानगडावरी । पवळी घातल्या दाटीनी । खरवंडीच्या पाटलांनी । घेतला वखूद वाटूनी ।।”
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




